मला चर्चा करता येत नाही. प्रश्नांना तयार उत्तरें देता येत नाहीत. वकिली वृत्ती माझ्याजवळ नाही. मी चर्चा करणारा नसून मानवाची अर्चा करूं पाहणारा आहें...
भारताचे स्वातंत्र्य दृष्टिपथात आले, तेव्हा साने गुरुजींनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीचा पहिला प्रतीकात्मक कार्यक्रम म्हणून ‘अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठीही खुले व्हावे, अन्यथा मी आमरण उपोषण करीन’ अशी घोषणा केली. मात्र पंढरपूरच्या बडव्यांनी दाद दिली नाही, म्हणून १ मे १९४७ रोजी गुरुजींनी उपोषण सुरू केले.......