‘यसन’ ही गेल्या ३० वर्षांत जागतिकीकरणाच्या रेट्यात उभ्या राहिलेल्या नव्या व्यवस्थेतील अख्ख्या पिढीची कादंबरी आहे!
‘धंदेवाल्या गाडीवानाच्या हातात यसन गेल्यावर बैलाच्या नाकातोंडातून रगत आल्याशिवाय राहत नाय’ हे सूत्र ही कादंबरी मांडते. नायक वामन ‘यसन’ तोडण्याचा निर्धार करतो. ‘यसन’ गळून पडलेला हा नायक शेअर मार्केटच्या बुलसारखा मस्तवाल होणार नाही. तर हा बळीराजाचा सखा, मित्र असणारा वृषभ असेल. सृजनाच्या उभारणीसाठी खर्ची पडणारा वृषभ नव्या पोशिंद्याच्या भूमिकेत असेल, हा आशावाद पेरणारी ही कादंबरी आहे.......