रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

किणीकर चार ओळी लिहितात आणि आपल्याला केवढा प्रवास घडतो! कला आणि निसर्ग हा संवेदनशील लोकांचा विसावा असतो. हे रुबाई लिहिणारे लोक मूळचे आध्यात्मिक. किणीकर आध्यात्मिक होते ह्या विषयी कुणाच्या मनात काही शंका असायचे कारण नाही. आता पर्यंत ते अनेक रुबायांमध्ये दिसलेलेच आहे. पुढेही ते दिसत राहीलच. स्वतः उमर खय्याम सूफी होता. पण ह्या लोकांना अध्यात्माच्या अलीकडे जे आहे ते जगून घ्यायचे आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......

जागतिकीकरणाच्या परिणामांच्या परिप्रेक्ष्यात १९९०नंतरचा महाराष्ट्र, जनजीवन आणि जनआंदोलने, हे या पुस्तकाचे मध्यवर्ती सूत्र आहे...

नव्वदच्या दशकात जागतिकीकरण आणि आर्थिक नवउदारमतवादी धोरणे राबवण्याच्या प्रक्रियेतून जगभर प्रचंड बदल झाले. महाराष्ट्रातल्या बदलांचा मागोवा या घेतला असून तो वाचकांना एक व्यापक दृष्टी देऊ शकतो. यात महाराष्ट्रातले विविध प्रश्न समजून घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी वैचारिक भूमिका स्पष्ट करणारे महत्त्वाचे लेख आहेत. सर्व प्रत्यक्ष चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात वैचारिक स्पष्टता दिसते.......

‘निवडणूक’ नावाच्या खेळाच्या शेवटच्या ‘राऊंड’साठी, म्हणजे येत्या १०० दिवसांसाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ‘पंचसूत्री’ कार्यक्रम दिला आहे, पण…

मोदीजींनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना असा ‘पंचसूत्री’ कार्यक्रम देऊन नेहमीप्रमाणे कामाला लावलं आहे. विरोधी पक्षाकडे अशी कुठली पंचसूत्री असल्याचं त्यांनी अजून तरी जाहीर केलेलं नाही. उलट त्यांनी मेटाकुटी करून एकत्र येण्याचं आवसानही लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागलीय, तसं गळतच चाललं आहे. रोज कुणीतरी आपला स्वतंत्र बाणा जाहीर करतंय, रोज कुणीतरी काँग्रेसशी ‘घटस्फोट’ घेत असल्याच्या ‘वार्ता’ येताहेत.......

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

प्रशान्त, तुझ्या लेखनातले धागेदोरे ‘सिम्फनी’मय असतात. त्यात ‘डिस्टॉर्शन’चं सौंदर्य आहे. या लेखनात ‘सुरूप-कुरूप’च्या पलीकडचं काही असतं. ‘चक्रमपणा’ही असतो…

तुझ्या लेखनात चक्रमपणा आहे, परंतु तो निव्वळ चक्रमपणा म्हणून येत नाही. म्हणजे पर्वती पायांवर चालून चढता येते, तर मी ती हातांवर चालून चढून दाखवतो, अशा तर्‍हेचा तो चक्रमपणा नाही. त्या चक्रमपणाला स्वतःची चक्रम शिस्त आहे. मला असं वाटतं की, त्याचं मूळ तुझ्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात आहे. तू जे तत्त्वज्ञान वाचलं आहेस, ते तुला पचलेलं आहे. तू अर्धा-कच्चा नाही आहेस. तुझ्या ‘डिस्टॉर्शन्स’मधून ‘ब्युटी’ दिसत राहते.......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

खरं तर मी ‘एनईपी-२०२०’ला ‘राष्ट्रीय हकालपट्टी धोरण’ म्हणेन. देशातील नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यासाठीच हे धोरण आणलं आहे

कुठलंही ‘शिक्षण धोरण’ आपल्या राज्यघटनेमधील तीन गोष्टींशी ताळमेळ असणारं हवं. एक - संविधानाची प्रस्तावना. दुसरं म्हणजे मूलभूत अधिकार आणि त्यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार व समानतेचा अधिकार. या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणतंही शिक्षण धोरण तयार झालं किंवा कोणतीही ‘शैक्षणिक नीती’ तयार झाली, तरी ती जोपर्यंत या दोन हक्कांशी ताळमेळ राखत नाहीत, तोपर्यंत असं शिक्षण धोरण ‘संविधानविरोधी’च असणार.......

