बिबट्याला काय, अंधारातच वावरायची सवय असते. या बिबट्याला तर अंधारात माणसांना मारायची सवय होती...
इतर सगळ्या प्राण्यांच्या तुलनेत माणूस अंधारात अगदीच दुबळा, हतबल ठरतो. त्याचा धीरच खचतो. निदान माझा तरी त्या वेळी खचला होता. अंधारातच ४०० माणसांचा जीव घेतलेला असल्यामुळे त्या बिबट्याला माझी अजिबातच भीती वाटत नव्हती. त्यामुळे त्या फांद्या ओढताना तो इतक्या जोरजोरात गुरगुरत होता की, माझ्या दिशेने कान लावून, चिंताक्रांत होऊन गावात बसलेल्या माझ्या माणसांनादेखील त्याचं ते गुरगुरणं ऐकायला जात होतं.......