अमेरिकेवर ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचा जो परिणाम झाला होता, तोच हमास व इस्लामिक जिहादने ७/१०ला इस्त्राएलवर केलेल्या हल्ल्याचा होणार आहे…

पॅलेस्टिनी स्वातंत्र्याला अव्हेरत नव्या मध्य-पूर्वेचे सृजन करण्याचे इस्त्राएल-अमेरिकेचे प्रयत्न हमासने एका दहशतवादी हल्ल्यात उद्ध्वस्त केले आहेत. अर्थातच हमासच्या कृतीने पॅलेस्टिनी स्वातंत्र्याचा प्रश्न सुटणारा नाही. याचा अर्थ पॅलेस्टिन-इस्त्राएल वाद व संघर्ष ७५ वर्षांपूर्वी जिथे होता, तिथेच आहे. वसाहतवाद, दोन महायुद्धे आणि शीतयुद्ध यांनी तयार केलेले संघर्ष न सोडवता जगात शांतता प्रस्थापित होणार नाही...

ट्रम्प हुकूमशहा, ओबामा नोबेल शांती पारितोषिक विजेता, जॉर्ज बुश चांगल्या मनाचा, भोळसट सार्वजनिक काका आणि बायडन प्रेमळ आजोबा इत्यादी इत्यादी...

ट्रम्पचं आज वय आहे ७७ आणि बायडनचं ८०. दोघांनाही पुढच्या निवडणुकीला उभं राहायचं आहे. तेव्हा त्यांची वयं असतील अनुक्रमे ७९ आणि ८३. दोघांनाही बुद्धिभ्रम झालेला आहे. पुढच्या निवडणुकीच्या सुमारास अमेरिका २५० वर्षांची होईल. तिच्या सध्याच्या हालचालीवरून तिला ‘म्हातारचळ’ लागला आहे, असं निदान करण्याशिवाय गत्यंतर नाही. तीच तीच तोंडाची बडबड, अवास्तव खर्च, क्षीण झालेली ताकद, गृहकलह, सूडबुद्धीने चाललेलं राजकारण...

क्रेमलिनच्या पायऱ्यांवर चीनच्या क्षी जिनगिंपनी उदगार काढले – ‘अशी घटना शंभर वर्षांत एखाद्या वेळीच घडते. यापुढे आपल्या भवितव्याचे ‘स्वामी’ आपणच असणार आहोत!’

रशिया-चीन या नवीन सत्ताकेंद्राकडे अनेक नवीन देश आकर्षित होत आहेत. रशिया-चीन युतीपासून अफ्रिकन देशांनी सावध राहावे म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्या देशांच्या नेत्यांना अमेरिकेत बोलवलं. पण अमेरिकेकडून मदतीचा कसलाही ठोस प्रस्ताव न आल्याने पाहुणे मंडळी शांतपणे घरी परतली. त्यानंतर फ्रान्सच्या अध्यक्षांनी आपली मोहिनी अफ्रिकन देशांच्या नेत्यांवर टाकायचं ठरवलं. पण त्यांना उलट तिथे चपराकच मिळाली...

ज्या देशावर साम्राज्यवाद्यांनी आक्रमण केले, ते देश बेचिराख झालेच, पण ज्यांनी आक्रमण केले, त्यांचाही म्हणावा तसा फायदा झाला नाही... तेही खिळखिळे झाले!

नेहमीप्रमाणे याही युद्धाच्या विरोधात जगाच्या विविध देशातील शांतताप्रिय नागरिकांनी मोठमोठी निदर्शने केली आहेत. काही ठिकाणी अजूनही ती चालू आहेत. खुद्द रशियातूनही या युद्धविरोधी भावना व्यक्त होत आहेत. व्हिएतनाम, इराक इत्यादी युद्धाच्या वेळेसही जगातील शांतताप्रिय नागरिकांनी अशी निदर्शने केली होती. पण साम्राज्यवादी देश आपल्या साम्राज्यवादी मनसुब्यासाठी अशा निदर्शनांची फारशी कदर करत नाहीत...

अमेरिकेने अफगाणिस्तानात विकास केला असता अन् अफूला मुळातून संपवले असते, तर अफगाणिस्तानच्या अन् जगाच्या वाट्याला हे भयानक दिवस आले नसते

हे दुर्दैव फक्त अफगाणिस्तानच्या वाटेला आलेलं नाही. व्हिएतनाम, इराण, ग्वाटेमाला, लॅटिन अमेरिकेतील देश, आफ्रिकेतील देश यांची कमी-अधिक प्रमाणात हीच अवस्था अमेरिकेच्या धोरणामुळे झालेली आहे. अमेरिकेला फक्त आपल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हिताचे देणेघेणे आहे. त्यासाठी ती काहीही करायला तयार असते. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने ७०पेक्षा अधिक देशांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या आक्रमण केलेले आहे...