‘न्याय’, ‘स्वातंत्र्य’, ‘समता’ आणि ‘बंधुता’. ही मूल्ये ‘प्रजासत्ताक भारताची ‘महामूल्ये’ आहेत. ही मूल्ये आपल्या जनमानसात अजून नीट रुजलेली नाहीत, हे आजचे विदारक वास्तव आहे!

ज्या काळात समाजातील विचाराचे केंद्र हे पारलौकिक जीवन बनलेले असते, त्या काळात ईश्वर, यज्ञ, पुनर्जन्म, स्वर्ग, मोक्ष, नरक यासारखे सिद्धान्त निर्माण होत असतात. या सिद्धान्तांचा जनमानसावर खूप मोठा प्रभाव राहत असतो आणि या प्रभावामधूनच ‘भक्ती’सारखे मूल्य उदयाला येत असते. ‘भक्ती’ या शब्दाचा अर्थ स्तुती, अतिशयोक्त गौरव हा असतो. या मूल्यात अपरिहार्यपणे विषमता सामावलेली असते.......

वागळेंसारख्या ज्येष्ठ पत्रकारावर झालेल्या हिंसक हल्ल्याची बातमी, ‘लोकमान्य लोकशक्ती’ असलेलं ‘लोकसत्ता’सारखं प्रतिष्ठित-नामांकित वर्तमानपत्र इतकं ‘सामान्यीकरण’ करून देत असेल तर…

‘लोकसत्ता’ची ही बातमी वाचून अनेक प्रश्न पडतात. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहेत. ते नुसते पाहताना आपलासुद्धा थरकाप उडतो. हा हल्ला केवळ निखिल वागळे यांनाच ‘टार्गेट’ करून केला गेला, हेही त्या व्हिडिओमधून सरळ सरळ दिसतं. हल्लेखोर केवळ वागळे यांनाच ‘टार्गेट’ करताना दिसतात. तरीही ‘लोकसत्ता’च्या बातमीचं शीर्षक आहे – ‘पुण्यात पुरोगामी कार्यकर्त्यांवर भाजपचा हल्ला’.......

देशात ‘भयमुक्त वातावरण’ आहे, असे राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपचे म्हणणे असेल, तर मग निखिल वागळे यांच्यासारख्या एका पत्रकाराची एवढी भीती का वाटतेय तुम्हाला?

पत्रकार निखिल वागळेंवर झालेल्या हल्ल्याचा काल संध्याकाळपासून सोशल मीडियावर सर्व थरांतून मोठ्या प्रमाणावर तीव्र शब्दांत निषेध केला गेला आहे. आणि कालच्या वागळेंच्या सभेला पुणेकरांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला, त्यावरून ही सभा तर यशस्वी झालीच, पण वागळे-सरोदे-चौधरी यांच्या ‘निर्भय बनो’ या सादेलाही सुजाण पुणेकरांनी पाठिंबा दिला आणि हिंसक हल्लेखोरांना सणसणीत चपराक लगावली, असेच म्हणावे लागेल.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......

रामलल्लाची पुनर्स्थापना झाली, मशीद होतेय… आता एक पाऊल पुढे जात अयोध्येत देशात अस्तित्वात असलेल्या इतर धर्मांच्या उपासना पद्धतीचीही प्रतीकं उभारावीत…

रामलल्लाची पुनर्स्थापना ही व्यापक सौहार्दाचा शेवट नसून, सुरुवात ठरावी. अयोध्या सर्व उपासनापद्धतीचं केंद्र बनवता येईल. निव्वळ मंदिर, मशिदीवर न थांबता एक वैदिक मठ, एक चर्च, एक स्तूप, एक सिनेगॉग, एक अग्यारी, गुरुद्वारा, एक जैन तीर्थस्थळ निर्माण करता येईल. या सर्व इमारती भव्य, निर्मळ आणि सुंदर होऊ द्या. सर्व उपासक आपापल्या केंद्रात जातील आणि नंतर निरपेक्ष भावनेनं इतरांच्या श्रद्धास्थानांनाही भेट देतील.......

आम्ही ‘ललित कला केंद्रा’च्या (गुरुकुल) विद्यार्थी, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांसोबत एकजुटीने उभे आहोत

ललित कला केंद्राच्या परीक्षांच्या वेळी, रंगमंच हाच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका असतो. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाच्या मूल्यमापनासाठी अंतर्गत आणि/किंवा बाह्य परीक्षक/तज्ज्ञ उपस्थित असतात. या परफॉर्मन्समध्ये तोंडी परीक्षा (Viva) हा पण मूल्यमापन प्रक्रियेचा एक भाग असतो. या सादरीकरणांमध्ये कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, संप्रदायाचा अपमान करण्याचा किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू असत नाही.......

