‘निसर्गशाळा’ : पर्यावरणशिक्षण, परिसरशिक्षण ‘आनंददायी’ आहे. नेहमीच्या चाकोरीच्या बाहेरचं असल्याने यात वेगळी मजा आहे
मजेबरोबरच यात एक समाधान आहे. साक्षात्कार आहे. अनुभूती आहे. अनुभूती कसली तर आपलाच परिसर जाणून घेण्याची. त्याबद्दल, स्वत:बद्दल, स्वत:च्या कृतीबद्दल जागरूक बनण्याची. गांधीजी म्हणायचे की, मी मुलांना शिकवत नाही, तर त्यांची विवेकबुद्धी जागृत करण्याचा प्रयत्न करतो. त्यावर आधारित काय शिकायचं, हे त्यांचं ते ठरवतील. हीच गोष्ट पर्यावरणशिक्षणाच्या बाबतीत सहजतेने साधता येते, असं जाणवलं.......