‘इडिअट बॉक्स’ नावाच्या टीव्हीच्या पडद्यामागची गोष्ट
टीव्ही या विषयाच्या दोन बाजू आहेत आणि त्या समोरासमोर उभ्या असतात. या दोन्ही बाजू आपापल्या नजरेनं पलीकडच्या बाजूचा विचार करत असतात. एक बाजू टीव्हीच्या पडद्याच्या अलीकडे असते, तर दुसरी बाजू टीव्हीच्या पडद्याच्या पलीकडे असते. टीव्हीच्या पडद्याच्या अलीकडील बाजू टीव्हीवरील मजकूर तयार करणारी असते, तर टीव्हीच्या पलीकडील बाजू त्या मजकुराचं ग्रहण करणारी असते. एक बाजू देणारी असते तर दुसरी बाजू स्वीकारणारी असते.......