‘जय श्रीराम’ची जागा घेण्यासाठी ‘जय भीम’ आला आहे…
कला-संस्कृती - चलत्-चित्र
जयदेव डोळे
  • ‘जय भीम’ आणि ‘द कन्फेशन’ या सिनेमांची पोस्टर्स
  • Sat , 13 November 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र जय भीम Jai Bhim टी. जे. ज्ञानवेल T. J. Gnanavel सूर्या Suriya प्रकाश राज Prakash Raj ‘द कन्फेशन The Confession कोस्टा गाव्हरास Costa-Gavras

नक्षलवादी पोलिसांच्या हत्या का करतात? त्यांचे वर्गशत्रू निश्चित असतानाही त्यांना न संपवता पोलीस या सरकारी कर्मचाऱ्यांना ते ठार का मारतात? शोषक म्हणून जमीनदार, जहागीरदार, सावकार, श्रीमंत शेतकरी, भांडवलदार आदी लोक म्हणजे नक्षलवाद्यांचे वर्गशत्रू. या वर्गातल्यांना संपवणे म्हणजे क्रांतीमधील एकेक अडथळे दूर करत जाणे, असा या हिंसक मार्क्सवाद्यांचा विचार. मार्क्सवादात लेनिन यांनी पोलीस, लष्कर यांना राज्याची दमनशक्ती मानले आहे. राज्ययंत्र दमन करण्यासाठी म्हणजे गरीब, कष्टकरी, पीडित, शोषित, दलित, दुर्बल लोकांना दडपण्यासाठी पोलीस वापरते. म्हणून पोलीस ही राज्याची दमनयंत्रणा. ती मोडायची यासाठी पोलिसांवर हल्ले करणे, त्यांना ठार करणे, त्यांची शस्त्रे पळवणे हे नक्षलवादी करत असतात.

‘जय भीम’ हा मूळचा तमीळ चित्रपट पाहताना राज्याची दमनयंत्रणा खरोखर केवढे दमन करत असते, यावर भर दिल्याचे जाणवत राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आणि एकंदर परिवर्तनवादी ज्या अर्थाने ‘जय भीम’ हे अभिवादन करतात, त्या अर्थाने या चित्रपटात आंबेडकर-तत्त्व काही नाही. जात व धर्म यांच्या अनुषंगाने आंबेडकरांचा राजकीय व सामाजिक विचार मांडायचा प्रयत्न हा चित्रपट करत नाही. मात्र त्याचे शीर्षक तसा समज करवून देते. त्यामुळे प्रेक्षक आणि प्रसिद्धी दोन्हीही भरपूर लाभते आहे त्याला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

थोडक्यात ‘जय भीम’ची कथा अनुसूचित जमातीच्या एका स्त्रीला न्याय मिळवून द्यायला एक वकील जी अथक धडपड करतो त्याची आहे. साप पकडणाऱ्या जातीतली ती आहे. अशिक्षित, गरीब आणि असहाय. तिचा नवरा सरपंचाच्या घरी निघालेला साप पकडून सोडतो. पण त्याच घरी झालेल्या एका चोरीच्या संशयावरून पकडलाही जातो. तो चोर नसतो, पण त्याची भटकी जात त्याला चोर ठरवते. कशी? ते चित्रपटाच्या पहिल्याच प्रसंगात दाखवले आहे. तुरुंगातून सुटका झालेले कैदी जातींप्रमाणे वेगळे केले जातात. सवर्ण सारे मोकळे सोडले जातात. पण ज्या जातींना ब्रिटिशांनी ‘चोऱ्या करणाऱ्या’ असे नोंदवलेले असते, त्यातल्या काहींना वेगळे काढून पोलीस त्यांना न सोडवता आलेल्या चोऱ्यामाऱ्यांमधले संशयित आरोपी म्हणून पुन्हा ताब्यात घेतात. हा जो जातींबद्दलचा ग्रह, अपप्रचार आणि संशय असतो, तो कसा एका जोडप्याचा घात करतो, हे दिग्दर्शकाला सांगायचे आहे. म्हणजे मूळ जात या घाणेरड्या वास्तवात आणि तिच्या प्रतीकांत आहे. मात्र दिग्दर्शक ‘जय भीम’ असे नाव देऊन शासनसंस्था, तिची दमनयंत्रणा, न्यायव्यवस्था आणि कायद्यांचे अस्तित्व यांवरच अधिक भर देतो. तरीही काही बिघडत नाही. कारण एका व्यक्तीत भारताची अवघी समस्या येथे एकवटली आहे.