‘समान नागरी कायद्या’ने फार फरक पडेल असे मानण्याचे कारण नाही. ‘बहुपत्नीत्व’ हे कायद्यापेक्षा व्यावहारिक बाबींमुळे कमी होत चालले आहे…

गेल्या काही वर्षांत येथील संघत्त्ववाद्यांनी ‘समान नागरी कायदा’ उचलून धरला. याचे मुख्य कारण मुस्लिमांत ‘सुधारणावाद’ रुजावा, त्यांनी मुख्य प्रवाहात यावे, मुस्लीम स्त्रियांवरील अन्याय दूर व्हावा, हे नाही. मुस्लीम समाजास नाक खाजवून दाखवावे, हा त्यांचा हेतू आहे. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा आल्याने व अन्य भाजपशासित राज्यांत तो येण्याची शक्यता असल्याने संघत्ववाद्यांच्या आनंदास भरते आल्याचे दिसते, ते यामुळेच.......

लेखिकेने स्त्री-पुरुष समता, समानता, स्त्रियांचे स्वातंत्र्य, विवाह, संततीनियमन, सामाजिक काम, ब्रह्मचर्य यांवरच्या लिखाणातून ‘रॅडिकल गांधी’ उभा केला आहे. यातच या पुस्तकाचे योगदान सामावले आहे

वास्तविक म.गांधींच्या कार्याचा ऐतिहासिक दृष्टीने विचार करून आजच्या काळाला उचित असा विचार त्यातून शोधला पाहिजे. या ऐवजी ऐतिहासिक व समग्रदृष्टीचा त्याग करून अस्मितांचे जतन सुरू आहे. अर्थातच यात गांधींच्या अनुयायांचाही दोष आहेच. या पार्श्वभूमीवर परिवर्तनवादी लेखिका व झुंजार कार्यकर्त्या निशा शिवूरकर यांनी या पुस्तकात ‘गांधीजी आणि स्त्री-पुरुष समते’च्या विविध पैलूंचा चिकित्सक विचार केला आहे.......

ज्यांच्याकडे भरपूर भांडवल आहे, त्यांचा विकास सत्तेतून होत जातोय. पण साधे कामधंदेही नसल्याने जे बेकार आहेत, अशांचे काय? ते ‘रामभक्ती’त इतके मग्न आहेत!

ज्यांच्याकडे भरपूर भांडवल असते, त्यांचा विकास सत्तेतून होत जातो. पण साधे कामधंदेही नसल्याने जे बेकार आहेत, अशांचे काय? पण ते रामभक्तीत इतके मग्न आहेत की, त्यांना स्वतःच्या प्रश्नाचेही भान राहिलेले नाही. देशातील बेकारांचा प्रश्न फार गंभीर आहे असे सातत्याने म्हणतात, पण हेच बेकार युवक या सत्तेचे झेंडे खांद्यावर घेऊन, मिरवणुका काढून, राममंदिर झाल्याच्या आनंदात गल्लोगल्ली पताका लावण्यात आणि फटाके फोडण्यात मग्न आहेत.......

मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने राज्य सरकारने ‘एका दगडात अनेक पक्षी’ मारण्यात सध्या यश मिळवलं असलं, तरी हा ‘आगीशी खेळ’ ठरू शकतो. पण त्याची पर्वा कोण करतो!

रडणाऱ्या पोराला चॉकलेट देऊन समजूत काढली की, पोरगा खुश आणि तो गप्प बसला म्हणून चॉकलेट देणाराही खुश, अशी काहीशी अवस्था मराठा समाजाचे ‘नवीन योद्धा’ मनोज जरांगे आणि ‘मराठ्यांचे तारणहार’ म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याच्या धडपडीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली आहे. हे दोघं मराठा समाजासोबत स्वतःचीही फसवणूक करून घेत आहेत. प्रत्यक्षात सरकारनं मराठा समाजाची बोळवणच केली आहे.......

नव्वदोत्तर कवितेला देशीवादी, सौंदर्यवादी किंवा महानगरी अशा कोणत्याही चौकटीत बसवणे तिच्यावर अन्यायकारकच ठरेल, कारण ही कविता सर्व प्रकारच्या चौकटींचा निषेध करते

मराठी कवितेत उत्तर-आधुनिक विचार पूर्णांशाने प्रकट झाला आहे, असे जरी ठामपणे म्हणता येत नसले, तरी प्रस्तुत ग्रंथात निवडलेल्या आठ कवींच्या कवितांमधून ‘उत्तर-आधुनिक संवेदन’ प्रभावीपणे व्यक्त झाले आहे, असे म्हणता येते. नव्वदोत्तर कालखंडातील उत्तर-आधुनिक जाणिवा व्यक्त करणाऱ्या या आठ कवींनी आपापल्या अनुभवक्षेत्राशी संबंधित प्रश्न प्रामाणिकपणे आजच्या वर्तमानाच्या भाषेत जोरकसपणे उपस्थित केले आहेत.......

