माया अँजेलोचं बालपण जाणून घेतल्यावर ‘केज्ड बर्ड’ या कवितेतील वेदना समजते. आणि त्यानंतर ‘स्टिल आय राईज’ वाचली, तर त्यातील बंड, स्वातंत्र्याचे पूजन आणि आनंद, हे सारे समजून घेता येते!

माया अँजेलो (१९२८-२०१४) ही स्त्री मनाची सगळी रूपे अत्यंत मनस्वीपणाने मांडणारी कवयित्री. क्लब डान्सर, सेक्स वर्कर, हॉटेलात कुक इथपासून सगळी कामं या आफ्रिकन-अमेरिकन कवयित्रीला करावी लागली. हे सर्व भोग भोगत असताना तिने आपली संवेदना प्राणपणाने जपली. ती मनस्वी कविता लिहीत राहिली. आपल्या कर्तृतवाने पुढे ती अमेरिकेची सगळ्यात लाडकी कवयित्री झाली. जगभरातील स्त्रीवादी चळवळीची ती स्फूर्तिस्थान ठरली....

असत्याला ललकारण्याची, आव्हान देण्याची, प्रश्न विचारण्याची गरज आहे. द्वेषाच्या या वातावरणात परस्परांवर प्रेम करणं, हासुद्धा विद्रोह ठरू शकतो

सध्याची लढाई अशा विचारधारेशी व अशा संघटनेशी आहे की, ज्याचा स्वतःचा असा आखाड्यात उतरवण्यासाठी पैलवानच नाही. म्हणून ते आपल्याला आपल्यातच लढवतात. महात्मा गांधींविरुद्ध महात्मा फुले, गांधींविरुद्ध आंबेडकर, गांधींविरुद्ध नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधींविरुद्ध भगतसिंग, नेहरूंविरुद्ध पटेल अशा लढाया त्यांनी लावल्या आहेत. या विषमतावाद्यांचा कोणताही नेता त्यांच्या संघटनेशिवाय जनमानसांमध्ये मोठा होऊ शकत नाही...

‘त्यांच्यासोबत’ असाल तर स्वच्छ आणि विरोधात असाल तर गलिच्छ! ‘त्यांच्या’ बाजूनं असाल तर ‘देशभक्त’ आणि विरोधात जाल तर ‘देशद्रोही’!

भाजप म्हणजे ‘हिंदुस्थान’ आणि विरोधक म्हणजे डायरेक्ट ‘पाकिस्तान’, अशा प्रकारे बटबटीत पद्धतीने देशांतर्गत विभाजन सुरू आहे. काळ तर कठीण आहेच. आणि म्हणूनच ‘विद्रोही’ संमेलनासोबत राहून विद्रोहाचीही गरज आहे. कसाबला फाशी दिली गेली, तेव्हा सार्‍या देशाने आनंद व्यक्त केला, पण या देशातील सरकारच्या ‘कसाब’नीतीमुळे शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतात, याबाबत फारसं दुःख या देशातील जनतेला आहे असं वाटतं नाही...

घोषित नसली तरी ‘अघोषित आणीबाणी’ तर निश्चितच आहे. वातावरण विषाक्त बनवले जात आहे. ‘भया’चे वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे

हे विद्रोही साहित्य संमेलन आहे. विद्रोही या शब्दाचा अर्थ ‘अन्यायाविरुद्ध लढा’ उभारणारे असा आहे. प्रस्थापित किंवा प्रतिष्ठापना केल्या गेलेल्या असत्याला सत्यानं ललकारणं, आव्हान देणं, प्रश्न विचारणं म्हणजे विद्रोह. विद्रोहाचं नातं सत्याशी असतं. सत्तेद्वारे जेव्हा असत्याची प्रतिष्ठापना होते, ते प्रस्थापित होतं, त्या वेळी सत्य त्याला आव्हान देतं. सत्यानं असत्याला ललकारणं, आव्हान देणं म्हणजे विद्रोह...

सोनाली नवांगुळ रोज नव्या वाढत्या आव्हानांना तोंड द्यायला तयार आहे, पण आपण समाज म्हणून तिला पूर्वग्रहांशिवाय, स्टिरिओटाईप्ड कोंदणांशिवाय, एक माणूस म्हणून स्वीकारायला तयार आहोत?

सोनालीचा जगण्याचा, लढण्याचा, लिहिण्याचा उत्साह पाहिला की, आपल्याला आपणच ‘अपंग’ तर नाही ना, अशी शंका मनात येते. ती तिच्या तब्येतीशी जुळवून घेता घेता समस्त मानवजातीशीच जुळवून घेण्याची मनीषा मनात बाळगून असते. तिचे लेखन, तिचे अनुवाद, तिच्या अनुवादाला ‘साहित्य अकादमी’चा मिळालेला पुरस्कार, हे सारे तिच्या उत्कट जगण्याचेच विविधरंगी आविष्कार आहेत. नवनव्या अनुभवांना सामोरे जाण्याचा आनंद सतत तिला लुटायचा असतो...

