राज्य निवडणूक आयोगाचा प्रवास निवडणूक सुधारणा, तंत्रज्ञानाचा अवलंब अशा अनेक टप्प्यांतून गेला आहे, जात आहे...
स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्याकडून अधिकार द्यायला राज्ये तेवढी उत्सुक नसतात. त्यामुळे बरेचदा स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज आणि आर्थिक स्थैर्य यांवरही विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियमितपणे घेणे, त्यात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे, आणि विश्वासार्ह संस्था म्हणून स्वतःला प्रस्थापित करणे, हे राज्य निवडणूक आयोगापुढील आव्हान आहे.......