चंद्रकांत पाटील कपिल पाटील यांच्यावर बिथरण्यामागचं खरं कारण काय आहे?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • चंद्रकांत पाटील आणि कपिल पाटील
  • Wed , 14 March 2018
  • सत्तावर्तन राजा कांदळकर चंद्रकांत पाटील कपिल पाटील संघ विनोद तावडे

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, या मराठमोळ्या म्हणीचा जिताजागता प्रत्यय मागच्या मंगळवारी विधान परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विपरित वागण्यामुळे आला. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्री होईपर्यंत हे गृहस्थ फारसे कुणाला माहीत नव्हते. पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेला एक साधा आमदार होईपर्यंत त्यांची मर्यादित ओळख होती. त्यांची खरी ताकद काय की, ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आले हे कुणी सांगू शकत नाही. ते अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी छापही सभागृहात पडली नाही.

अशा सामान्य आमदार, नंतर मंत्री झालेल्या चंद्रकांत पाटील यांना लोक ‘दादा’ म्हणून लागले. संयमी, शांत, समन्वयी नेता अशी त्यांची प्रतिमा बनवली गेली. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जवळचे अशा उपाधीतून त्यांचा दरारा वाढवला गेला. रा.स्व.संघाचे निष्ठावंत असा डांगोरा पिटला गेला. त्यातून चंद्रकात पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातलं भलतंच वजनदार प्रस्थ वगैरे सांगण्यात येऊ लागलं. हे शांत, संयमी, समन्वयी मंत्री कसे नथुराम प्रवृत्तीचे हिंसक, खुनशी, बदलेखोर आहेत, हे ते आमदार कपिल पाटील यांच्याशी ज्या पद्धतीनं वागले त्यातून उघड झालं.

विधान परिषदेत जवानांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह व अवमानकारक बोललेल्या आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाबद्दल चर्चा सुरू होती. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी परिचारक यांचं निलंबन मागे घेऊ नये, त्यांना बडतर्फ करावं असा प्रस्ताव मांडला होता. त्यावर कपिल पाटील बोलत होते. परिचारक यांचं वक्तव्य माफ करण्यासारखं आहे का? परिचारकांचं निलंबन मागे घेण्याअगोदर सरकारनं हे स्पष्ट करावं. त्यांचं निलंबन रद्द करून पुन्हा त्यांना सभागृहात बोलवण्याची घातक परंपरा सुरू होईल. त्यांनी जे शब्दप्रयोग केले ती विचारधारा ज्यांची आहे, ते सत्तेवर असतील तर प्रश्न अधिक गंभीर बनतो. सभागृहाच्या प्रथा-परंपरेला छेद दिला जातो, असं कपिल पाटील बोलत असताना चंद्रकांत पाटील एकदम बिथरले. रा. स्व.संघाच्या विचारधारेबद्दल प्रश्न उपस्थित केल्या केल्या ते कपिल पाटील यांच्या दिशेनं उसळले- वारंवार हा विषय तुम्ही विचारधारेशी का जोडता? सभागृहात बोलत येणार नाही. प्रत्येक वेळी आमच्या विचारधारेबद्दल बोलता. संघाबद्दल आम्ही काहीही सहन करणार नाही.

यावेळी संयमी चंद्रकांत पाटील यांचं खरं रूपडं दिसलं. ते कपिल पाटलांना म्हणाले, तुझी औकात काय? तुला बदडून काढीन.. तू बाहेर भेट. तुला दाखवतोच. चंद्रकांत पाटील यांचा नथुराम अवतार बघून संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, दिवाकर रावते, पांडुरंग फुंडकर, रणजीत पाटील हे चार मंत्री त्यांना आवरत होते. तरी त्यांनाही ते आवरेनात. एवढा त्यांच्या अंगात नथुराम संचारला होता.