स्त्रीत्व, दारिद्रय, गर्भारपण, भटकी जात, असहायता, निरक्षरता, नेतृत्वहिनता, अपमान, कष्टकरी जगणे, कातडीचा रंग अशा साऱ्या समस्यांचे मनुष्यरूप म्हणजे संगिनी. ती साप पकडणाऱ्या राजाकन्नू याची पत्नी. तिला विष उतरवण्याचे वनस्पती ज्ञान असते. पण जातीव्यवस्थेने ते महत्त्वाचे मानलेलेच नाही. राजाकन्नू व आणखी दोघे अटक होऊन कोठडीत छळले जातात. चोरी शोधून काढल्याचे श्रेय मिळावे, यासाठी पोलीस अमानुष मारझोड करून राजाकन्नूचा जीव घेतात. ते बालंट अंगावर येऊ नये म्हणून त्याचा मृत्यु अपघातात झाल्याचा बनाव करतात. उरलेल्या दोघांना दुसऱ्या एका तुरुंगात ठेवून तिघेही फरार झाल्याचा कांगावा करतात. या साऱ्या पोलिसी कारस्थानाचा वकील चंद्रू अत्यंत चिकाटीने माग काढतो.

हा जो चंद्रू आहे तो कार्ल मार्क्सचा अनुयायी आहे. त्याच्या घरात मार्क्सची ठळकपणे आणि जोडीला आंबेडकर व पेरियार या दोघांच्या तसबिरी आहेत. या चित्रपटात न्याय मिळवून देणारे सर्व म्हणजे वकील, न्यायमूर्ती व पोलीस महानिरीक्षक हे उच्चवर्णीय असून गुन्हेगार दलित, भटके, आदिवासी आहेत. जे तिघे पोलीस निरीक्षक व हवालदार ‘थर्ड डिग्री’चा वापर करतात, ते मध्यम जातींचे दिसतात.

जात आणि जातीमुळे होत असणारा अन्याय हा विषय बाजूला ठेवल्यामुळे हिंदू धर्म, धार्मिक विषमता व अन्याय यांना मान्यता, यांविषयी या चित्रपटात काही भाष्य नाही. हिंदू धर्माने स्त्रीला नीच लेखल्याचाही उल्लेख नाही. त्यामुळे एक वर्गयुद्ध चित्रपटभर दिसायला लागते, ते म्हणजे पोलिसांची दमनयंत्रणा आणि तिला बळी पडणारे गरीब, असहाय कष्टकरी यांचे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ही दमनयंत्रणा ज्यांच्यासाठी राबते, त्यांना हा चित्रपट फक्त दाखवत राहतो. त्यांना दोष देऊन शिक्षेपर्यंत नेत नाही. पोलिसांचे क्रौर्य, निर्दयीपणा कोणामुळे निर्माण झाला, ते या चित्रपटात आपल्याला समजते. सत्ता राबवणारे अनेक जण पोलिसांवर प्रचंड दडपण आणत असतात. प्रत्येकाचे राजकीय आडाखे आणि फायदे असतात. पोलीस ज्या सत्तेसाठी एवढे दमन करत राहतात, ती या पोलिसांचेही शोषण करत आहे, हेही आपणास समजते. पण ज्या सत्यघटनेवरून ‘जय भीम’ तयार झाला, त्यात पोलिसांची हिंसा हाच मुख्य मुद्दा होता. त्यामुळेही कदाचित सामान्य कष्टकरी विरुद्ध दमनकारी शासनसंस्था, असा खास मार्क्सवादी-साम्यवादी लढा सबंध चित्रपटभर चालतो.