आम्हाला पुतळे नकोत, ग्रंथालये हवीत. येणाऱ्या पिढीला बाबासाहेब-अण्णा भाऊ यांच्या समाजवादी व्यवस्थेचे स्वप्न तर समजून घेऊ द्या, पण अशी मागणी कोणीही करत नाही

गांधीजींनी १९४२ साली चार शब्द उच्चारले- ‘क्विट इंडिया’. संपूर्ण देश पेटून उठला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एवढेच म्हणाले- ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’. एक संपूर्ण समाज हा शिक्षणासाठी, संघटनेसाठी व संघर्षासाठी सिद्ध झाला. सुभाषबाबू म्हणाले, ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा।’ लाखो भारतीय त्यांच्यासोबत निघाले. आज ‘भारत स्वच्छ करो’ची घोषणा केली जाते, पण त्याचा परिणाम काय, तर...

वर्तमान लेखक-कवींमध्ये खुलेपणा, दिलदारपणा राहिलेला नाही. वेगवेगळी निमित्ते आणि कारणं पुढे करून कोतेपणालाच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जाते

कधी साहित्याच्या दर्जाचं निमित्त केलं जातं, कधी विचारांची बांधिलकी पुढं केली जाते, कधी कुणी जाणून-बुजून निरपेक्ष राहणार असेल, तर त्याला कुणीकडे तरी ओढलं जातं किंवा ढकललं जातं. तत्त्वाच्या गप्पा मारत वचावचा भांडणाऱ्यांच्या भांडणापाठीमागे निव्वळ स्वार्थ उभा असल्याचं दिसतं. प्रसिद्धी, पुरस्कार, अभ्यासक्रम, लोकमान्यता असल्या शूद्र गोष्टींसाठी गट तयार करून खुन्नस धरले जातात, बिभत्स राजकारणही केलं जातं....

ज्ञानदेवांच्या दृष्टान्ताप्रमाणे, मुलगा वडिलांच्या ताटात जेवायला बसतो आणि त्यांच्या ताटातलं त्यांनाच जेवू घालतो. माझं तुमच्यासमोर बोलणं तशा प्रकारचं आहे...

समाजमाध्यमावर मुक्त स्वातंत्र्य आहे, पण त्यात संभाव्य धोकाही लपलेला असतो. समाजमाध्यमावर वाट्टेल तशी, वाट्टेल तेव्हा कविता झळकवता येते. मनात आले तर नव्या छपाई तंत्रज्ञानातून आकर्षक पुस्तक छापता येते. वर्तमानपत्रे कौतुक छापायला तयार असतात. गल्लोगल्ली पुरस्कारही तयार असतात. हा मोहक प्रवास मनाला भुरळ पाडणारा आहे. अष्टौप्रहर खुडखुड वाजणार्‍या व्हॉट्सअपमुळे आपलं अवधान खंडित झालंय का? आपण सलग विचार करू शकतो का?...

‘दगडावर दगड... विटेवर वीट’ : स्वतःच्या आयुष्यातल्या आठवणी सांगण्याच्या निमित्तानं काहीही भरताड वाचकांच्या माथी मारणाऱ्यांनी ‘दगडावर दगड, विटेवर वीट’ रचून किती चिरेबंदी इमारत बांधता येते, ते एकदा डोळ्याखालून घालावं

हे आत्मनिवेदन असलं तरी त्यात कुठं कणभरही आत्मसमर्थन नाही, उलट कठोर आत्मपरीक्षण आहे. ललितलेखन असलं तरी भाबडं स्मरणरंजन किंवा भावुकपणा औषधालाही नाही. विषयाच्या ओघानं काही माहिती आली तरी त्यामागं स्वतःचं ज्ञान दाखवण्याची हौस नाही. इतकं प्रवाही, निखळ पारदर्शक, अंतरंगाला भिडणारं आणि विचार करायला लावणारं लिखाण फार क्वचित पाहण्यात येतं ...

कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

कालिदासाचे ‘मेघदूत’ आपल्याला एका उदात्त जगात घेऊन जाते. ते वाचून आणि अनुभवून झाल्यावर मानवी जीवनाचे सारे श्रेय आपल्या हाती लागले आहे, असे वाटत राहते. जगायचे कशासाठी, तर कालिदासाने सांगितलेले प्रेम करण्यासाठी. जगायचे कशासाठी, तर कालिदासाने रंगवलेला निसर्ग त्याच्या डोळ्यांनी बघण्यासाठी! जगायचे कशासाठी तर, कालिदासाने दिलेला मांगल्याचा घट हृदयामध्ये जपण्यासाठी! ‘जगायचे कशासाठी?’ या प्रश्नाला कालिदास वरील उत्तरे...

