कलावंत असो किंवा दिग्दर्शक असो, त्याचा प्रत्येक प्रयोग हा नवीनच असतो. यशाचं कुठलंही गमक, कुठलंही निश्चित सूत्र असू शकत नाही. त्याचप्रमाणे अपयशाचंही नेमकं कारण कोणाला कळत नाही

यातले कुठलेही कलावंत आपल्या यशानं कधीच हुरळून गेले नाहीत. त्यांनी अपयशाला जसं धैर्यानं पचवलं, तसंच यशालाही ते खूप संयमानं सामोरे गेले. त्यांच्या या संयमानंच त्यांचा भविष्यकाळ, भावी काळातील त्यांचं काम अधिक सुकर केलं. दीर्घकालीन केलं. या कलावंतांबरोबरच त्यांच्या सहकाऱ्यांना, तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिक वर्गालासुद्धा ते दिलासा देणारं, आनंद देणारं सिद्ध झालं, असा निष्कर्ष आपल्याला काढता येईल.......