रामचंद्र गुहा १९५८ ऐवजी १८५८ ला जन्मले असते तर?
ग्रंथनामा - रामचंद्र गुहा @ 60
गोपालकृष्ण गांधी
  • रामचंद्र गुहा
  • Sun , 29 April 2018
  • रामचंद्र गुहा @ 60 रामचंद्र गुहा Ramchandra Guha

हा मूळ इंग्रजी लेख ‘www.outlookindia.com’ साप्ताहिकाच्या ९ एप्रिल २०१८च्या गुहा यांच्यावरील विशेषांकात प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

कल्पना करा की रामचंद्र गुहा १९५८ मध्ये नव्हे तर १८५८ मध्ये जन्मले असते तर काय झालं असतं? म्हणजे १९१८ साली वयाच्या साठाव्या वर्षी प्राध्यापक गुहा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजातून निवृत्त झाले असते आणि त्यांनी पुढील पाच भूमिका संयुक्तपणे निभावल्या असत्या.

१. ‘द इंडियन लिबरल’ या इंग्रजी नियतकालिकाचे ते संस्थापक-संपादक असते. हे नियतकालिक जरी पुण्याबाहेरून प्रसिद्ध होत असलं, त्याचा वाचकवर्ग मर्यादित असला तरी त्यात बड्या बड्या धेंडांचा समावेश असता. मग ‘बॉम्बे सिक्रेट पोलीस’ खात्यानं आपल्या खास अहवालात नमूद केलं असतं की, “वरवर पाहाता हे नियतकालिक उदारमतवादी वाटलं तरी प्रत्यक्षात ते बंडखोर आहे, इंग्लंडच्या राणीला विधायक सहकार्य देऊ, असं ते म्हणत असले तरी प्रत्यक्षात मात्र, बौद्धिक पातळीवर कुठल्याही गोष्टीला अंधपणे मान्यता न देण्यासच ते सांगत आहेत. म्हणजे बंडात थेट सामील व्हायचं नाही, तरी मागील दाराआडून पाठिंबा द्यायचा असं त्यांचं चाललं आहे.’’ हे वाचल्यावर बॉम्बेच्या गव्हर्नरानं त्या अहवालाच्या मार्जिनमध्ये जांभळ्या शाईनं लिहून ठेवलं असतं : “हा गुहा म्हणजे बेझंटचा अनुयायी असण्याचं ढोंग करणारा पण प्रत्यक्षातला गांधीवादी आहे असंच मलाही वाटतं. या माणसावर लक्ष ठेवा.’’ मग ब्रिटिश साम्राज्याला साथ देणाऱ्यात तामिळ लोक कोण होते यावर अभ्यास करणाऱ्या प्राध्यापक ए. आर. वेंकटचलपती यांना शंभर वर्षांनंतर ‘इंडिया ऑफिस रेकॉर्ड्स’मध्ये हा अहवाल मिळाला असता.

. मग गुहा ब्रिटिश भारतातील महत्त्वाच्या राजधान्यांत, मुख्य शहरांत तसेच संस्थानांच्या ताब्यातील भारतातले लोकप्रिय सार्वजनिक वक्ते ठरले असते. त्यांना तत्कालिन प्रसिद्ध वक्ते श्रीनिवास शास्त्री यांचे ‘गुरू’ अशी पदवी मिळाली असती. मग ब्रिटनचे भारतमंत्री एडविन मॉण्टॅग्यू भारतात आले असताना त्यांच्या स्वागत भोजनप्रसंगी व्हाईसरॉय केम्सफिल्ड यांनी गुहांचं कौतुक करताना म्हटलं असतं की, ‘‘हे खूप बुद्धिमान, व्यासंगी, बोलण्यात अत्यंत चतुर आणि खूप म्हणजे खूपच मिस्किल आहेत.’’ हे वर्णन ऐकल्यावर मॉण्टेग्यू उद्गारले असते, “हो का? मग त्यांना ब्रिटिश साम्राज्याची सरदारकीची वस्त्रं आपण का बरं देत नाही?’’ हे ऐकल्यावर केम्सफिल्डना खाली मान घालून समोरच्या हिरव्यागार मटारसुपात बघण्याखेरीज गत्यंतर उरलं नसतं.

