माझी इस्लामवरची श्रद्धा आणि माझ्या देशावरचं माझं प्रेम, यांत कुठेही कधीही विसंवाद नव्हता. खरं सांगायचं, तर माझ्या या दोन्ही निष्ठा एकमेकांशी अगदी जवळून गुंफलेल्या होत्या

अमुविचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस गोमांसभक्षणाला बंदी घातली. आपल्या देशबांधवांच्या धार्मिक श्रद्धा दुखवायच्या नाहीत. हा उद्देश त्यामागे होता. आज मुस्लीम समाजानं हे ठरवायचं आहे की, आपण अशा काही प्रकारे ताज्या संदर्भाशी आणि वस्तुस्थितीशी जोडलेले राहणार आहोत का? माझ्या धर्मबांधवांना माझा सल्ला असा राहील की, तुमच्या देशबांधवांच्या सामाजिक चालीरीतीबाबत संवेदनशील रहा.......