जगन्मित्र सुनील कर्णिक यांच्या पायांवर चक्र असावं. ते आता भ्रमंतीला निघाले असतील.
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
अनंत देशमुख
  • सुनील कर्णिक आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Fri , 18 May 2018
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो सुनील कर्णिक Sunil Karnik अनंत देशमुख डिंपल पब्लिकेशन्स Dimple Publication

अमेरिकेला आल्यापासून सातत्यानं व्हॉटसअॅपवर माझा संपर्क जवळपास ७०-७५ मित्रांशी आहे. त्यातही विशेषत्वानं सुनील कर्णिक यांच्याशी आहे. ते हाडाचे साहित्यिक आहेत. त्यांच्या घरातच लहापणापासून रवींद्र दुर्वे या मामांना त्यांनी लिहिता वाचताना पाहिलं. ते लेखक होते. त्यामुळे घरात पुस्तकं येत होती. ‘सत्यकथा’, ‘मौज’, ‘ललित’चे अंक येत. ते ते वाचत. तिथं साहित्याची गोडी निर्माण झाली. एम.ए.ला असताना ‘आलोचना’मध्ये त्यांची परीक्षणं प्रसिद्ध होऊ लागली. एके दिवशी त्यांना मामांनी श्री. पु. भागवत यांच्या ‘मौज’ कचेरीत नेलं. श्रीपुंच्या व्यक्तित्वाचा दाट संस्कार त्यांच्यावर झाला. ‘मौज’मध्ये त्यांच्यातला संपादक घडत गेला. मग ‘ललित’, ‘महानगर’, ‘नवशक्ति’, ‘आज दिनांक’, ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ’ वगैरे ठिकाणी त्यांनी संपादक म्हणून काम केलं. त्यात विशेषत्वानं त्यांची छाप पडली ती वाड्मयीन स्वरूपाच्या संपादनावर. ‘मौज’मध्ये असताना त्यांच्यातील हे गुण श्रीपुंनी हेरले होते.

याच काळात त्यांचा मोठ्या साहित्यिकांशी संपर्क झाला. विजय तेंडुलकर, अशोक शहाणे, अरुण कोल्हटकर, दिलीप चित्रे, सु. रा. चुनेकर. मराठीतील सहित्यिकांमध्ये असलेल्या त्यांच्या संचारामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. यातूनच पुढे ते अनेक प्रकाशकांचे सल्लागार झाले. त्यांनी अनेक संहितांची संपादनं केली. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या टोपणनावांनीही त्यांनी विपुल लेखन केलं. अलीकडेच विविध नियतकालिकांच्या फायलींमधून विखुरलेल्या स्वरूपात असलेलं त्यांचं लेखन सहा पुस्तकांच्या संचाच्या रूपानं प्रकाशित झालं. आणखीही काही प्रकाशनच्या मार्गावर असेल.

मराठी साहित्यव्यवहार हा त्याचा सततचा ध्यासाचा विषय आहे. त्यांना एक वेळ कांद्याचे भाव माहिती नसणार. (कारण ते काम चोखपणे वहिनी करतात.)  पण साहित्यातील बारीकसारीक घटना, प्रसंग, व्यक्ती यांच्या संबंधीची त्यांची जाणकारी कौतुकास्पद आहे.

ते आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनासंबंधी वा प्रश्नासंबंधी चुकूनही बोलणार नाहीत, ना ते तुमच्या या संबंधीच्या प्रश्नाविषयी कुतूहल दाखवणार. त्यांचे देणंघेणं कोणाशी असेल तर ते फक्त साहित्याशी. त्यामुळे यासंदर्भात माझ्याशी त्यांचा जो संवाद होत राहिला आहे, तो प्रतिनिधिक स्वरूपाचा समजता येईल.

त्यांचं मन नेहमीच सजग असतं आणि त्यांना पडणाऱ्या प्रश्नांना कसलंच बंधन नसतं. कधी ते एखाद्या पाश्चात्य कलावंताबद्दल, वैज्ञानिकाविषयी कुतूहलानं प्रश्न विचारतील, कधी एखाद्या साहित्यिकाच्या जन्मशताब्दीविषयी, कधी लेखकाच्या ग्रंथांच्या संपादनाविषयी, कधी एखाद्या नियतकालिकाच्या सूचीविषयी चौकशी करतील. ते एवढ्याच करता की, त्यांना नेहमी कोणाकडून आपली मतं पडताळून घ्यायची असतात. उदाहरणार्थ,

१. ‘ठणठणपाळ’वर कोण काम करील?

२. नोव्हेंबर २०१९ मध्ये पुलंची जन्मशताब्दी येत आहे. ती कशी साजरी करावी?

३. शांताबाई शेळक्यांवर रसग्रहणात्मक पुस्तक यायला हवं. कोण करेल?

४. ‘वादातले पुल’ कोण करेल?

५. ‘ललित’ची सूची झालेली नाही? ताबोडतोब झाली पाहिजे. कोण करेल?

६. ‘ते शंभर ठाणेकर’मध्ये तुम्ही आजच्या कोणत्या ठाणेकरांचा समावेश कराल?

