चित्ते, हरिणमाता आणि फेकस्टोरीमागची ट्रु स्टोरी!
संकीर्ण - फोटोएसे
टीम अक्षरनामा
  • हेच ते फेसबुकवर व्हायरल झालेलं छायाचित्र (लेखातील इतर छायाचित्रं http://www.alisonbuttigieg.comवरून साभार)
  • Thu , 16 February 2017
  • फोटोएसे चित्ता Cheetah हरिण Impala अॅलिसन बुटिगेग Alison ‌Buttigieg

गेल्या तीन-चार दिवसांत फेसबुकवर एका हरणाच्या मातृप्रेमाची पोस्ट फिरत आहे. एक हरिणमाता आपल्या पिल्लांसोबत जंगलामध्ये फिरत असताना चित्त्यांच्या तावडीत सापडतात. चित्ते त्यांचा पाठलाग करू लागतात, तेव्हा हरिणमातेला कळून चुकतं की, आपली पिल्लं या चित्त्यांच्या तावडीत सापडणार. तेव्हा ती थांबून पिल्लांना पळून जायला सांगते आणि स्वत: चित्त्यांच्या स्वाधीन होते. ती थांबल्यामुळे चित्तेही थांबून तिच्यावर तुटून पडतात. पण ती आपली पिल्लं दिशेनाशी होऊपर्यंत त्यांच्यावरून नजर हटवत नाही, तोवर चित्त्यांना स्वत:च्या शरीराचे लचके तोडू देते…

अशा आशयाची ही पोस्ट कुणीतरी फेसबुकवर छायाचित्रासह टाकली. मग काय त्यावर लाईक्स, कमेंट, शेअर यांचा धडाका सुरू झाला. मातृप्रेमाचं उदात्तीकरण सांगणाऱ्या कमेंट केल्या जाऊ लागल्या. अनेक जण मातृप्रेमाचा सर्वोच्च आविष्कार म्हणून तो फोटो शेअर करू लागले. चित्त्यांच्या तावडीत सापडलेल्या हरणाचा फोटो आहेच इतका, जबरदस्त की कुणाला त्याची शंका आली नाही.

त्यात या छायाचित्राला सर्वोत्तम छायाचित्राचा पुरस्कार मिळाला आणि हे छायाचित्र काढणारी छायाचित्रकार काही काळ नैराश्यच्या गर्तेत गेली होती, यावरही अनेकांचा विश्वास बसला. त्यामुळे फेसबुकवर आईची महती सांगणारी वचनं, सुभाषितं, किस्से, स्वानुभव यांचा पाऊस पडला. आईविषयाच्या कवितांपासून संस्कृत सुभाषितांपर्यंत मातृप्रेमाचं महन्मंगल स्तोत्र गायलं गेलं.

ही पोस्ट गेले तीन-चार दिवस फेसबुकवर प्रचंड लोकप्रिय झाली. पण ही फेकस्टोरी आहे. कुणीतरी अर्धवट माहितीच्या आधारे ती फेसबुकवर टाकली हे आता उघड झालं आहे. ते छायाचित्र काढणाऱ्या छायाचित्रकार alison buttigieg यांच्याशी काही इंग्रजी वर्तमानपत्रांनी संपर्क साधला. तेव्हा त्यामागची ट्रु स्टोरी समोर आली.

अॅलिसन ही वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आहे. http://www.alisonbuttigieg.com या तिच्या बेवसाईटवर तिने काढलेली कितीतरी छायाचित्रं आहेत. त्यात वरील चित्ता-हरिणाविषयीची छायाचित्रं आहेत. त्याविषयी अॅलिसनने आपल्या बेवसाईटवर लिहिलं आहे –

यापुढे अॅलिसनने या ट्रु स्टोरीची तब्बल नऊ छायाचित्रं दिली आहेत.

ही हरिणमातेच्या असीम त्यागाची गोष्ट नसून चित्त्याची मादी तिच्या दोन बछड्यांना शिकार करायला शिकवते, त्याची गोष्ट आहे.

तिघांच्या तावडीत सापडल्याने हरिण हतबल झालं होतं.

सुरुवातीला चित्त्याच्या मादीने हरणाचा जबडा पकडून आपल्या बछड्यांना मार्गदर्शन केलं. नंतर त्यांनी हरणावर चाल केली.

पण बछडेच ते. त्यांना या साऱ्या प्रकाराची गंमत वाटत होती. त्यामुळे ते हरणाला खेळवतही होते.

हरणाला आपलं मरण समोर दिसत होतं, पण काहीच करता येत नव्हतं.

हेच ते फेसबुकवर व्हायरल झालेलं मूळ छायाचित्र. हरण आपल्या पिल्लांकडे टक लावून वगैरे पाहत नसून समोर मृत्यू पाहत आहे.

शेवटी बछड्यांनी हरणाला जमिनीवर पाडायला सुरुवात केली.

बछड्यांची आई सोबत होतीच.

हरणाला भुईसपाट करण्यात अखेर बछड्यांना यश आलं. त्यांच्या आईने अखेर हरणाची वेदनेपासून सुटका केली आणि आपल्या बछड्यांना ताजी शिकार मिळवायलाही शिकवलं. ‘जीवो जिवस्य जिवनम’ हे जंगलाचं सूत्र आहे. त्यानुसार चित्त्यांनी या हरणाची शिकार केली.

या फेकस्टोरीविषयी नाराजी व्यक्त करत ही छायाचित्रं काढल्यानंतर आपल्याला नैराश्य वगैरे काहीही आलं नव्हतं, हे स्पष्ट करणारी पोस्ट अॅलिसन यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिली.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......