सौरव गांगुलीच्या मुलीने दिलेला खुशवंतसिंगांच्या पुस्तकातील उतारा ‘व्हायरल’ झाला, त्या पुस्तकात ‘व्हायरल’ करण्यासारखे अजूनही बरेच काही आहे!
काल क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची मुलगी सना हिच्या ‘इन्स्टाग्राम’वरील एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने ‘व्हायरल’ झाली! त्यानिमित्ताने खुशवंतसिंग यांचे ‘द एण्ड ऑफ इंडिया’ हे पुस्तक चर्चेत आले ही चांगली गोष्ट झाली. भारतापुढील जातीयवादाच्या, जात-धर्म द्वेषाच्या भयानक संकटमालिकेचे भयावह दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत, याची जाणीव हे पुस्तक करून देते.......