वर्तमानकाळातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रश्नांची उकल या पुस्तकातून होईल. सामाजिक प्रबोधनाच्या प्रचार-प्रसारात हे पुस्तक मोलाचे मार्गदर्शन करेल
रा.ना. चव्हाण सत्यशोधक समाज, सामाजिक प्रबोधनाच्या म. फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, चळवळींचा व समकालीन व्यक्तींचा ऐतिहासिक व समतोल लेखाजोखा उपलब्ध करून देतात. रा.नां.ची भूमिका स्पष्ट, सत्याची बाजू घेणारी आणि लोकशाही मूल्ये मजबूत करणारी राहिली आहे. राजा राममोहन राय, फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा ते स्वत:ला ‘नम्र प्रवक्ता’ समजत.......