मी प्रामाणिकपणे ‘कृष्णदेवराय’ सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. वैभवशाली जगाच्या केंद्रस्थानी कृष्णदेवरायाने जसं स्वत:ला बघितलं असेल, तसं त्याचं चित्र उभं करण्याचा हा प्रयत्न आहे
हे पुस्तक उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित आहे, पण आख्यायिका, लोकगीतं आणि लोकस्मृती यांचाही यात गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. मी प्रथम कृष्णदेवरायाचं ‘अमुक्तमाल्यदा’ हे उत्कृष्ट काव्य वाचलं, तेव्हा भारावून गेलो होतो. एक ऐतिहासिक स्रोत म्हणून क्वचितच याचा अभ्यास केला जातो. मात्र अशा साहित्याचं संवेदनशील वाचन नेहमीच कवीच्या मनाची एक अनन्यसाधारण खिडकी उघडून देतं, असं मला वाटतं.......