‘भुरा’ : नैतिकता व जिद्दीच्या बळावर माणसांचं आत्मिक आणि वैश्विक तत्त्वज्ञान धुंडाळणारं आत्मकथन
लेखकाच्या आईच्या तत्त्वज्ञानानुसार आयुष्यात झिजून मरावं, पण थिजून मरू नये. झिजत झिजत जगता येतं आणि ते जगणं माणसांतील जिद्द वेळोवेळी दाखवत असतं, म्हणून झगडत राहावं. यातून छोट्या छोट्या प्रसंगांतून मानवी नात्यातील आणि समाजातील दांभिकता, खोटारडेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम, माया, आपुलकी आणि निष्ठूरताही परखडपणे पुढे येते.......