नाळ तोडायच्या आधीपासून चितेपर्यंत, बाळहंबरापासून हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन् संघर्षमय झाला, अशा जगातल्या सगळ्याच जातिधर्मांच्या असंख्य अनामिक स्त्रियांना अन् माझ्या प्रिय आईला ही कादंबरी समर्पित

जुनाट बुरसटलेल्या पायवाटा सोडून अशी बंडखोर अशिक्षित स्त्री ही स्त्री-मुक्तीच्या नव्या वाटा कशा शोधत असेल? स्वतःच्याच घरात निर्वासितांसारखं जीवन जगूनही अन् आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सतत उपेक्षेची जन्मठेप भोगूनसुद्धा शापितासारखं जीवन व्यतीत करणारी स्त्री खंबीरपणे कशी लढली असेल? तिच्या याच बंडाची अन् संघर्षाची गोष्ट कादंबरीत मांडण्याचा मी पोटतिडकीनं प्रयत्न केलाय.......

श्रीभाऊंसारखा दर्दी, नव्या विचारांचं स्वागत करणारा, आपल्या तरुण संपादकाच्या मागे भक्कमपणे उभा राहणारा आणि चांगल्या लेखनाला दाद देणारा संपादक यापुढे होणे नाही!

श्रीभाऊंसारख्या नामवंत संपादकाच्या मार्गदर्शनाखाली मला संपादनाचे धडे गिरवता आले. मी चार वर्षे त्रैमासिक स्वरूपातल्या ‘माणूस’चं संपादन केलं. श्रीभाऊंचे माझ्यावर खोल संस्कार आहेत. त्यामुळे आजही दिवाळी अंक चाळले आणि ढिसाळ संपादन दिसलं की, डोक्यात राग शिरतो. श्रीभाऊ ‘माणूस’च्या अंकांच्या अनुक्रमणिकासुद्धा किती काळजीपूर्वक तयार करत! त्यांच्या मते अनुक्रमणिका म्हणजे अंकात शिरण्याचा दरवाजा.......

एखाद्या व्यक्तीची सद्ससद्विवेकबुद्धी ही गाढवाच्या सदसद्विवेकबुद्धीप्रमाणे चुकीची व कुचकामाची असू शकेल. प्रत्येकाची सद्सद्विवेकबुद्धी नेहमीच बिनचूक व योग्य निवाडा देईल असे नाही

एखाद्या पदार्थांची बरी-वाईट चव, वास अगर शोभा कळण्यास ज्याप्रमाणे आपणास आपल्या इंद्रियांचा उपयोग होतो, अगर तर्कशास्त्रातील एखाद्या अनुमानाची सत्यासत्यता ठरवण्यास आपली तार्किक बुद्धी उपयोगी पडते, त्याप्रमाणे नैतिकदृष्ट्या कोणत्याही गोष्टीचा बरे-वाईटपणा ठरवण्यास कोणता मार्ग उपलब्ध आहे? ‘आपली सद्सद्विवेकबुद्धी!’ असे कोणी चटकन उत्तर देईल; परंतु तिचेच स्वरूप ठरवणे अत्यंत कठीण आहे.......

ईश्वर ही एक फोल कल्पना आहे, किंवा ईश्वर असलाच तर त्याला प्रार्थना आवडत नाही, देवळे आवडत नाहीत, आणि प्रार्थना करणारांना तो शिक्षा करतो. तेव्हा निदान देवळे बांधण्यात पैशाचा अपव्यय करू नये

ईश्वराचे अस्तित्व मानण्याची जरुरीही समंजस लोकांना दिसत नाही आणि तो मानणे सयुक्तिकही दिसत नाही आणि सामान्यतः लोक जे गुण ईश्वरामध्ये आहेत असे मानतात, ते परस्परविरोधी आहेत, हे मागील लेखात दाखवले. ही अडचण टाळण्याकरता धार्मिक लोक सांगतात की, ईश्वराच्या कृत्यांवरून त्यांच्या गुणांचे अनुमान करता नये, कारण ईश्वराची करणी अगाध आहे. पण असे म्हटल्यास ईश्वराचे गुणवर्णन करण्याचाही हक्क राहत नाही.......