लोक सरकारविषयी इतके संशयखोर का आहेत? काही अंशी याचे कारण इतिहासात दडलेले आहे.
अभिजीत बॅनर्जी - इस्थर डफ्लो या दाम्पत्याला २०१९चे अर्थशास्त्रासाठीचे नोबेल पारितोषिक मायकेल क्रेमर यांच्यासह मिळाले. या दाम्पत्याचे ‘Good Economics for Hard Times’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाल्यापासून चर्चेत आहे. त्याचा ‘बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशास्त्र’ या नावाने डॉ. अनघा केसकर यांनी मराठी अनुवाद केला असून तो मधुश्री पब्लिकेशनने नुकताच प्रकाशित केला आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश.......