चंद्रकांत पाटील यांचा खरा अवतार एवढा प्रकटला की, त्यांना आपण या सभागृहाचे नेते आहोत, वरिष्ठ मंत्री आहोत, याचाही विसर पडला. नथुरामच्या अंगातल्या संचारामुळे ते काहीच्या काही बोलू लागले, संघ माझे मायबाप आहेत, असंही बोलले. हे मायबाप, ते आई-बाप असं ते कुणाकुणाला किती वेळा म्हणाले असतील. त्याविषयी नंतर सोशल मीडियात विनोदावर विनोद पिकले. संघ मायबाप तर मग चंद्रकांत पाटील काय टेस्ट ट्यूब बेबी आहेत काय? असे विनोद नंतर झळकू लागले.

चंद्रकांत पाटील यांच्या अंगात नथुराम संचारल्यानं ते कुणाची औकात काढतात याचं भान त्यांना राहिलं नाही. कपिल पाटील हे कधीही असंसदीय भाषा वापरत नाहीत. अत्यंत अभ्यासू आमदार अशी त्यांची गेली बारा वर्षं विधिमंडळात प्रतिमा आहे. सभागृहात ते अत्यंत संयमी, शिस्तीनं कामकाजात सहभागी होतात. बिनतोड युक्तिवादानं सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात. दोन वेळा ते शिक्षक मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेत. शिक्षणासारखा महत्त्वाचा प्रश्न राजकीय अजेंड्यावर आणण्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल. ते सभागृहात आमदार म्हणून येण्याअगोदर शिक्षण हा विषय दुर्लक्षित होता. कपिल पाटील हे राष्ट्र सेवा दलातून घडलेत. पत्रकारितेत वेगवेगळे प्रयोग करणारा संपादक ही त्यांची ख्याती होती. ‘आज दिनांक’चे संपादक म्हणून त्यांची कारकीर्द महत्त्वाची आहे. समाजवादी चळवळीशी त्यांची बांधीलकी आहे. सध्या ते राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त आहेत.

समाजवादी चळवळीतून आलेले असल्यानं कपिल पाटील यांना संघ परिवारानं उभं केलेलं आव्हान नेमकं कळतं. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर शिक्षणक्षेत्रावर संघीय विचारांचं हावी होणं वाढलं. त्याविरोधात उठलेला मोठा आवाज सभागृहात कपिल पाटील यांचाच होता. विनोद तावडे यांच्यासारखा मंत्री शिक्षणक्षेत्राचा बट्ट्याबोळ करू लागला. त्याचा पर्दाफाश कपिल पाटील यांनीच प्रथम केला. नुस्ता पर्दाफाश करून न थांबता शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवलं तेही कपिल पाटील यांनीच. शिक्षणक्षेत्रातल्या साऱ्या असंतोषाचा आवाज ते बनले. मुंबईजवळ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये शिक्षकांची सरकारी प्रशिक्षणं होऊ लागली. त्याविरोधातही त्यांनी आवाज उठवला. संघविचार शिक्षणक्षेत्रात जिथं जिथं हावी झाला, तिथं तिथं त्यांनी निषेध नोंदवला.

विद्यमान सत्ताधाऱ्यांना सतत प्रश्न विचारतो, संघाचा अजेंडा चव्हाट्यावर मांडतो, म्हणून कपिल पाटील यांच्यावर चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांचा राग आहे. चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात जो थयथयाट केला त्यामागचं खरं कारण तेच आहे.

कपिल पाटील यांना चंद्रकांत पाटील औकात विचारत होते. खरं म्हणजे परिषदेसारख्या सभागृहात औकातीची भाषा वापरणं शहाण्या माणसाचं काम नाही. पण चंद्रकांत पाटील निष्ठावान स्वयंसेवक आहेत. संघविचार हा वर्चस्ववादी विचार आहे. या विचारात प्रत्येक माणसाची औकात ठरवून त्याला काम वाटून दिलेलं असतं. या अर्थानं संघ परिवारात औकात ही कल्पना खूप महत्त्वाची आहे. संघ परिवारात औकात जात, धर्म, वर्ण, लिंग बघून ठरते. म्हणून कनिष्ठ ठरवलेल्या जातीचा माणूस सरसंघचालक होत नाही. महिलांना पुरुष संघात स्थान नाही. त्यांच्यासाठी वेगळी ‘सेविका समिती’ आहे. धर्मांध कारवाया ज्यांच्याकडून करवून घ्यायच्या त्यांच्यासाठी ‘विश्व हिंदू परिषद’ आहे. दांडगाई ज्यांच्या जीवावर दाखवायची त्यांचं ‘बजरंग दल’ आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खून करण्यासाठी वेगळी पथकं आहेत. त्या त्या माणसाची औकात ठरवून त्याच्याकडून शिस्तीनं काम करवून घेणं हे या परिवाराचं वैशिष्ट्य आहे. राजकारणात चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांच्याकडून संघ विचाराचं संरक्षण करवून घेतलं जातं. तोच त्यांचा परिवारात रोल आहे.