‘युगवाणी’चा हा ‘अरुण कोलटकर विशेषांक’ म्हणजे कोलटकरांच्या व्यक्तिमत्त्वाची सगळी रूपे एकत्रितपणे पाहण्याचा आणि त्यांना सगळ्या अंगाने समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे

कोलटकरांच्या कवितेचे अभ्यासक, तज्ज्ञ, कोलटकरांचे सहकारी, छायाचित्रकार, अनुवादक, दृक्-कलावंत सगळे आपापले डोळे घेऊन एकत्र आले आहेत. या अंकामुळे आपल्या परंपरेतला हा अनन्यसाधारण कवी अधिक कळेल, त्याचं समग्र रूप समजून घ्यायची निकड आपल्याला भासेल अशी अपेक्षा आहे. या छोट्याशा प्रयत्नातून कोलटकरांच्या व्यक्तिमत्वाचा कितीसा थांग आपल्याला लागतो याचा निर्णय वाचकांनी घ्यायचा आहे...

आपल्या भोवतालाची उंची वाढवली नाही, तर आपली उंची कोसळू शकते. म्हणूनच निदान आपल्या स्वार्थासाठी का होईना, आपला भोवताल आपण घडवायला हवा

मित्रहो, आपले पगार आपल्या आवश्यक गरजा भागवण्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे विद्येच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना इतर धंदा, व्यवसाय, प्लॉटिंग, ट्यूशन करण्याची गरज नाही. हवं तर विद्यार्थ्यांना मोफत शिकवायला हरकत नाही. आपण ज्या गावात राहतो, ते गाव आणि गावातलं वातावरण सुसंस्कृत असेल, तर त्यात आपण अधिकची भर घालायला हवी. आपल्यासारखे वाचणारे, लिहिणारे, ऐकणारे, रसिकजन आपल्याभोवती निर्माण करणं, ही आपली जबाबदारी असते...

चिंतनशील असतो, तो कलावंत. नव्हे, तोच खरा कलावंत. इतरांचे जगणे उन्नत करण्याची त्याच्यात खरी क्षमता. बाकी सगळेच भोंगे. काही लहान. काही मोठे…

चित्रामागे विचार असतो. पण विचारांचा कोलाहल मागे टाकून विचारविरहित म्हणजेच संस्कारांची पुटे सारून कोऱ्या करकरीत मनःस्थितीत चित्र काढता आले तर...? नव्हे, ते तसे काढण्याचा प्रयत्न हवा... मुंबईतल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या सभागृहात २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजता ख्यातकीर्त चित्रकार-लेखक प्रभाकर कोलते यांच्या ‘दृक-चिंतन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्यावरील हे छोटेखानी टिपण...

साहित्य संमेलनाला कोणी आपल्या सोयीसाठी व स्वार्थासाठी वापरू पाहत असेल, चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर भिडेला बळी न पडता त्याला अटकाव केला पाहिजे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ हा मराठी समाजाच्या आस्थेचा व आनंदाचा सर्वोच्च सोहळा आहे. कालौघात त्यात गरजेनुसार इष्ट ते बदल झाले; समाजाच्या गरजेनुसार भविष्यातही होत राहतील; ते आवश्यकही आहेत. पण या सोहळ्याला कोणी आपल्या सोयीसाठी व स्वार्थासाठी वापरू पाहत असेल, चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर भिडेला बळी न पडता त्याला अटकाव केला पाहिजे...

‘रानमळ्याची वाट’ हा प्रकल्प करताना श्रावणीने एकाही कवितेला हातात कागद घेतला नाही, चुकली-अडखळली नाही, तिचा आत्मविश्वास ढळला नाही…

गेले नऊ महिने सुरू असलेला श्रावणीचा संपर्क आता थांबणार, त्यामुळे हूरहूर वाटतेय. नऊ महिन्यांपूर्वी नावगावही माहीत नसलेली ही माणसं अचानक काळजात जाऊन बसली. एप्रिलच्या मध्यावर आम्ही ही कवितामालिका थांबवत आहोत. पण कुठंतरी थांबलंच पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांचं औत जिथं थांबतं, तिथं आम्ही थांबत आहोत. अर्थात पुढंही आम्ही गप्प बसणारच नाही. तीन-चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर असाच काहीतरी जिव्हाळ कार्यक्रम घेऊन येणार आहोत...

