भिक्षेकरी समाजात पाला-बिऱ्हाडात राहून मी पी.एचडी. पदवी मिळवण्यासाठी जो संघर्ष केला, तो मांडण्याचा हा प्रयत्न आहे
‘झोळी’ हे आत्मकथन वाचकांच्या समोर ठेवत आहे. मी अठरा विश्व दारिद्रय असलेल्या भिक्षेकरी ‘नाथपंथी डवरी गोसावी’ या भटक्या जमातीत जन्माला आलो. भटकंती तर आमच्या पाचवीला पूजलेली आहे. आमचे जीवन भटकंती करून जगणे असे आहे. माझा समाज आजही भिक्षेवरच पूर्णपणे अवलंबून आहे. आमचे दुसऱ्याच्या दारात जाऊन बारा घरचा तुकडा मागितल्याशिवाय पोटच भरत नाही. आमची भिक्षेशिवाय चूल पेटत नाही.......