लोकांना विचार करायला उद्युक्त करणे आणि बुद्धिप्रामाण्यवादाची तत्त्वे पटवून देणे, हा या प्रश्नावलीचा हेतू आहे. श्रद्धावाद्यांची टवाळी करणे हा नव्हे
‘परमेश्वरावर मात!’ या पुस्तकात परमेश्वर-देव-ईश्वर, मूर्तिपूजा, देव आणि धर्म, देव आणि देव, देव आणि आत्मा, देव आणि विश्व, देव आणि उत्क्रांतिवाद, देव आणि मानव, देव आणि अंधश्रद्धा या नऊ विषयांवर जवळपास १०० प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांना उत्तरेही सुचवलेली आहेत. हे प्रश्नपत्रिकेसारखे पुस्तक आपल्या देवाविषयीच्या संकल्पना अधिक नेटक्या, नेमक्या आणि अभ्यासू करणारे आहे.......