‘मनुस्मृती’च्या समर्थकांना त्यांची ‘जागा’ दाखवून देण्याची नितांत गरज आहे!
लोकांनी निवडून दिलेल्या लोकसंसदेला बाजूला ढकलून जेव्हा धर्मसंसद तिची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशा वेळी मनुस्मृतीच्या समर्थकांना त्यांची योग्य जागा दाखवून देण्याची नितांत गरज आहे. डॉ.आ.ह. साळुंखे यांनी हा ग्रंथ लिहून या प्रक्रियेला फार मोठा हातभार लावला आहे. त्यांनी जे विचार दिलेले आहेत, ते ज्यांना मनुस्मृतीने मानसिक गुलामगिरीत खितपत ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापर्यंत पोचवू या.......