आपल्या जगण्याची समज विस्तारीत करण्याचे बळ देणाऱ्या या कथा मराठी कथाविश्वाला वेगळे भान व अभिव्यक्तीला वेगळे आयाम देतील...
या कथासंग्रहातून अनेक वृत्ती-प्रवृत्ती, अपप्रवृत्ती मांडल्या आहेत. सत्तासंघर्ष, अस्तित्व टिकवण्याची धडपड, नात्यासंबंधी गैरसमज, त्यातील उथळपणा, अज्ञानापोटी मोजावी लागणारी किंमत, न केलेल्या कृत्यासाठी शिक्षा, व्यवस्थेतील सामान्यांचे दोलायमान स्थान, सृजनशीलतेचा ऱ्हास, अतिक्रमण, समाजकल्याणाच्या कृतीमागची दांभिकता, विश्वासघात यांचं विचार करणारे दर्शन या कथेतून घडते.......