‘गीत गंधार’ हे पुस्तक नवोदितांसाठी, संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि संगीताच्या जाणकारांसाठी एक वरदान आहे
गोविलकर यांचा शास्त्रीय संगीताचा व्यासंग, अभ्यास लिखाणातून वारंवार प्रत्ययास येतो. ‘शब्दप्रधान गायकी’त ‘स्वरप्रधान’ गायकी कशी आणि किती प्रमाणात संक्रमित झाली आहे, हे सप्रमाण सांगतानाच संगीतकारांच्या, गायक कलाकारांच्या वैशिष्ट्यपूर्ण संगीत शैलींचा लेखाजोखाही ते मांडतात. सर्वसाधारण वाचकांशी, संगीत रसिकांशी पुस्तकाद्वारे सुसंवाद साधण्याचा त्यांचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल याची खात्री आहे.......