मोदी म्हणतात, बलात्काराचं राजकारण करू नका; पण पक्ष, नेते, मंत्री बलात्कार, राजकारण सगळं काही करतात!
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Sat , 21 April 2018
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी

कटुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या प्रकरणात भाजप नेत्यांचा सहभाग उघड झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगोलग कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र या दोन्ही प्रकरणांचा देश-विदेशातील प्रसारमाध्यमांतून गाजावाजा व्हायला लागल्यानंतर आणि मोदी, भाजप यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी ‘पीडित मुलींना न्याय मिळेल’ अशी मोघम प्रतिक्रिया दिली. त्यानंतर या आठवड्यात मोदी युरोपच्या दौऱ्यावर गेले. त्यात लंडनमध्ये त्यांची बहुधा त्यांनीच आधी काढून दिलेल्या प्रश्नांवर गीतकार प्रसून जोशी यांनी मॅरेथॉन मुलाखत (१८ एप्रिल रोजी) घेतली. त्यात मोदी मोठ्या आत्मविश्वासानं म्हणाले, ‘बलात्कार हा बलात्कार असतो. त्याचं राजकारण करू नका.’ हा त्यांचा सल्ला बहुधा कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणांवरून मोदी आणि त्यांच्या पक्षावर टीका करणाऱ्यांना असावा. विशेषत: विरोधी पक्षांना. कारण उघड आहे, त्यांचा पक्ष बलात्काराचं राजकारण करतो. मोदींच्या विधानानंतर दोनच दिवसांनी (२० एप्रिल २०१८) दै. डेक्कन हेरॉल्डमध्ये कर्नाटक भाजपची पहिल्या पानावर जाहिरात प्रकाशित झाली. ती अशी -

मोदींचा पक्ष बलात्काराचं राजकारण करतो आणि पक्षनेते, कार्यकर्ते, मंत्री काय करतात? काही उदाहरणं पहा -

कठुआ बलात्कार व हत्येप्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मोर्च्यामध्ये भाजप (जम्मू-काश्मीर)च्या दोन मंत्र्यांचा समावेश, १४ एप्रिल २०१८

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/kathua-rape-two-bjp-cabinet-ministers-quit/articleshow/63752377.cms

भाजप (उत्तर प्रदेश) आमदार कुलदीप सेंगर यांना बलात्कार प्रकरणी अटक, १३ एप्रिल २०१८

http://thewirehindi.com/39910/unnao-rape-case-bjp-mla-kuldeep-sengar-arrested-by-cbi/

भाजप (मुंबई) नगरसेवक अनिल भोसले यांच्यावर बलात्काराचा आरोप, २१ जाने २०१७

http://indianexpress.com/article/cities/mumbai/mumbai-bjp-corporator-booked-for-rape-4484437/

चार भाजप (गुजरात) आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल, ८ फेब्रुवारी २०१७

http://www.thehindu.com/news/national/Four-BJP-leaders-among-accused-in-Gujarat-rape-case/article17243603.ece

भाजप (दिल्ली) आमदार विजय जॉली यांना बलात्कार प्रकरणी अटक, २७ फेब्रुवारी २०१७

https://www.indiatoday.in/india/story/vijay-jolly-former-delhi-bjp-mla-rape-case-sexual-assault-962208-2017-02-23

भाजप (केरळ) माजी आमदार हरतल हालाआप्पा बलात्कार प्रकरणात अटक, १८ ऑगस्ट २०१७

https://www.thenewsminute.com/article/bjp-leader-hartal-halappa-acquitted-rape-case-will-bsy-loyalist-get-ticket-2018-67010

भाजप आमदार (उत्तराखंड) हरक सिंग रावत यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, ३० जुलै २०१६

https://www.firstpost.com/india/uttarakhands-bjp-leader-harak-singh-rawat-accused-in-rape-case-2924520.html

हॉटेलमध्ये बलात्कार प्रकरणी भाजप आमदार उमेश अग्रवाल यांना अटक, १८ सप्टेंबर २०१५

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/court-frames-rape-charges-against-bjp-mla-umesh-aggarwal-two-others/articleshow/49013662.cms

Woman takes U-turn, tells Delhi court not raped by BJP MLA Umesh Aggarwal & others, October 1, 2015

http://indianexpress.com/article/india/india-others/woman-takes-u-turn-tells-court-not-raped-by-bjp-mla-umesh-aggarwal-others/

भाजपचे महाराष्ट्राचे प्रवक्ते मधु चव्हाण यांना पक्षातील महिलेवरील बलात्कार प्रकरणी अटक, ९ मे २०१३

https://www.indiatoday.in/india/west/story/maharashtra-bjp-leader-madhu-chavan-booked-for-raping-ex-party-worker-162274-2013-05-09

भाजप मंत्री (मध्यप्रदेश) राघव यांना बलात्कार प्रकरणी अटक, ९ जुलै २०१३

http://www.thehindu.com/opinion/blogs/blogs-end-of-the-day/article4920695.ece

भाजप नेते (उत्तराखंड) प्रमोद गुप्ता यांना बलात्कार प्रकरणी जन्मठेप, २६ सप्टेंबर २०१३

http://archive.indianexpress.com/news/former-bjp-leader-pramod-gupta-sentenced-to-life-imprisonment-for-rape/1174683/

भाजप (कर्नाटक) आमदार जीवराज यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, ८ नोव्हेंबर २०१३

https://www.firstpost.com/india/karnataka-bjp-mla-jeevaraj-charged-with-raping-23-year-old-1219583.html

भाजप नेता (मध्य प्रदेश) चा ऑफिसमध्येच महिलेवर बलात्कार, २८ डिसेंबर २०१२

https://timesofindia.indiatimes.com/india/Woman-claims-rape-inside-BJP-office-in-MP/articleshow/17788070.cms

भाजप नेते (पंजाब) अशोक तनेजा यांना स्वत:च्या मुलीवर सलग आठ वर्ष बलात्कार, २६ मार्च २००९

http://archive.indianexpress.com/news/bjp-leader-booked-for-raping-daughter-for-8-yrs/439215/

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Thu , 26 April 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......