बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही...

डॉ.राजा दीक्षित : राजकीय मंडळी आपल्या गोटातील माणसं नेमत असली, तरी आमच्यासारख्या तटस्थ अभ्यासकांविषयीसुद्धा ते आदरबुद्धीनं वागतात

महाराष्ट्राचे भाषा विभागाचे मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी चांगले अभ्यासक नियुक्त करण्याची दृष्टी बाळगून डॉ. सदानंद मोरे यांना ‘महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळा’च्या अध्यक्षपदी कायम ठेवले आणि मला ‘विश्वकोशा’च्या अध्यक्षपदी नियुक्त केले, असे दिसते. आम्ही दोघे तसे पक्षनिरपेक्ष आहोत. असं बघा की, मला ICHRवर भाजपच्या केंद्र सरकारने नेमलं, विश्वकोशावर त्यांच्या विरोधी राज्य सरकारने नेमलं...

नरेंद्र लांजेवार : “सकस वाचनामुळे कोणताही एकांगी, टोकाचा अतिरेकी विचार न करता, भावनाविवश न होता, विवेकी, सारासार बुद्धीचा, उदारमतवादी दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मदत होते.”

मी कोणत्याच मंदिरात दर्शनाला जात नाही. परंतु पुस्तकांच्या दुकानात अवश्य जातो. चार-दोन पुस्तकं विकत आणतो. माझ्या लहान मुलीला माहिती असते बाबा बाहेरगावी गेले ते पुस्तकच आणणार... आजवर जवळपास वीसपेक्षा जास्त ग्रंथालयांना पुस्तकं भेट म्हणून दिली आहेत. शक्यतोवर एका वेळेस शंभरपेक्षा जास्तच पुस्तकं भेट दिलीत. मी घरी गमतीनं म्हणतो, मी मेल्यावर माझ्या ग्रंथसंग्रहाचा जाहीर लिलाव करा, घरावरील सर्व कर्ज सहज फेडलं जाईल...

“मराठी समीक्षा अजून बाल्यावस्थेतच आहे, असे मला वाटते. लहान मूल जसे मोठ्याचे बोट धरून चालते, तसे आपली समीक्षा पाश्चात्य समीक्षेचे बोट धरून चालते.” - सुधीर रसाळ

त्यांचे सिद्धांत घेऊन त्यांचे उपयोजन आपण आपल्या वाङ्मयाबाबत करतो. त्यांच्या वाङ्मयीन सिद्धांतांच्या पाठीमागे त्यांनीच निर्माण केलेलं तत्त्वज्ञान किंवा समाजशास्त्र, मानसशास्त्र असे कुठले न कुठले शास्त्र उभे असते. अगदी अ‍ॅरिस्टॉटलपासून हे पाहायला मिळते. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना त्यांचा जुजबी परिचय असतो. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयीन सिद्धांताचं आपलं आकलन वरवरचं असतं...