‘रागमुद्रा’ : अभ्यास म्हणजे नेमकं काय, हे रागसंगीतातले कलाकार, विद्यार्थी आणि रसिकांनी परत एकदा अनुभवण्यासाठी हा ग्रंथ जरूर अभ्यासावा!!
भारतीय संगीताचा गाभाच सृजनशीलता हा आहे, परंतु नवं काही निर्माण करायचं तर सातत्यानं अभ्यास हवा, परंपरेशी ओळख हवी, डोळस तालीम हवी, अनेक पैलूतून विचार हवा आणि मुख्य म्हणजे निर्मिती क्षमता हवी! या सर्व बाबतीत डॉ. सरवडीकर यांच्या साधनेची ‘तप्तमुद्रा’ या रागमुद्रेवर उमटल्याचं प्रकर्षानं जाणवतं. संवेदनशील कलाकारानं परंपरेकडे आपल्या काळाच्या आणि वयाच्या बिंदूवरून पाहणं परंपरेला अधिक समृद्ध करणारंच ठरतं.......