आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी...
ग्रंथनामा - झलक
नलिनी जोशी
  • ‘राणीच्या राज्यातले कायदे’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 09 June 2017
  • ग्रंथनामा Granthnama झलक राणीच्या राज्यातले कायदे Ranichya Rajyatale Kayade नलिनी जोशी Nalini Joshi अक्षर प्रकाशन Akshar Prakashan इंग्लंड England

लिगॅलिटीत शिरण्यापूर्वी...

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. वारंवार कोर्टाच्या चकरा मारून कंटाळलेल्या त्रस्त माणसाने तळमळून इतरांना असं सांगितलं असावं. कारण कोर्टाचा निकाल काय लागेल याचा भरवसा नसतो, आणि लागल्यावर न्याय मिळेलच असंही नाही. मात्र कोर्टाबाहेर राहून इतरांच्या कोर्ट केसेस ऐकणं अतिशय रंजक असतं. म्हणूनच राणीच्या राज्यातल्या, म्हणजेच इंग्लंडमधल्या न्यायालयीन खटल्यांचा ओझरता आढावा घेण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे. कोर्टातल्या केसेस कुठल्याही देशातल्या का असेनात रंजकच ठरतात. मग राणीच्या राज्यातल्याच कोर्ट केसेस का? उत्तर सोपं आहे. ‘राणीचं राज्य कायद्याचं’ असा या राज्याचा लौकिक. तेव्हा या राज्यातल्या न्यायालयांमध्ये कायद्याची नागमोडी वळणं कशी असतील अशी मला उत्सुकता होतीच. इथल्या समाजाचं प्रतिबिंब माझ्या या अगोदरच्या दोन पुस्तकांमध्ये ‘राणीच्या राज्यात’ आणि ‘वन्स मोअर राणीच्या राज्यात’ दाखविण्याचा मी प्रयत्न केलेला आहेच. आता हा आहे राणीच्या राज्यातल्या न्यायालयांमधला फेरफटका. - नलिनी जोशी

 हे पुस्तक नुकतंच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. त्यातील हे एक प्रकरण

……………………………………………………………………………………………

मुलं ही आईवडलांचीच प्रतिमा. फार तर सुधारून वाढवलेली आवृत्ती म्हणा. काळानुसार जशा बर्‍याच गोष्टी बदलतात, तशा या प्रतिमाही बदलत जातात. मात्र जेव्हा ही प्रतिमा त्यांचीच वैरी बनते तेव्हा ‘कालाय तस्मै नम:’ असंच म्हणावं लागतं.

प्रो. सर जॉन गॉर्डन हे २०१२ चे मेडीसीनमधले नोबेल पुरस्कार विजेते, अत्युच्च यशाचे मानकरी. ८० वर्षांचे आहेत. पत्नी, मुलगा विल्यम आणि एक मुलगी असं मर्यादित कुटुंब. चांगली आर्थिक परिस्थिती. बुद्धिमत्तेचा, यशाचा, कीर्तीचा तसाच समृद्धीचा मोठा वारसा त्यांनी मुलांसाठी जपलेला. मुलं भाग्यवानच म्हणायला पाहिजेत. पण खरंच ती भाग्यवान आहेत का? विशेषत: मुलगा?

इतक्या चांगल्या गोष्टी सहजासहजी विनासायास मिळाल्याने मुलगा विल्यम या भव्यदिव्य, उज्ज्वल पार्श्वभूमीची पर्वा न करता मद्याच्या पूर्ण आहारी गेला होता. मद्यपी असल्याने नोकरी कशी टिकणार? आणि नोकरी नसताना दारूसाठी पैसे तरी कुठून मिळणार? आणि समाजात प्रतिष्ठा तरी कशी टिकवणार?

मद्यपींना व्यसनमुक्त करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था प्रयत्नशील असतात. मद्य पिण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या अनेक योजना असतात. वेगवेगळे प्रोग्रॅम असतात. प्रो. महाशयांनी आपल्या ४० वर्षांच्या या मुलाला मोठ्या मुष्किलीने या प्रोग्रॅमना जायला भाग पाडलं. काही ना काही कारण काढून तो तिकडे जायला टाळाटाळ करायचा. तरीदेखील आई-वडलांच्या सततच्या प्रयत्नांमुळे त्याचं पिणं काहीसं कमी झालं होतं. आशा पल्लवित होत असताना एक दिवशी अचानक... विल्यमची आई दुपारचं जेवण बनवण्याच्या गडबडीत होती. वडील तिला भाजी कापणं, सलाड तयार करणं, अशी मदत करत होते. विल्यम नेहमीच उशिरा उठायचा, तसाच त्याही दिवशी उशिरा उठून तो किचनमध्ये आला. त्याला पाहून वडील म्हणाले ‘गुड मॉर्निंग’. त्यानंही शांतपणे ‘गुड मॉर्निंग’ केलं आणि तो फ्रीजकडे वळला. त्याच्याकडे कौतुकाने पाहत वडील म्हणाले, ‘‘अल्कोहोल अॅनानिमस प्रोगॅमचा तुला चांगला उपयोग झालेला दिसतो आहे. उद्यापासून त्यांचा नवीन प्रोगॅम सुरू होणार आहे. तेव्हा तू तो पुन्हा जॉईन कर. मधे ब्रेक न करता चालू ठेव पूर्ण यश मिळेपर्यंत.’’

