धनगर समाजाच्या संस्कृतीची सफर घडवणारी एक दिवशीय सहल, ‘धनगरवाडा’ची!
ग्रंथनामा - आगामी
रोहन चंपानेरकर
  • धनंजय धुरगुडे यांच्या ‘माझा धनगरवाडा’ या आत्मकथनाचं मुखपृष्ट
  • Fri , 15 June 2018
  • ग्रंथनामा आगामी धनगरवाडा Majha Dhangarwada धनंजय धुरगुडे Dhananjay Dhurgude

शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन भटकणारी जमात म्हणजे धनगर! पाठीवर बिऱ्हाड आणि हातावर पोट घेऊन सतत एका ठिकाणाहून दुसरीकडे हिंडत राहणं, हेच ज्यांचं आयुष्य आहे, ज्यांना ‘स्थैर्य’ ही गोष्ट दुर्लभ आहे. अशांना चाकोरीतल्या सुविधा मिळणं ही अशक्यप्राय गोष्ट असते. मूलभूत गोष्टींसाठीही ज्यांचा सतत झगडाच असतो, अशा या लोकांसाठी शिक्षण ही तर चैनीची आणि न परवडणारी गोष्ट असते. पण अशातही एक बाप आपल्या मुलांनी शिकलंच पाहिजे, या जिद्दीनं प्रेरित होतो आणि अक्षरश: आव्हानांचे डोंगर पार करत मुलांना शिकवतो. हा सारा प्रवास शिकलेला आणि आता प्राध्यापक बनलेला मुलगा शब्दबद्ध करतो... ‘माझा धनगरवाडा’ या आत्मकथनातून!

रोहन प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या आणि धनंजय धुरगुडे यांनी लिहिलेल्या ‘माझा धनगरवाडा’ या आत्मकथनाची ही थोडक्यात ओळख! धनगर समाजातल्याच एका व्यक्तीनं लिहिलेल्या या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची ‘ऑथेंटिसिटी’! सुरुवातीला रानोमाळ भटकत व नंतर ‘धनगरवाडा’ सोडून परक्या शहरात राहून धुरगुडे शिकले, त्याची ही गोष्ट! म्हणजेच एका अर्थी हे पुस्तक म्हणजे ‘घोंगडी ते लेखणी’ असा प्रवास आहे. मात्र हे आत्मकथन केवळ हाच प्रवास सांगून थांबत नाही. धनगर  समाज, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चालीरीती, संस्कृती, खास त्यांची लोकगीतं, कथा, उत्सव, धार्मिक श्रद्धा, खाद्यसंस्कृती अशा सर्व गोष्टीं ते वेध घेतं आणि म्हणूनच हे आत्मकथन म्हणजे धनगर  समाजाविषयीचा उत्तम दस्तवेज आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला. विशेषत: एका धनगर व्यक्तीनं स्वत:च्या समाजाविषयी लिहिल्यानं त्याला जी विश्वासार्हता लाभली, त्यामुळे त्याची वाचनीयता अधिक वाढली आहे, असं मत अनेक मान्यवर आणि वाचकांनीही नोंदवलं. पुस्तकाच्या निमित्तानं प्रकाशक प्रदीप चंपानेरकर, मी स्वत: आणि या पुस्तकाचं साक्षेपी संपादन केलेले टीम रोहनमधले संपादक- प्रणव सखदेव आणि अनुजा जगताप हे चौघे जण सालपे येथील धनगर जत्रेलाही आवर्जून जाऊन आलो. तिथं जाऊन त्यांची संस्कृती आम्ही जवळून अनुभवली. पुस्तकाचं मुखपृष्ठ रेखाटणारे ख्यातनाम चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी आणि प्रदीप चंपानेरकर यांनी एका धनगरवाड्याला स्वत: भेट दिली... त्यामुळे या पुस्तकाचं कव्हर आणि आतली रेखाचित्रं जिवंत झाली आहेत.

.............................................................................................................................................

‘माझा धनगरवाडा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4276

.............................................................................................................................................

वाचकांचा प्रतिसाद आणि टीम रोहननं धनगरवाड्याला दिलेली प्रत्यक्ष भेट यातून एक अभिनव कल्पना पुढे आली. ती म्हणजे उत्सुक वाचकांसाठी धनगरवाड्याची एक सैर आयोजित करावी. त्यामध्ये वाचक-रसिकांना धनगर संस्कृती जवळून जाणून घेता येईल. चालीरीती, रूढीपरंपरा समजून घेता येतील. म्हणूनच रोहन प्रकाशनानं एक दिवसाची ‘धनगरवाडा’ भेट आयोजित केली आहे.

विशेष गोष्ट म्हणजे लेखक धनंजय धुरगुडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार नुकताच मिळाला आहे. त्यानिमित्तानं त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम या भेटीत आयोजित केला आहे. वाईजवळच्या धोम धरणाच्या परिसरातल्या धनगरवाड्याला ही भेट देण्यात येईल. रविवार, १७ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात ही सैर होईल. यासाठी १२५० रुपये इतकं नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यात चहा, खाणं, जेवण व प्रवासखर्च समाविष्ट आहे.

वाचक व रसिकांना स्वत: धनगरवाड्याचे अनुभव गोळा करता यावेत, हाच त्यामागचा हेतू आहे. तसंच फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठीही ही एक उत्तम संधी आहे.

लेखक भेटीचा हा एक आगळावेगळा उपक्रम आहे. पुस्तकाच्या निमित्तानं असा कार्यक्रम प्रकाशन क्षेत्रात प्रथमच आयोजित केला जात असावा. 

.............................................................................................................................................

तारीख व वेळ : रविवार, १७ जून २०१८, सकाळी ९ ते सायं. ५

स्थळ : धोम धरण परिसर, कृष्णा खोरे, वाईजवळ

शुल्क : १२५० रुपये प्रत्येकी

नावनोंदणीसाठी संपर्क : ०२० - २४४८०६८६, २४४९७८२३, २४४८९१०९, ९९६०७८८८२०                       

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......