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

समाजवादी, साम्यवादी यांच्या चिवट संघर्षामुळेच भारतात श्रमिक, सामान्य माणूस, एकाकी व हतबल नागरिक यांच्या न्यायासाठी अनेक कायदे बनले. (आता गेल्या सात वर्षांत त्यांची पूर्ण उपेक्षा होत असल्याचे आपण बघत आहोत.) त्याचीच प्रचीती या चित्रपटात आपल्याला येत राहते. न्यायसंस्थेपुढे जी राज्यघटना मार्गदर्शक म्हणून उभी असते, तीसुद्धा सामान्य भारतीय नागरिकाच्या हिताचा विचार करणारी असल्यामुळे अशा कायद्यांची उजळणी चित्रपटात होत राहते. ‘हेबिअस कॉर्पस’ म्हणजे ठावठिकाणा नसलेल्या कैद्याला न्यायालयात हजर करणे, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित व्यक्ती एक तर पळून जातात, मरण पावतात अथवा लपवून ठेवल्या जातात. त्यांचे नातलग त्यांचा ठावठिकाणा जाणून घ्यायला ‘हेबिअस कॉर्पस’चा अधिकार वापरू शकतात. चंद्रू वकील त्या अनुषंगाने खटला लावून धरतात आणि अखेरीस पोलिसांनी राजाकन्नूची हत्या केल्याचे सिद्ध करतात. मारझोड केल्याशिवाय कुणी गुन्हा कबूल करत नसतो, अशी ठाम समजूत पोलीस खात्यात अजूनही आहे. संगतवार तपास, तर्क, पुरावे आणि साक्षी याऐवजी दहशतीचा पर्याय पोलीस वापरतात. त्यात सामाजिक, जातीय ग्रह घुसले की, काय भयंकर घडते, त्याचा नमुना ‘जय भीम’ देतो.

तामीळनाडू राज्य तसे बाह्मणेतर चळवळीत महाराष्ट्राच्या बरोबरीचे. तिथले पक्षीय राजकारण अनेक वर्षं द्रविड चळवळीतल्या पक्षांहातीच आहे. मात्र त्याचा रोख चुकलेला आणि टोक मोडलेले वाटते, हे ‘जय भीम’ बघताना प्रकर्षाने जाणवते. एवढ्या जागृत राज्यात गुन्हेगार जाती-जमातीविषयक संरक्षक कायदा नसावा? महाराष्ट्रात पारधी, भिल्ल, शिकलगार आदींबद्दल अजूनही पोलीस संशयी असतात. चोर प्रत्येक जातीत असतात, म्हणून त्या जाती चोर ठरत नसतात, असा एक संवाद चंद्रू करताना आपण ऐकतो. महाराष्ट्रात या जातीत अनेक सुधारक जन्मले, त्यांच्यासाठी पुनर्वसनाचा सरकारी कार्यक्रम सुरू झाला. आता जातींची ओळख व्यवसाय वा इतिहास या आधारे करता येत नाही. कायद्याने त्यावर मनाई आहे. मात्र तामीळनाडूत जातीय अत्याचार भोगायचे दसित, आदिवासी घटकांमधले प्रमाण वाढते आहे. आजचे तमीळ राजकारणी आंबेडकरांच्या जातिअंताची गरज लक्षात घेतात का? ‘जय भीम’वरून तरी वाटत नाही. चित्रपटातल्या घटना १९९५ सालच्या असल्या म्हणून काय झाले! साम्यवाद, मार्क्सवाद तोकडे असल्याचे बाबासाहेब म्हणत. कारण वर्गावर वर्ण-जाती यांची मात त्यांना दिसे. म्हणून वर्ग आणि जाती या दोहोंच्या मेळ घालून दोहोंचा विच्छेद हाच समता प्रस्थापनेचा कार्यक्रम हवा असे ते म्हणत. ‘जय भीम’मध्ये स्पष्टपणे अशी सांगड दिसत नाही. तामीळनाडूत द्रविड चळवळीने हिंदू धर्मावर यथेच्छ टीका केली, तरी बाह्मण्य आणि जातिप्रथा टिकून आहे, याचे कारण समाजकारणाची झालेली पिछेहाट.

