‘गन्स, जर्म्स अँड स्टील’ : मानवजातीचा तेरा हजार वर्षांचा संक्षिप्त इतिहास सांगणारं अतिशय रंजक व उत्कंठावर्धक पुस्तक
जेरेड डायमंड यांच्या ‘गन्स, जर्म्स अँड स्टील’ या बहुचर्चित पुस्तकात मानवजातीचा तेरा हजार वर्षांचा संक्षिप्त इतिहास सांगितला आहे. खूप मोठा आवाका असलेल्या, मानवी भूतकाळाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती देणाऱ्या उत्कंठावर्धक आणि रंजक अशा या पुस्तकाचा नुकताच मधुश्री पब्लिकेशनने मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. हा अनुवाद सविता दामले यांनी केलेला आहे. या पुस्तकाची ही झलक.......