देहदानाविषयीची उपयुक्त माहिती देणारं पुस्तक
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
टीम अक्षरनामा
  • ‘देह दानाचे मंदिर’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 15 September 2017
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो देह दानाचे मंदिर Deh Danache Mandir श्रीकृष्ण जोशी Shrikrushna Joshi

या पुस्तकात देहदान, नेत्रदान, अवयवदान, त्वचादान, मृत्यूपत्र, वैद्यकीय इच्छापत्र, वैद्यकीय विमा या विषयांवरील पत्रके, लेख, माहिती, फोन नंबर, आवेदनपत्रे यांविषयीची माहिती दिली आहे. ही सर्व माहिती संपादकांनी वेगवेगळ्या मराठी वर्तमानपत्रांमधून संकलित केली आहे.

‘दान’ या संकल्पनेचे भारतीय संस्कृतीत बरेच माहात्म्य सांगितले गेले आहे. मात्र देहदानाविषयी अजूनही तितकीशी जागृती सुशिक्षित समाजातही झालेली नाही. किंबहुना त्याविषयी अनेकांना फारशी माहितीही नसते. बहुतेकांनी ती जाणून घेतलेली नसते. काहींना देहदान करायचे असते, पण त्याविषयीची माहिती त्यांना नसते. आणि ती कुणाकडे मिळेल, याचीही अनेकदा त्यांना गंधवार्ता नसते.

अशा देहदानशुरांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.

नेत्रदान, रक्तदान, या संकल्पना आता तितक्या नावीन्यपूर्ण राहिलेल्या नाहीत, पण देहदान, अवयवदान, त्वचादान या संकल्पना मात्र अजून फारशा रुळलेल्या नाहीत. त्याविषयीची माहिती या पुस्तकातून मिळते.

उदा. अवयवदान वा त्वचादान कसे करावे, त्यासाठीच्या अर्जांचे नमुने, संबंधित ठिकाणांचे पत्ते अशी माहिती दिली आहे. स्टेट बँकेतील निवृत्त अधिकारी असलेल्या जोशींनी ही उपयुक्त पुस्तिका संकलित केली आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या विक्रीतून जमा झालेले पैसे ‘देहदान मंडळ, पुणे’ वा नेत्रदान\त्वचादान\अवयवदान यांचा प्रसार करणाऱ्या संस्थेस दिले जाणार आहेत.

तेव्हा देहदानाच्या या ‘कारवाँ’मध्ये सहभागी व्हायला हरकत नाही, नाही का?

देह दानाचे मंदिर : संकलक-संपादक-प्रकाशक - श्रीकृष्ण जोशी

पाने – १२८, मूल्य – १०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3996

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......