एखाद्या व्यक्तीची सद्ससद्विवेकबुद्धी ही गाढवाच्या सदसद्विवेकबुद्धीप्रमाणे चुकीची व कुचकामाची असू शकेल. प्रत्येकाची सद्सद्विवेकबुद्धी नेहमीच बिनचूक व योग्य निवाडा देईल असे नाही

एखाद्या पदार्थांची बरी-वाईट चव, वास अगर शोभा कळण्यास ज्याप्रमाणे आपणास आपल्या इंद्रियांचा उपयोग होतो, अगर तर्कशास्त्रातील एखाद्या अनुमानाची सत्यासत्यता ठरवण्यास आपली तार्किक बुद्धी उपयोगी पडते, त्याप्रमाणे नैतिकदृष्ट्या कोणत्याही गोष्टीचा बरे-वाईटपणा ठरवण्यास कोणता मार्ग उपलब्ध आहे? ‘आपली सद्सद्विवेकबुद्धी!’ असे कोणी चटकन उत्तर देईल; परंतु तिचेच स्वरूप ठरवणे अत्यंत कठीण आहे...

ईश्वर ही एक फोल कल्पना आहे, किंवा ईश्वर असलाच तर त्याला प्रार्थना आवडत नाही, देवळे आवडत नाहीत, आणि प्रार्थना करणारांना तो शिक्षा करतो. तेव्हा निदान देवळे बांधण्यात पैशाचा अपव्यय करू नये

ईश्वराचे अस्तित्व मानण्याची जरुरीही समंजस लोकांना दिसत नाही आणि तो मानणे सयुक्तिकही दिसत नाही आणि सामान्यतः लोक जे गुण ईश्वरामध्ये आहेत असे मानतात, ते परस्परविरोधी आहेत, हे मागील लेखात दाखवले. ही अडचण टाळण्याकरता धार्मिक लोक सांगतात की, ईश्वराच्या कृत्यांवरून त्यांच्या गुणांचे अनुमान करता नये, कारण ईश्वराची करणी अगाध आहे. पण असे म्हटल्यास ईश्वराचे गुणवर्णन करण्याचाही हक्क राहत नाही...

“उत्तम जमलेल्या मैफलीत एक विलक्षण आनंद मिळतो. कधीकधी तर असाही अनुभव येतो की, कुणी ‘दुसरं’च गात आहे आणि ‘आपण’ ते ऐकतो आहोत.” - मालिनीबाई राजूरकर

ग्वाल्हेर घराण्याची संगीत परंपरा अत्यंत सुरेलपणे पुढे नेणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका मालिनीताई राजूरकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना ख्याल, टप्पा गायकी, ठुमरी आणि नाट्यसंगीत यांसाठी ओळखलं जातं. कमालीच्या प्रसिद्धीपराङमुख असलेल्या मालिनीताईंची दीर्घ मुलाखत रोहिणी गोविलकर यांच्या ‘स्वरभाषिते’ या नुकत्याच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकात आहे. तिचा हा संपादित अंश......

माझ्यासारख्या अनेक दैवतवादी हिंदू संस्कृतीत रुजलेल्या मनाला वाटते, एकाचाच आग्रह का? सगळेच राहीनात! कोणी कोणावर जुलूम नाही केला, म्हणजे झाले!

‘सरकारचे पित्त्ये’, ‘देशद्रोही’ अशा सर्व तऱ्हेच्या शिव्या खाऊनही त्यांनी रागाच्या भरात किंवा सत्तेच्या लालसेने स्वजनद्रोह व लोकशाही तत्त्वांशी द्रोह केला नाही. त्यांचे राजकारण अभ्यासू वृत्तीचे होते. त्यांचे लिखाण बहुजन समाजाच्या वृत्ती थरारून सोडण्यासाठी नसून, बहुजन समाजाला शिक्षण देण्यासाठी होते. त्यांनी आपल्या शहाणपणाची प्रौढी मारली नाही, देशभक्तीचे प्रदर्शन केले नाही; उद्दाम तर ते कधीच नव्हते...

सन १८९९ सालीही पुण्यात प्लेगने फार कहर केला. गणपती झाले की तो यावयाचा व शिमग्यापर्यंत टिकून राहावयाचा असा जणू पायंडाच पडून गेला होता.

असा हा प्लेग पुण्यात १५-२० वर्षे भोवला. त्याचा हा येथवर झालेला विस्तार मी आता आटोपता घेतो व दुसऱ्या विषयाकडे वळतो. तथापि जाता जाता मला येथे असे सांगावेसे वाटते की, गेल्या ५० वर्षांच्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या चक्रातून या देशात इतकी नवीन इंग्रजी डॉक्टरांची पैदास झाल्यानंतर त्यांपैकी कोणा एकालाही जेथे या नवीन रोगाचे निदान करण्याचे ज्ञान नव्हते, तेथे तो त्यावर औषध काय काढणार आणि उपचार तरी काय करणार?...