‘दगडावर दगड... विटेवर वीट’ : स्वतःच्या आयुष्यातल्या आठवणी सांगण्याच्या निमित्तानं काहीही भरताड वाचकांच्या माथी मारणाऱ्यांनी ‘दगडावर दगड, विटेवर वीट’ रचून किती चिरेबंदी इमारत बांधता येते, ते एकदा डोळ्याखालून घालावं

हे आत्मनिवेदन असलं तरी त्यात कुठं कणभरही आत्मसमर्थन नाही, उलट कठोर आत्मपरीक्षण आहे. ललितलेखन असलं तरी भाबडं स्मरणरंजन किंवा भावुकपणा औषधालाही नाही. विषयाच्या ओघानं काही माहिती आली तरी त्यामागं स्वतःचं ज्ञान दाखवण्याची हौस नाही. इतकं प्रवाही, निखळ पारदर्शक, अंतरंगाला भिडणारं आणि विचार करायला लावणारं लिखाण फार क्वचित पाहण्यात येतं .......