२ एप्रिलच ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग डे’ म्हणून का साजरा करायचा, तर ‘एप्रिल फूल’नंतरचा दिवस म्हणून. ‘असत्य विरुद्ध सत्य’ हे अधोरेखित करण्यासाठी, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी...

सामान्य नागरिक म्हणून आपण आपल्या स्वातंत्र्याबाबत सजग होण्याची कधी नव्हे इतकी गरज आता निर्माण झाली आहे. त्याबाबतची जाणीव-जागृती करण्यासाठी २०१७पासून २ एप्रिल हा दिवस ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग डे’ म्हणून साजरा केला जातो आहे. ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क’ ही संस्था जगभरातल्या अजून काही फॅक्ट चेकिंग संस्थांच्या सहकार्यानं २ एप्रिल हा ‘इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग डे’ म्हणून साजरा करत आहे...

सर्वच वयोगटांत आक्रमकता व हिंसा याचं प्रमाण वाढलं आहे. परंतु वाढत्या वयातील मुलं-मुली यांच्यातलं गुन्ह्यांचं प्रमाण चिंताजनक आहे

संज्ञात्मक मज्जातंतूशात्रज्ञ डॉ. कॅरोलिन लीफ यांच्या मते ऑनलाइन असताना आपला मेंदू तार्किक विचार करू शकत नाही. सोशल मीडियावर तुम्ही काय बघता, यावरून तुमचा मेंदू प्रत्येक क्षणाला बदलतो. त्यामुळे त्याची काम करण्याची तऱ्हा बदलून जाते, तो गोंधळून जातो. १९७० सालच्या मेंदूच्या ब्रेन मॅपिंग प्रतिमा व इन्स्टाग्रामच्या काळातील ब्रेन मॅपिंग प्रतिमा यांत खूप फरक आहे. इन्स्टाग्राम काळात मेंदू वेड्यासारखं वागतोय...

वास्तविक वायर्ड सेवांना वायरलेस सेवा पूरक असल्या पाहिजेत. पण प्रत्यक्षात त्यांच्यात स्पर्धात्मक वातावरण निर्माण केले गेले. त्याचे दूरगामी दुष्परिणाम दिसून येत आहेत...

आता मात्र वेळ आलेली आहे, FCCने इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या मानकांचा पुनर्विचार करण्याची. तसेच FDA आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तत्सम इतर सरकारी संस्थांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामासंबंधी अधिक जागरूक आणि सजग राहणे गरजेचे आहे. वायरलेस उत्पादने बाजारात येण्याआधी त्याच्या कडक चाचण्या होणे गरजेचे आहे. तसेच त्याचे ग्राहकांवर काही दुष्परिणाम होत आहेत का...

आधीच्या काळात ‘थेरगाव क्वीन’सारखी तरुणाई गुन्हेगारीच्या मार्गाने जायची, आता ती इन्स्टाग्राम/फेसबुकसारख्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं समाजविघातक गोष्टी करताना दिसते

सोशल मीडियामुळे स्वतःविषयी भलते समज व दुसऱ्यांविषयी भलते गैरसमज निर्माण होतात. तुम्ही सोशल मीडियावर छायाचित्रं टाकली नाहीत, म्हणजे तुम्ही आयुष्य जगत नाही, असं आपल्या मेंदूचं कंडिशनिंग करण्यात सोशल मीडिया यशस्वी ठरला आहे. sexually desirable असण्याभोवतीच आपलं आयुष्य केंद्रित करून अत्यंत उथळ अशा व्यक्ती समाजात ‘हिरो’ ठरवल्या जात आहेत. थेरगाव क्वीन हे त्यातीलच एक ठळक उदाहरण...

सामाजिक वीण जोडणं आवश्यक आहे. नाहीतर ब्रिटन, जपान यांच्या धर्तीवर आपल्या देशातही जनतेतला एकटेपणा घालवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आणि मंत्री नियुक्त करावे लागतील!

पैसा व त्यातून येणारा ऐशोआराम म्हणजे आनंद ही कल्पना भारतीय लोकांमध्ये एकटेपणा वाढण्यामागचा आणखी एक घटक आहे. आनंदी देशाच्या यादीत भारत अगदी शेवटच्या क्रमांकावर आहे. समृद्ध नाती हा आनंदी समाजाचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. आनंदी देशाच्या यादीत पहिल्या पाचमध्ये येणारे देश कामाला महत्त्व देणारे ‘नसून’ तिथं आनंद व समाधान ही कल्पना मध्यभागी ठेवून देशाची धोरणं आखली जातात...