‘एक शून्य बाजीराव’चा प्रयोग डोळ्यांच्या पटलांवर कोरलाय. डोळे मिटतील तेव्हाच तो पुसला जाणार.
'आविष्कार' या नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ आणि ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे उर्फ काकडेकाका यांचे काल मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. जवळपास सात दशके प्रायोगिक रंगभूमीची अव्याहत सेवा करणारा मराठी नाट्य चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे काकडेकाका. त्यांचं ‘अमका’ हे कार्यकथन पाचेक वर्षांपूर्वी मौज प्रकाशन गृह व आविष्कार यांनी संयुक्तरीत्या प्रकाशित केलं आहे.......