चीनविषयी आत्ताच एक स्वप्न पाहिलं, स्वप्नात आलं मोदींचं भाषण!
संकीर्ण - व्यंगनामा
रवीश कुमार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 20 March 2019
  • संकीर्ण व्यंगनामा रविशकुमार Ravish kumar पिचकारी Pichkari नरेंद्र मोदी Narendra Modi चीन China

भाइयों-बहनौं, आम्ही चीनला पिचकारी मारून-मारून रंगवून टाकू. चीननं दहशतवादाची पाठराखण केली आहे. त्याची शिक्षा भोगायला लागेल. आम्ही पाकिस्तानला घुसून मारलं. आता चीनला पिचकारीनं मारू. होळीच्या आधी जेवढ्या काही चिनी पिचकाऱ्या आल्या आहेत, मी प्रत्येक देशभक्ताला आवाहन करतो की, त्यांनी फक्त तीन गोष्टी घेऊन सीमेवर पोहचावं – एक बादलीभर पाणी, रंग आणि चीनची पिचकारी. यावेळी आपण सगळे चिनी पिचकारीनेच चीनच्या सैन्याला इतकं भिजवून टाकू की, शिंकून शिंकून चीनची बोलती बंद होऊन जाईल.

भाइयों-बहनौं, मी सर्व टीव्ही अँकर्सना ट्विट केलं आहे की, त्यांनी टीव्ही स्टुडिओत पिचकारी घेऊन अँकरिंग करावं. आता प्रत्येक भारतीयांसाठी काँग्रेस चीनची समर्थक झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. चीननं पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. अँकर्सना आवाहन आहे की, त्यांनी काँग्रेसचे प्रवक्ते आलोक आणि राजीव त्यागी यांना रंगांत पूर्ण रंगवून टाकावं. आम्ही बदला घेऊ. हर हर मोदी, घर घर होली!

पंतप्रधानांचं हे भाषण ऐकून मी व्हॉटसअॅप विद्यापीठाकडे वळलो. इनबॉक्समध्ये पडलेली पुस्तकं उलटू लागलो. एका डाव्या प्राध्यापकानं तो भाग गायब केला होता, ज्यात चिनी पिचकारीच्या विरोधाचा इतिहास लिहिलेला होता. सकाळपासून एकही मॅसेज आला नाही की, आज चिनी पिचकाऱ्यांवर बहिष्कार टाकला जाईल. जो भारतीय चिनी पिचकारी विकेल, तो मसूद अज़हरचा जावई असेल. स्वत:चं व्हॉटसअॅप स्टेटस तयार केल्यानंतर ते मी ‘अबकी बार, पिचकारी सरकार’ या ग्रूपवर पाठवून दिलं. तिथून ते व्हायरलं झालं.

चीन नेहमीच दहशतवादाचा मित्र राहिला आहे. आपल्याला चीनची साथ द्यायची नाही. जे लोक चिनी सामान आणून भारताचा पैसा बिजिंगला पाठवतात, आम्ही त्यांना दार्जिलिंगला पाठवू. तिथं त्यांना भारतीय ‘मोमो’ बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. आम्ही चीनला घुमघुम घुमवलं, पण चीननं आम्हाला घुमवलं. आमचं काम झालं आहे. सरदार पटेल यांचा पुतळा आम्ही बनवला आहे. चीनचे इंजिनीअर परत गेले आहेत. भारतीय कामगार बिनपगारी पटेलांचं संरक्षण करू शकतात.

पण आम्ही चीनची ही धमकी ऐकून घेऊ शकत नाही. तेव्हाच टीव्हीवर पंतप्रधानांचं अजून एक भाषण आलं. ते जनतेला विचारत होते - चीन को घर में घुस कर मारना चाहिए कि नहीं? एका अँकरनं आव्हान दिलं. चीनशी युद्धाचे सर्व्हे होऊ लागले. पंतप्रधानांचे समर्थक सीमेवर पिचकारी भरून घेऊन जाताना दिसत होते.

किती काळ आम्ही चीनविषयी चूपचाप बसून राहायचं? नेहरू चूप बसले होते, पण नरेंद्र मोदी चूप बसणार नाहीत. जे नेहरू करू शकले नाहीत, तेच तर मोदी करतात! ते झोपळा झुलवू शकतात, तसाचं झटकाही देऊ शकतात.

