या बदलत्या जगानं आम्हा डॉक्टर्सना विक्रेता बनवलं आणि पेशंट्सना ग्राहक! चोख पैसे मोजून दिली-घेतली जाणारी बाजारातली एक वस्तू झाली आमची वैद्यकीय सेवा!
वैद्यकीय व्यवसायातली गैरव्यवहारांची पाऊलवाट बघता बघता कशी एक सर्वव्यापी त्सुनामी झाली, आपल्या पायाखालची वाळू कशी सरकून गेली, हे मलाच नव्हे, तर अनेकांना समजलंही नाही. व्यक्तिगत पातळीवर आम्ही आपापले किल्ले लढवत असताना, आजूबाजूला मात्र नैतिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पातळीवरच जग इकडचं तिकडे झालं. भांडवलाची आणि अनुषंगानं आलेल्या पाशवी कॉर्पोरेट तत्त्वज्ञानाची मजबूत पकड आमच्या वैद्यकीय व्यवसायावर आली.......