त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत विल्यम त्वेषाने वळला आणि त्यांच्या हातातली सुरी खेचून त्यांच्यावर वार करणार, एवढ्यात त्याची आई मोठ्यानं ओरडत मधे आली आणि त्याला ढकलायचा प्रयत्न करू लागली. विल्यमने धक्का देऊन तिला पण ढकलून दिलं. ती धाडकन खाली पडली. हाताचं आणि मनगटाचं हाड मोडलं. त्याही परिस्थितीत ती मदतीसाठी ओरडत होती. तिच्या ओरडण्याने शेजारी धावत आले आणि त्यांनी विल्यमला बाजूला करून त्याच्या वडलांना वाचवलं. ते विल्यमने केलेल्या दोन वारांमुळे जखमी झालेले होतेच. शेजार्‍यांनी ताबडतोब डॉक्टरांना बोलावले, शिवाय पोलिसांनाही फोन केला. पोलीस विल्यमला अटक करून घेऊन गेले.

वडलांच्या खुनाचा प्रयत्न केला म्हणून विल्यमवर आरोप ठेवण्यात आला. खटला सुरू झाला. पहिल्याच सुनावणीसाठी कोर्टात खूपच गर्दी झाली होती. पण त्या दिवशी विपरीतच घडलं. ते असं साधारण सुनावणीपूर्वी न्यायाधीश काहीही विधान करत नाहीत किंवा स्टेटमेंटही देत नाहीत. पण विल्यमला पाहून न्यायाधीश अस्वस्थ झाले आणि रागावून त्याला म्हणाले, ‘‘खरं म्हणजे कुठलीही सुनावणी न करता तुला सरळ जेलमधे पाठवायला हवं. अतिशय सज्जन, विद्वान व नोबल प्राइझ विनर असलेल्या आपल्या वडलांच्या हत्येचा प्रयत्न करणार्‍याला कोणतीही शिक्षा अपुरीच पडेल. पण कायदा प्रमाण मानून मी सुनावणी सुरू व्हावी असं सुचवतो.’’ खरं म्हणजे न्यायाधीश संयमी व शांत असतात. अशा प्रकारे भावनांचा उद्रेक त्यांच्याकडून अपेक्षित नसतो. पण विल्यमच्या कृतीने ते घडवून आणलं.

राणीच्या राज्यातले कायदे : नलिनी जोशी

अक्षर प्रकाशन, मुंबई,

पाने : ९५ , मूल्य :  १०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3496

……………………………………………………………………………………………

मात्र यानंतरही विल्यम हे सारं मख्खपणे पाहत होता. त्याची काहीच प्रतिक्रिया नव्हती. त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याचं सांगून त्याच्या वकिलाने त्याची वस्तुस्थिती निवेदन केली- वडलांनी त्याला २०,००० पौंड दिले होते हे खरे, पण आता त्याचे हे पैसे संपत आलेले आहेत. त्याला नोकरीदेखील मिळत नाही. त्याला दारू पिण्याचं व्यसन असलं तरी आता आठवड्यातून फक्त दोनदाच दारू पिण्याचं त्याने मान्य केलं आहे. तो आता सुधारू इच्छितो. तेव्हा त्याला चूक सुधारण्याची संधी द्यावी.

वकिलांच्या या विनंतीनंतर विल्यमच्या आईनेदेखील त्याच्याबद्दल सहानुभूतिपूर्वक विचार व्हावा असं सांगितलं. ती म्हणाली, ‘‘विल्यम स्वभावाने चांगला आहे; पण दारू प्यायल्यावर तो खरा विल्यम राहत नाही. दारू त्याच्याकडून असं काही नको ते करविते.’’

‘‘त्याच्या गुन्ह्याचा सहानुभूतीने विचार व्हावा, त्याला व्यसनमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असं सांगून वडलांनी त्याच्या या पहिल्याच गुन्ह्यासाठी सौम्य शिक्षा द्यावी असं सुचवलं.

या सार्‍या प्रकाराने विल्यमला खरंच सहानुभूती दाखवण्यात आली. त्याला फक्त ६ आठवड्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. तसंच तुरुंगवासानंतर एक वर्ष त्याने पोलीस सुपरव्हिजनमध्ये काढायचं आणि व्यसनमुक्ती उपचार घ्यायचे असं सांगण्यात आलं.

‘‘विल्यमचं आमच्या कुटुंबात स्वागतच आहे. त्याला त्याच्या कृतीचा पश्चात्ताप झालेला आहे. आता तो नक्की सुधारेल.’’ अशी त्याच्या बहिणीला आशा आहे.

आपल्या माणसाचा राग आला तरी त्याला शिक्षा व्हावी असं कोणालाही वाटत नाही. आई-वडलांना तर नाहीच नाही. म्हणूनच त्यांनी विल्यमला वाचवण्याची भूमिका घेतली. हे योग्य का अयोग्य हे काळच ठरवेल. आता तरी वडलांनी आपल्या कुलकलंकाला वाचवलं असंच लोक म्हणणार.

राणीच्या राज्यातले कायदे : नलिनी जोशी

अक्षर प्रकाशन, मुंबई, पाने : ९५ , मूल्य :  १०० रुपये.

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......