‘तालिब’ या शब्दाची पवित्रता आणि शुद्धता इतकी डागाळली आहे की, गेल्या काही वर्षांपासून ‘तालिबान’ हा शब्द ‘सैतान’ या शब्दाचा समानार्थी शब्द झाला आहे

‘तलब’ म्हणजे शोध घेणे. तलबच्या मुळाशी ‘तलाब’ (तलाव) आहे. ‘तलाश’ आहे. वाळवंटात तहान भागवण्यासाठी तलावाचा शोध घेण्याचे कार्य हा शब्द दर्शवतो. ‘तलब’पासून ‘तालिब’ हा शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ साधक, शोधक, जिज्ञासू. तालिब-ए-इल्म म्हणजे ज्ञानाचा साधक अर्थात शिष्य, विद्यार्थी, चेला, इत्यादी. पश्तूनमध्ये या ‘तालिब’चे अनेकवचन ‘तालिबान’ आहे. ‘तालिब’ या शब्दाला ‘आन’ प्रत्यय जोडून, अनेकवचन ‘तालिबान’ बनले....

श्वास गुदमरून टाकणारी व्यवस्था आणि प्रतीकं हवीत कशाला, असा प्रश्न इंग्लंडच्या ब्रिस्टॉल शहरवासियांना पडला आणि त्यांनी एडवर्ड कोल्स्टनचा सुमारे १२५ वर्षं जुना पुतळा उखडून समुद्रात बुडवला.

वंशश्रेष्ठत्वाची रग अंगात असलेल्या ब्रिटनमध्ये गुलामीची परंपरा फार जुनी आहे. ब्रिस्टॉल या शहराचा इतिहासही तेच सांगतो. ११व्या शतकापासून या शहरात गुलामांचा व्यापार चालत असे. आधी आयरिश, इंग्लिश आणि नंतर काळ्या आफ्रिकन लोकांना गुलाम बनवून या शहरात त्यांची खरेदी-विक्री करण्याचा व्यापार भरभराटीस आला. एडवर्ड कोल्स्टन या ब्रिटिश व्यापाऱ्याचं नाव आफ्रिकी गुलामांच्या व्यापारात आघाडीवर राहिलं...

जर्मनीने करोनाबाबतचे अनेक निर्णय वेळेत घेतल्यामुळे ही लढाई आटोक्यात आल्याचं जाणवतंय. कदाचित एक ‘रिसर्च सायंटिस्ट’ महिला देशाच्या प्रमुख पदावर असण्याचा हा फायदा असावा!

येऊ घातलेल्या अपरिहार्य आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी जर्मनीमध्ये अनेक उपाययोजना करण्यात आल्या. कंपन्यांनी त्यांच्या बहुतेक कर्मचाऱ्यांचे कामकाजाचे तास कमी करून कोणालाही कामावरून काढून टाकलं नाही. सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या पगाराचं आर्थिक ओझं पेलणं शक्य झालं. बालसंगोपनामुळे काम करण्यास असमर्थ असणाऱ्या पालकांना दीर्घ कालावधीसाठी सरकारकडून पैसे मिळणार आहेत...

सुदैवाने किंवा कर्तृत्वाने हुकमी एक्का नेहमी हातात असण्याची सवय असलेल्या अमेरिकन माणसाला हा अनुभव भलताच धक्कादायक आणि भयावह आहे.

या सर्व अनिश्चित वातावरणामध्ये सामान्य अमेरिकन माणूस, ज्याला आजच्या कठीण परिस्थितीतसुद्धा उद्याचे भवितव्य चांगलेच आहे, परिस्थिती आपल्या काबूत आहे हा दिलासा हवा असतो आणि विश्वास असतो, तो गोंधळून गेल्याचे नवल वाटायला नको. अमेरिकेचे प्रमुख इम्युनॉलॉजिस्ट डॉक्टर फाऊची म्हणाले त्याप्रमाणे, ‘आत्तातरी सगळी पाने व्हायरसच्या हातात आहेत; तो स्वतः त्याचे वेळापत्रक आणि पुढील दिशा ठरवतो आहे’...

या दशकातला, या आधीचा कुठला असा अनुभव असेल ज्याने सर्व देशांना, जाती-धर्मांना असं एकत्र येऊन विचार करण्यावर मजबूर केलं असेल?

इंग्लंडमध्ये अजूनही लॉकडाऊनमधून बाहेर पाडण्याचे प्लॅन्स नाहीत. काही मोठ्या कंपन्या ट्रायल बेसिसवर दुकानं उघडू पाहताहेत. ऑफिसेस कधी उघडतील याचा पत्ता नाही. भारतातल्या आयटी सेक्टरवर याचा दूरगामी परिणाम होणार आहे, कारण ‘वर्क फ्रॉम होम’मुळे आता ऑफशोर अकाउंट्सची संख्या वाढेल. जर इंग्लंडत बसून तुम्ही रिमोटली काम करू शकत असाल तर ते भारतातून का नाही होऊ शकणार, हे पटवताना आम्हा आयटी मॅनेजर्सची फेफे उडणार आहे...