तेवढ्यात व्हाटसअॅप विद्यापीठात एक मॅसेज येतो. चीनचा विरोध पिचकारी आणि फुलझडीपर्यंतच मर्यादित ठेवायचा आहे. टीव्ही अँकर्सना चीनसोबत शांततेची बोलणी करायची आहेत. चीननं मसूद अज़हरची साथ देऊन पुलवामाच्या शहिदांचा अपमान केला आहे, हे बोलायचं नाही. ‘चीनबाबत चुप्पी’सारख्या ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर चालवायच्या नाहीत. ‘चीन डर गया भारत से’ किंवा ‘भारत डर गया चीन से’ यासारखे नारे टीव्ही वाहिन्यांवर दिसता कामा नयेत. एकजण न्यूजरूममध्ये जाऊन सर्वांना झापत होता. संपादक ‘मूर्गा’ होऊन बसलेले होते. संपादकांचे मालक अमित शहांकडून ब्रीफकेसमधून सूचना घेत होते. ‘जाहिराती’चं नवं नाव ‘सूचना’ असं आहे.

तेवढ्यात कुणीतरी जोरात ओरडतं. पंतप्रधान मोदींचं लाईव्ह टीव्ही वाहिन्यांवर येऊ लागतं. ते म्हणतात - भाइयों और बहनों, काँग्रेसनं शहिदांचा अपमान केला आहे. तिला हरवायचं आहे. म्हणजे चीनचा आपोआप पराभव होईल. आमचं परराष्ट्रीय धोरण इटावापासून बेगुसरायपर्यंत हिट आहे. आम्ही जिंकत आहोत. आम्ही पाकिस्तानला घुसून मारलं आहे. तुम्ही त्यातच हेही समजून घ्या की, आम्ही त्याचा दोस्त पाकिस्तानलाही मारलं आहे. आम्ही एक अधिक एक नाही करत, आम्ही एकाचे चार करतो, एकाचे चार!

मी स्वप्नातून बाहेर येत होतो. झोपेतून हळूहळू जागा होऊ लागलो. खिडकीत बसून पावसाचे थेंब मोजू लागलो. मतदान केंद्रांवर मतदान होत होतं. लोक आपल्या असत्यापासून हरत होते. गावागावात लोक म्हणत होते की, परराष्ट्रनीतीमध्ये मोदी जिंकले आहेत. चिनी पिचकारीनं चीनला हरवलं आहे.

टीव्ही अँकरनं जाहीर केलं, ७० वर्षांत असं कधीही झालं नाही. आज पहिल्यांदा असत्य जिंकलं होतं. मी जागा झालो होतो. व्हॉटसअॅप विद्यापीठाच्या इनबॉक्समध्ये मॅसेजेस पाहत होतो. आतापर्यंत तरी चिनी पिचकारीवरील बहिष्काराचं कुठलंही आवाहन आलेलं नाही. तुमच्याकडे असे मॅसेजेस येत आहेत का?

(स्वैर अनुवाद - टीम अक्षरनामा. रवीश कुमार यांची मूळ हिंदी पोस्ट १४ मार्च १९ रोजी दुपारी १.१९ ला प्रसिद्ध झाली आहे.)

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 21 March 2019

अहो Avadhut Raja, त्या रवीशकुमारांच्या पावलावर पाऊल टाकून मीही थोडीशी भांग घेतली तर काय बिघडलं हो? महाजनांचे अनुकरण करावे, असं लोकं म्हणतात. आपला नम्र, -गामा पैलवान


Avadhut Raja

Thu , 21 March 2019

@टिम अक्षरनामा जिकडे तिकडे आपल्या निर्बुद्ध मतांची पिंका टाकणार्‍यांना आवरा. कमेंट सेक्शन डिसेबल्ड करा. लोकसत्ताने ते बरोबर केले आहे, तुम्ही पण करा. अन्यथा फेसबुक, ट्विटर, काही दैनिकांच्या वेबसाईट्स आणि काही मराठी भाषेच्या फोरम साईट्स वर "बॉट्स" लोकांच्या पातळी घसरलेल्या ज्या चर्चा चालतात त्या इथेही होतील.


Gamma Pailvan

Wed , 20 March 2019

हा लेख म्हणजे होळीच्या तब्बल एक आठवडा आधी भांग घेतल्याचा परिणाम आहे. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......