समाजपरिवर्तन हे डॉक्टरांच्या जीवनातील एकमात्र ध्येय होते. त्यासाठी ते अथक प्रयत्न करत राहिले आणि आजही करत आहेत.
आपल्या भूमिकेशी डॉक्टरांनी कधीच तडजोड केली नाही. मिंधेपणा स्वीकारला नाही. त्यांनी केलेल्या सामाजिक-राजकीय कामाचा पट खूप विस्तीर्ण आहे. या पुस्तकातून तो उभा करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. संघर्ष केव्हा करायचा, निर्भय कसे बनायचे, समन्वय केव्हा साधायचा आणि अडचणींना तोंड कसे द्यायचे हे सारे यातून नव्या कार्यकर्त्यांच्या नजरेसमोर येईल.......