संवेदनशीलतेचे अपार करुणेत रूपांतर करण्याचे सामर्थ्य फार कमी लेखकांमध्ये आढळते. अशा मोजक्या आणि श्रेष्ठ लेखकांत भास्कर चंदनशिव यांची गणना आपल्याला करावी लागते!

भास्कर चंदनशिव यांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या जीवनाविषयी ते लिहितात त्या जीवनाबद्दल त्यांना जिवंत आस्था आहे. म्हणूनच कथेच्या नावाखाली ते केवळ किस्से सांगत नाहीत, थेट अनुभवाच्या गाभ्याला भेटतात. एखादा पट्टीचा पोहणारा जसा तळापर्यंत बुडी घेऊन वस्तू वर घेऊन येतो, तसे ते तळपातळीच्या वास्तवाला नेमकेपणाने आपल्या मुठीत पकडतात. त्यांच्या कथांना गवसलेले आकार हे चिंतनातून आले आहेत...

हा कवी स्वत:ला केवळ दलित कवी म्हणवून घेत नाही. त्याला एकूणच मानवतेचा कवी व्हायचंय. म्हणूनच मनवर यांची कविता हे दलित कवितेतलं ‘युगप्रवर्तन’ आहे

ज्याची चूक त्याच्या पदरात घालूनही चूक करणाराविषयी मनातून करुणाच बाळगणारा हा कवी आहे. हे या कवीच्या बुद्धत्वाकडच्या प्रवासाचं लक्षण आहे. दलित कवितेत याआधी हे कधी दिसलं नव्हतं. हाच दलित कवितेचा आवर्तभंग आहे. भाषेच्या उदरात शिरून तिच्यात दडलेल्या आणि आतापर्यंत कुणीच न सांगितलेल्या अर्थाला मुखर करण्याची प्रतिज्ञा कवी खरी करून दाखवतो. म्हणूनच त्याला जात्याची नव्हे तर आईनं गाईलेल्या गाण्यांची घरघर ऐकू येते...

उस्मानाबाद साहित्य संमेलनानं दोन गोष्टी शिकवल्या. लोकांच्या साहाय्यानं संमेलन करता येतं आणि काटेकोर मांडणी केली तर कमी खर्चात दर्जेदारही होतं

संमेलनाच्या तयारीच्या काळात महाराष्ट्रात निवडणुकीचा मोसम होता. कधी नव्हे तो हा मोसम राजकीय अस्थिरतेचा होता. या काळात निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उलथापालथी व पक्षबदल घडले. राजकीय पुढारी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडू लागले. उलटसुलट निर्णय घेऊ लागले. अशा स्थिरतेच्या काळात कोणत्याही शहाण्या माणसाने संमेलन त्यांच्या हातात दिले नसते. म्हणून मीही तेच केले आणि संमेलनावरचे अनिश्चिततेचे सावट दूर केले...

बाईंचं कौतुक करताना त्यांची जीभ थकत नाही. त्यांचा नवरा असल्याचा अभिमान आड येत नाही. उलट बाईंच्या प्रतिभेचं त्यांना कौतुक आहे!

आजही या वयात बाई आणि पाटील यांची पहिलीच इनिंग सुरू आहे असं वाटतं. परस्परांबद्दलचा विश्वास, कुतूहल, कौतुक आणि प्रोत्साहन, थट्टा आणि रागवणं या वैशिष्ट्यांनी त्यांचा संसार भरलेला आहे. त्यात कधीमधी आम्ही डोकावत असतो. त्यातूनच मला हे जाणवलं की, बाईंना पुरस्कार आणि प्रसिद्धीचं जास्त महत्त्व नसलं तरी त्या रूढ अर्थानं आज प्रसिद्ध आहेतच. त्यासाठी त्यांच्या माणसानं त्यांना दिलेली साथ मला स्त्री म्हणून कौतुकास्पद वाटते!...

आमच्या, आताच्या पिढीतल्या कवींना, लेखकांना, कलावंतांना प्रश्नचिन्हांच्या लांडग्यांच्या कळपांना सामोरे जावे लागते आहे!

आज सत्त्योत्तर युग, पोस्ट-ट्रूथ एज, आहे असे म्हटले जाते. सत्य काय आणि असत्य काय, काही फरकच राहिलेला नाही. असत्य वारंवार बोलले गेले की तेच सत्य आहे असे सामान्य लोकांना वाटत असते. राजकीय आणि आर्थिक सत्ता असा सत्यासत्याचा भ्रम निर्माण करतात. त्यांचे असत्यांचे घोडे चौखूर उधळत असतात. कुणी सत्य सांगायचा प्रयत्न कला तर त्यांचे तोंड बंद करण्यात येते. पण आपण बोलले पाहिजे हे आपल्याला कुसुमाग्रजांच्या कवितांनी सांगितलेले आहे...