७. चिं. त्र्यं. खानोलकरांना न्याय कोण देईल?

आणखी एक प्रकार म्हणजे आपल्याला जे माहीत आहे, ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची धडपड. उदाहरणार्थ,

१) आंबेडकरांनी पाली भाषेचा शब्दकोश तयार केला होता, हे फारसं कोणाला ठाऊक नाही.

२) ‘पुलंचं असंग्रहित लेखन’ या शीर्षकाखाली त्यांनी पुलंच्या असंग्रहित लेखांची नोंद करून ती संबंधितांना पाठवून दिली.

मी अमेरिकेत मुलांकडे आलो आहे, हे त्यांना माहीत असल्यानं इथून मी कोणकोणत्या विषयांवर टिपणं लिहून पाठवावीत म्हणून त्यांनी केलेल्या सूचना पाहा-

१) पाश्चिमात्य वाड्मयीन आणि सांस्कृतिक घडामोडी, व्यामिश्र संस्कृती, भारतीय व मराठी माणसं यांची रंगतदार माहितीही अधूनमधून लिहावी.

इतर समानशील व्यक्तींसाठी सतत काहीतरी करण्याची ऊर्मी त्यांच्यापाशी आहे. अलीकडेच ते बदलापूरला श्याम जोशी यांच्या ‘ग्रंथसखा’ या वाचनालयाला भेट देऊन आले. त्यासंबंधी त्यांनी लिहिलं आहे-

“बदलापूर येथील श्याम जोशी यांचा अफाट दुर्मीळ ग्रंथसंग्रह पाहून आज तृप्त झालो. तिथं पुन्हा पुन्हा जाण्याची तीव्र इच्छा आहे... त्यांच्यासाठी काही उपक्रम सुरू करावेसे वाटतात.. पाहू कसं जमतं ते...”

काही इंग्रजी पुस्तकांविषयी किंवा लेखक, साहित्यिक, वैज्ञानिकांविषयी त्यांना विलक्षण कुतूहल असतं. टेसला या एडीसनच्या समकालीन वैज्ञानिकाचं मराठीत चरित्र लिहिलं गेलं पाहिजे, असं त्यांना आवर्जून वाटतं. त्यासंबंधात त्यांनी लिहिलं आहे-

“त्याच्या आत्मचरित्राची / चरित्राची प्रत येताना अवश्य आणावी... आपण दोघं मिळून त्याचं चरित्र लिहू या...”

इतकंच नव्हे तर अलीकडे मी एडीथ फिफ या जगप्रसिद्ध गायिकेविषयी लिहिलं, ते वाचल्यावर त्यांनी आपल्या एका पत्रकार विद्यार्थिनीला तिचं चरित्र लिहिण्याची सूचना केली आहे. त्याच बरोबर त्यांना कोशवाड्मय आणि कॅटलॉगमध्ये रूची असल्यानं मला प्रश्न विचारला आहे-

“Chicago University Pressचं ‘Mannual of style’ हे पुस्तक मला विकत हवं आहे. कुठं मिळेल? किंमत किती असेल?”

त्यांना अध्यापनात रस असल्यानं मुंबई पत्रकार संघातर्फे जे वर्ग घेतले जातात, तिथं ते गेली अनेक वर्षं तळमळीनं शिकवत आले आहेत. आणि आज मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत. त्यांना सामाजिक कामाची आच असल्यानं सारा महाराष्ट्र त्यांनी पायाखाली घातला आहे. नुकतंच वारली चित्रकार जीव्या सोमा म्हसे यांचं निधन झालं. ती बातमी त्यांनी ताबोडतोब व्हॉटसअॅपद्वारे संबंधितांपर्यंत पोहोचवली.

आपल्या मराठी साहित्याचं जागतिक साहित्य विश्वात कसं स्वागत होईल, हा माझा कुतूहलाचा प्रश्न. त्याला उत्तर देताना त्या़ंनी लिहिले-

“ ‘कोसला’चा अनुवाद पूर्वीच झालेला आहे. त्याचं खास स्वागत झालं नाही.”

मराठी साहित्याच्या थिटेपणाविषयी मी त्यांना छेडलं तर त्यांनी पुढील उत्तर दिलं-

“बाकीचे मौनी बाबा असतात. Ours is a sick society.”

त्यांनी दिलेली उत्तरं आपल्याला अंतर्मुख करायला लावतात.

जगन्मित्र सुनील कर्णिक यांच्या पायांवर चक्र असावं. मनात नवनवीन कल्पना रचत ते आता भ्रमंतीला निघालेही असतील.

.............................................................................................................................................

कर्णिकांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

‘महानगर’चे दिवस ​- सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १५० रुपये.

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4348

न छापण्याजोग्या गोष्टी - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २२० रुपये. 

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4349

महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २०० रुपये.

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4350

म्हाताऱ्या बायका काय कामाच्या? - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १५० रुपये. 

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4351

मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १८० रुपये.

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4352

सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १८० रुपये.

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4353

.............................................................................................................................................

लेखक अनंत देशमुख समीक्षक, संपादक आहेत.

dranantdeshmukh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......