सत्तेत म्हणजे अधिकारपदावर जी जात असते, ती आपल्यापेक्षा प्रतिष्ठेने कमी, दुबळ्या व असंघटित जातीवर अन्याय व जुलूम करते, हे भारतात सर्वत्र दिसते. तसे पोलिसांच्या दुष्ट व स्वार्थी वर्तनातून स्पष्ट करता आले असते. पोलिसांना मारून जशी क्रांती होणार नाही, तशी पोलिसांत भरती होऊनही नाही. पोलीसयंत्रणा शासनसंस्थेचे एक हत्यार असून ते कुणाच्या हातात द्यायचे, याचा निर्णय राज्यकर्त्यांचा असतो. मुस्लिमांची पोलीस भरती गेली अनेक वर्षं अडखळते, ठेचकाळते. आयएएस, आयपीएस, आयएफएस आदी सत्तारचनांत मुसलमान अधिकारी दुर्मीळ होत आहेत. ‘जय भीम’चा एक हेतू सध्या पोलिसांकडून मुस्लिमांचा केवळ संशयावरून जो बेदरकार छळ चालला आहे, त्याकडे लक्ष वेधण्याचा असावा, असे मला वाटले. पण संपूर्ण चित्रपटात एकही मुस्लीम पात्र नाही. या चित्रपटात ज्या पद्धतीने आदिवासी जमाती चिरडल्या जातात, त्याच पद्धतीने आज पोलिसांकरवी मुसलमान चिरडला जातो आहे, पण तसा चित्रपट काढायची हिंमत कुणात आहे?

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

भारतीय राज्यघटनेने सारे सार ‘न्याय’ या मूल्यात साठवलेले आहे. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत न्यायतत्त्वाची मांडणी स्वातंत्र्य, समता व बंधुता यांच्या आधी आहे. हा न्याय सामाजिक, आर्थिक व राजकीय आहे. त्यामुळे त्याचे व्यापकत्व अपेक्षित आहे. न्यायिका संगिनी तिला पोलीस देऊ करतात, ते प्रलोभन नाकारते. चंद्रू तिच्यासाठी म्हणजे तिच्या अस्मितेसाठी मालकीचे घर आणि नुकसानभरपाई मागतो. ती सरकारकडून मिळतेही. अशिक्षित व गरीब स्त्री तिच्या मुलांना सन्मानाचे जीवन हवे असल्याचे सांगते. तिला ज्या ज्या ठिकाणी नकार मिळत गेला, अपमान सोसावा लागला आणि पती गमवावा लागला, त्याची भरपाई कशानेही शक्य होणार नव्हती. ‘न्याय’ या व्यापक संकल्पनेत ती पुष्कळ काही मिळवते. चंद्रू तिला सांगतो की, तुझ्या या न्यायालयीन लढाईच्या यशामुळे भविष्यात कुणी असे छळले गेलेच, तर त्या व्यक्तीला न्यायाचा हक्क जरूर असेल.

