या माझ्या प्राण्यांच्या गोतावळ्यात तुमचंही स्वागत. हे ‘सगेसोयरे’ माझ्याप्रमाणेच तुम्हालाही लळा लावतील, अशी आशा आहे
तब्बल २४ वर्षं निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय हेच माझं जग होतं, तेच माझं कुटुंब होतं. त्याआधी आणि त्यानंतरही प्राण्यांच्या गोतावळ्यातच मी वाढलो, रमलो. माकडं, बिबटे, मगरी, साप इथपासून अगदी बेडकांपर्यंत अनेक प्राण्यांचा आणि नाना पक्ष्यांचाही सहवास मला लाभला. त्यांच्या संवेदना जाणवण्याएवढं मैत्र लाभलं. आपण आणि ते वेगळे नाहीच, असं वाटण्याएवढं प्रेम मिळालं.......