केवळ एका धर्मसमूहाचे किंवा जातसमूहाचे हित बघणारे धोरण ‘राष्ट्रवादी’ असू शकत नाही. ‘हिंदू राष्ट्रवाद’ हा ‘भारतीय राष्ट्रवाद’ असू शकत नाही
राष्ट्रवादाबद्दल या अगोदर कधी कुण्या धर्माला, प्रांताला, वर्गाला, जातीला गृहित धरून बोलले गेले नव्हते. आपल्याकडे यापूर्वी सामाजिक-सांस्कृतिक विविधतेला महत्त्व आणि आदर दिला गेला आहे. आजच्या काळात मात्र बहुसंख्याकांनी त्यांच्या मनाप्रमाणे राष्ट्रवाद सांगायला सुरुवात केली आहे. यांत सर्वसमावेशकता कुठेही दिसत नाही. याला खरा ‘राष्ट्रवाद’ म्हणता येईल काय?.......