‘जय भीम’ मी दुपारी ‘अ‍ॅमेझॉन’ प्राइमवर पाहिल्यावर संध्याकाळी मला ‘टाटा स्काय’मधल्या एका फ्रेंच वाहिनीवर ‘द कन्फेशन’ हा एक जगप्रसिद्ध फ्रेंच चित्रपट पाहायला मिळाला. कोस्टा गाव्हरास या दिग्दर्शकाचा १९७०चा हा चित्रपट कम्युनिस्ट पक्ष आपल्याच नेत्यांच्या निष्ठांचा संशय आल्याचे निमित्त करत, कसा त्यांचे अपहरण करून, तुरुंगात डांबून त्यांचा अव्याहत छळ करून, कबुलीजवाब मिळवायचा डाव रचतो, त्याची कहाणी सांगतो. झेकोस्लोव्हिकाया या देशात १९५०नंतर जे संशयग्रस्त राजकारण चालले आणि सोव्हिएत कम्युनिस्टांना कोण कोण विश्वासघातकी वाटले, त्यांच्या खटल्यांचा आधार या चित्रपटाला आहे. हीसुद्धा एक सत्यघटना होय. असे कितीतरी नेते, निष्ठावंत सोव्हिएत कम्युनिस्ट राज्यकर्त्यांनी छळ करकरून फासावर लटकवले. एकानेही दगाबाजी केलेली नसताना प्रत्येकाकडून खोटाच कबुलीजवाब द्यायला दडपण आणले जाते, ते आणि ‘जय भीम’मध्ये खोटी स्वीकृती द्यायला सांगितले जाते, ते किती सारखे आहे!

गंमत म्हणजे इकडे चंद्रू ज्या विचारांचा आहे, त्या विचारांचेच असूनही तिकडे असंख्य जण छळ व मरण पत्करतात! आपला गुन्हा काय आणि तो आपण केलेला नसताना केवळ सत्तेच्या खेळासाठी आपला प्रचंड छळ चालला हे त्यांना कळते. मात्र याच्यामागे नेमके कोण व का याचा काही पत्ता लागत नाही. ‘कन्फेशन इज हायेस्ट फॉर्म ऑफ सेल्फ क्रिटिसिझम’ असे कम्युनिस्ट पक्षाचा एक अधिकारी या कैद्यांना सांगत असतो. जगभरच्या हुकूमशाही राजवटी आणि क्रूरकर्मा हीच युक्ती वापरत असतात. संशय निष्ठांचा नसतो. सत्तेच्या स्पर्धेत कोण मात करील याची भीती या कटामागे असते. कबुली दिली तरी मरण, नाही दिली तरी मरण, अशी अवस्था हुकूमशहा आपल्या स्पर्धकांची करत असतात.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

‘जय भीम’मध्ये कटकारस्थान रचणारे एका विषम सामाजिक व्यवस्थेचे रक्षक आहेत. त्यांना त्यांच्या व्यवस्थेला आव्हान मिळू लागले की, भीती वाटू लागते. म्हणून किरकोळ, दुबळ्या, असहाय, असंघटित माणसांत त्यांना शत्रू दिसू लागतो. खरे-खोटे काहीही करून आपण आपली सत्ता टिकवू शकतो, हे या रक्षकांना दाखवायचे असते. ‘जय भीम’चा उदगार अशा प्रस्थापितांना वठणीवर आणू पाहणारा आणि न्यायाचे राज्य स्थापन करायला भाग पाडणारा आहे… हरवलेले सत्य जगापुढे आणणारा आहे.

गांधीजींचे ‘रामराज्य’ येण्याऐवजी ‘जय श्रीराम’चे राज्य आपल्यावर आले आहे. ‘जय भीम’चे यावे असे वाटत असेल तर आताच्या संदर्भात कल्पना करत हा चित्रपट जरूर पहा…

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा 

या सिनेमाचं ‘जय भीम’ हे शीर्षक अनेक क्रांतिकारक विचारांचं सिन्थेसिस म्हणून वापरलं आहे!

‘जय भीम’चा घोष न करताही ‘जय भीम’ म्हणता येतं, जो सिनेमाचा नायक सूर्यानं सगळ्या व्यवस्थेला केला आहे

‘जय भीम’ हा तुमचा आवाज आहे, तुमचा उच्चार आहे, हा विश्वास हा चित्रपट आपल्या मनात आणि दलित, पीडित वर्गाच्या अंतकरणात निर्माण करतो

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......