‘लातूर : परिघावरील आवाज’ - असा दस्तऐवज की, जो आजच्या काळात परिघावरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, संघर्षासाठी, हरतऱ्हेच्या हस्तक्षेपासाठी गरजेचा आहे
आपल्यासाठी शहर म्हणजे काय असते? सामान्यांच्या किंवा परिघावरील स्त्री-पुरुषांच्या दृष्टीकोनातूनही शहर जेव्हा आपण बघतो, तेव्हा शहराचा विकास आणि प्रगती याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. सार्वजनिक व्यवस्थेवरील वाढता भार, नियोजनाचं राजकारण, यामुळे शहर आणि त्याचा विकास एका विशिष्ट पद्धतीनेच होत जातो. शिक्षक, विद्यार्थी व संशोधक, नागरिक यांचा एकत्रित लेखनप्रपंच लातूर शहरासाठी नवीन आहे.......