स्वतंत्र विचार आणि कृतीला बंदी हे संघाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून संघात कर्तबगार माणसं तयार होत नाहीत. अशा माणसांना सत्ता मिळते, पण ती चालवता येत नाही. सत्ता चालवता आली नाही की, जनतेचा असंतोष वाढतो. आणि सत्ता डुबण्याची वेळ येते. आपली सत्ता डुबणार याची चाहूल चंद्रकांत पाटील यांना बहुतेक लागली असावी, म्हणून ते आदळआपट करत आहेत.

छोट्या माणसांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या की, पेलवत नाहीत म्हणतात. त्याच्या ओझ्याखाली वाकून ती माणसं कार्यनाश करून घेतात. चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीत हे दिसतं.

............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/3506

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

anirudh shete

Wed , 14 March 2018

विनायक एकदम बरोबर बोललात .... प्रथम अक्षरनामा ही चांगली चळवळ वाटली होती पण या व अशा अनेक लेखातुन अक्षरनामा हे केवळ संघविरोधी व सरकारविरोधी अजेंडा चालवत असल्याचे दिसते याना पाटबंधारे भ्रष्टाचार, अण्णाभाऊ साठे महामंडळ भ्रष्टाचार, लवासा सिटी भ्रष्टाचार याबद्दल चकार शब्द काढल्याचे आठवत नाही .... या सर्व संपादक महोद्याना प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ यांच्या सामाजिक कार्याविषयी जसा अनुल्लेख आहे तसाच कॅप्टन अमोल यादव यांच्या पालघर नजीक उभारण्यात येणाऱ्या ३५००० कोटींच्या भव्य अशा देशी विमानांच्या कारखान्याच्या प्रसिद्धीबाबत तिटकारा आहे माध्यमामध्ये वावरताना चुकीच्या बाबीना विरोध करणे जसे आद्य कर्तव्य ठरते तसे अभिमानास्पद कामगिरीची नोंद घेणे तितकेच आवश्यक असते हे बहुतेक संपादक मंडळाला माहित नसावे किंवा प्रामाणिकपणा हा विशिष्ट विचारधारेकडे गहाण ठेवण्यात आलेला असावा


Vinayak P

Wed , 14 March 2018

अहो कांदळकर साहेब, चंद्रकांत दादा यांना मंत्री होईपर्यंत फारसे कोणी ओळखत नव्हते असे विधान तुम्ही केले आहे. ते पाहून हसावे की रडावे ते कळले नाही. अर्थात या बाष्कळ विधानाने दादांना काहीच फरक पडणार नाही. पण पत्रकार म्हणून आपले सामान्य ज्ञान किती 'सामान्य' आहे हे मात्र कळले. अहो तसे पहायला गेलो तर कपिलजी पाटलांच्या बद्दलही विशेष काही माहीत नाही बरयाच लोकांना , पण माहीत असल्याने किंवा नसल्याने काय फरक पडतो हो ? त्यांच्या मतदारसंघात लोक ओळखतात ना, मग बस झालं. आणि तुम्ही म्हणता कि संघात कनिष्ठ जातिच्या लोकांना वगैरे मोठे पद मिळत नाही वगैरे, अहो खांग्रेसमध्ये तरी काय वेगळी परिस्थिती आहे ? तेथे एका घराण्याच्या लोकांसाठीच महत्वाची पदे ठेवली जातात व त्यांच्या फायद्यासाठीच पक्ष चालवला जातो. त्यावर मात्र तुम्ही मौन धारण करता असे का बरे ?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......