बीबीसीने एका अहवालात करोना संपल्यावर मानसिक आरोग्याच्या समस्यांची त्युनामी येईल, असं म्हटलं होतं. ते दुर्दैवानं आता खरं ठरताना दिसू लागलं आहे…

आर्थिक स्तर हा मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. कुटुंबातील सर्वांच्या गरजा भागतील आणि भविष्याची तरतूद होईल, एवढी आर्थिक सुरक्षितता असल्यावर मानसिक आरोग्य चांगलं राहतं. भारताची ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे, आणि त्यातील ४१ टक्के बेरोजगार आहेत. भारतातील ८० कोटी लोकांचं महिन्याचं उत्पन्न फक्त ७५०० रुपये एवढंच आहे. अशा परिस्थितीत त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं कसं राहील...

माझ्या पिढीत अनेक सुशिक्षित महिला आहेत, पण त्यांनी वैयक्तिक कारकिर्दीपेक्षा घराची जबाबदारी महत्त्वाची मानली, कदाचित अशा महिलांचं प्रतिनिधित्व करणारी माझी कथा आहे

मला हे सांगितलंच पाहिजे की, मी पूर्णवेळ शास्त्रज्ञ जरी बनू शकले नाही, तरी मला घरच्या काम करताना, मुलांचं संगोपन करताना, त्यांचे कपडे शिवताना, प्रवास करताना आणि त्यांचं संगोपन करून त्यांना मोठं करताना समाधान मिळालं. मला मुलांना गणित शिकवायला आवडतं. शाळेतील मुलांना अवघड गणित विषय समजण्यात मदत करणं, समाधानाचं आहे. म्हणून मी ज्यांना गणिताची भीती वाटते, अशा मुलांसाठी गणित अधिक रंजक करून सांगणारं एक पुस्तक लिहिलं...

समुपदेशन म्हणजे ‘शिळोप्याच्या गप्पा’ किंवा ‘समुपदेशकाने केलेली बडबड’ नव्हे. अनेक उपचार पद्धतींसारखीच समुपदेशन हीदेखील एक उपचार पद्धत आहे!

आजकाल समुपदेशन ही संज्ञा अनेकदा सैलपणे वापरली जाते. तुमच्याकडे आलेल्या रुग्णाशी वा ग्राहकांशी गप्पा मारणं, त्याला\तिला एखाद्या गोष्टीची माहिती देणं म्हणजे समुपदेशन नव्हे. मानसिक समस्यांबाबत केलं जाणारं समुपदेशन पूर्णतः मानसशास्त्रीय असतं. कोणाचंही असं जबरदस्तीनं समुपदेशन करता येत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीनं आपल्याला काही समस्या आहे, हे मान्य करायला हवं आणि समुपदेशकाची मदत घेण्याची तयारी दाखवायला हवी...

इतिहासात फार कमी व्यक्ती असतील ज्यांना ब्राऊनप्रमाणे संधी आणि माफी मिळाली असेल. अनेक कु-कृत्ये करूनही त्याला नायकत्व लाभले

ब्राऊन वरिष्ठ क्रूर एसएस अधिकारी असल्याची माहिती कुठेही नमूद करण्यात आलेली नाही. त्याच्या कामासाठी जी छळछावणी चालवण्यात यायची, त्याचाही उल्लेख अमेरिकन माहिती स्त्रोतांतून गायब करण्यात आला. त्याचे हात रक्ताने माखलेले होते, पण चलाखपणा दाखवत त्याने त्या गोष्टीचा कधी उल्लेख केला नाही. त्याच्यावर कोणताही खटला चालला नाही. त्याला नाझी कृत्यांचे दुःख असल्याचे कधीही जाणवले नाही. त्याने कधीही जगाची माफी मागितली नाही...

करोना विषाणूचा फैलाव वटवाघळांमुळे नैसर्गिकरित्या झाला की, चीनमधल्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार झाला, या प्रश्नाची उत्तरं शोधताना रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत

ज्या चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाला, तिथेही वटवाघळांना शुभशकुन मानलं जातं. वटवाघळं ही भरभराटीचं प्रतीक आहेत, अशीही चिनी लोकांची धारणा आहे. पण तिथेही करोनामुळे वटवाघळांच्या अस्तित्वावर घाला आला आहे. करोनाच्या महामारीमध्ये काही ठिकाणी वटवाघळांना मारण्याच्या घटनाही घडल्या. पण वटवाघळांना मारून करोना विषाणू नष्ट होणार नाही. वटवाघळं नसतील तर हे विषाणू आणखी दुसऱ्या प्राण्यांमध्ये आसरा शोधतील...

कुठलीही व्यक्ती अचानक आत्महत्या करत नाही, त्याला काहीतरी पूर्वइतिहास असतो. अबोध मनात काहीतरी दाबून ठेवलेलं असतं. ते सतत समाजमान्य मार्गानं बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं.

मनोविश्लेषण प्रणेते सिग्मंड फ्रॉइड असं म्हणतात की, आपलं भावविरेचन होणं आवश्यक आहे. मनात जे साठलं आहे, ते बाहेर पडणं महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्या जीवनात असा एक तरी नातेवाईक किंवा मित्र असला पाहिजे की, ज्याच्याशी आपल्या वैयक्तिक, खाजगी गोष्टी बोलता आल्या पाहिजेत. अशा व्यक्तीशी सतत बोललं पाहिजे. बोलल्यामुळे मनात जे साठून राहिलं आहे ते बाहेर येतं आणि मूळ समस्येवर उपचार करता येतो...

‘वैज्ञानिक मानसिकता’ विकसित करणे, हे प्रत्येक भारतीयाचे मूलभूत कर्तव्य आहे! राज्यघटनेत असे कलम समाविष्ट करणारे भारत हे जगातील पहिले राष्ट्र आहे.

केवळ भारतीयच नव्हे तर आशियाई देशातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. सी़ व्ही. रामण् यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी पारदर्शक माध्यमातून जाताना प्रकाशाची विखुरण्याची जी क्रिया घडून येते त्यावरील संशोधन सादर केले होते. हा शोध विज्ञानात ‘रामण् परिणाम’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवसाचे औचित्य साधून जनसामान्यांची वैज्ञानिक मानसिकता विकसित व्हावी; या उद्देशाने ‘विज्ञान दिन’ साजरा केला जातो...