३. गतवर्षीपर्यंत ज्या अध्यक्षपदी गुहांच्या स्नेही डॉ. अॅनी बेझंट होत्या, त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील एक अस्वस्थ सदस्य या नात्यानं त्यांनी नवीन अध्यक्ष सैय्यद हसन इमाम यांना चहा पिता पिता सल्ला दिला असता की, ‘‘हे बघा इमामसाहेब, खिलाफत चळवळीला पाठिंबा देणं हे हातातून निसटू पाहाणाऱ्या तलवारीसारखं आहे. मला तुर्कस्तानच्या अस्मितेबद्दल सहानुभूती असली तरी ही तलवार कृपा करून धर्मांधांच्या हातात पडू देऊ नका. मी साम्राज्यवादाच्या—अगदी सर्व प्रकारच्या साम्राज्यवादाच्या विरुद्ध आहे, तसाच धार्मिक मूलतत्ववादाच्या आणि एकुणच  मूलतत्त्ववादाच्याहीविरुद्ध आहे.’’ हे ऐकल्यावर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले असते, “गुहासाहेब, तुम्ही कशाच्या विरुद्ध आहात ते समजलं, मग आता तुम्ही कशाच्या बाजूनं आहात ते विचारतो’’. हा प्रश्न प्राध्यापक गुहांना अगदीच बालीश वाटला असता. त्यामुळे त्यांनी उघड उघड वैतागून उत्तर दिलं असतं, “पारशी आणि हिंदू क्रिकेट संघांनी यॉर्कशायर काउंटी अकरा या संघाला लॉर्ड्सच्या मैदानावर जिंकावं या बाजूचा मी आहे. मग आपण हरलेल्या इंग्रज संघासाठी लंडनमध्ये डिनर ठेवू आणि त्या वेळेस मुख्य पाहुणे म्हणून रणजी आणि आगा खानना बोलावू.’’ हे बोलणं ऐकल्याववर हसन इमाम चहाच्या कपातल्या उरलेल्या गाळाकडे बघत राहिले असते.

४. त्यांचे अत्यंत जवळचे स्नेही आणि सहकारी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या १९१५ साली झालेल्या अकाली निधनामुळे भारतसेवक समाजाचे सदस्य या नात्याने ते अद्यापही खूप खिन्न असते, त्यांनी  ‘द इंडियन लिबरल’ या नियतकालिकाच्या संपादकीयात त्यांच्या निधनाबद्दल लिहिलं असतं : “गोखल्यांना अर्थशास्त्र नेमकेपणानं अवगत होतं, कायद्याचे ते पंडित होते आणि राजकारणाचे तर अध्वर्यूच होते. परंतु त्यांचं मन या अर्थशास्त्राच्या, कायद्याच्या आणि राजकारणाच्याही पल्याड पोचलं होतं. या सर्व यशाच्या वर त्यांच्यातली साधीसुधी सभ्यता आणि नम्रता उभी होती. त्यांच्यातली प्रामाणिक माणुसकी अजूनही शाबूत होती त्यामुळे स्वतःचं चुकलं तर मान्य करायला ते अजिबात मागेपुढे पाहात नव्हते. स्वतःचं वागणं तपासूनच न पाहाण्याचा उथळपणा त्यांच्याकडे अजिबात नव्हता. ते स्वतःच्याच अंहकारात बुडालेले नसल्यामुळेच सहजपणे दुसऱ्याला म्हणू शकत होते की, “मला तुमच्याकडून हे शिकलं पाहिजे.’’ गोखल्यांबद्दल एवढं लिहिल्यावर गुहांनी पुढे अशीही पुस्ती जोडली असती की, “अरेरे, परंतु दूरदृष्टी नसलेल्या त्यांच्या काही सहकाऱ्यांकडे मात्र आपल्या नेत्याच्या ठायी असलेल्या सहृदयतेची वानवा आहे, माननीय ए. व्ही ठक्कर हे त्यातलेच एक! त्यांना वाटतं की ‘आदिवासी कल्याण’ म्हणजे आदिवासींना खादीचे कपडे घालायला द्यायचे आणि भजनं गायला लावायची. ‘एकता’ असावी हे तत्त्व म्हणून बरोबरच आहे हो, परंतु याचा अर्थ सर्वांना एकाच छापाचा गणपती करून टाकायचं असं नसतं. आपले आदिवासीजन हे आदिवासी आहेत म्हणून त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे, त्यांच्यावर बाह्य गांधीवाद थोपता कामा नये.’’

. गुहांची होमरूल लीगच्या बैठकीमध्ये जवाहरलाल नेहरू या तरुण नेत्याशी भेट होऊन मैत्रीही झाली असती. मग एका ब्रेकफास्ट मिटिंगमध्ये त्यांनी जवाहरलालजींना सल्ला दिला असता की, “कार्ल मार्क्सचा तुमच्यावर प्रभाव पडला आहे हे मला माहिती आहे. तो तुमच्या उत्साहात, देशासाठी त्याग करण्याच्या तुमच्या तयारीत मला जाणवतो. परंतु एक सावधगिरीचा इशारा तुम्हाला द्यायलाच हवा. तो म्हणजे क्रांतीची सगळी कळा नंतरच्या काळात उतरते. म्हणजे जी प्रस्थापित व्यवस्था क्रांतीकारकांना संपवायची असते तिच्याइतकीच नंतरची व्यवस्थाही घृणास्पद, हिणकस होते. आजचे स्वातंत्र्यदाते उद्याचे हुकुमशहा बनू शकतात.’’ त्यावर जवाहरलालजी त्यांना म्हणाले असते, “सर, आपण आधी तिथपर्यंत पोचूया तर खरे... त्या स्थितीपर्यंत पोचल्यावर मग तो हिणकसपणाचा धोका आपण हाताळूच.” त्यावर साठ वर्षांच्या गुहांनी त्यांना सांगितलं असतं, ‘‘जवाहर, तू स्वातंत्र्य मिळवशीलच परंतु मी असा अंदाज बांधतो की, तुमचं स्वातंत्र्य सुस्थापित होईपर्यंत त्या यशाखाली तू बुडून जाण्याएवढा दबला जाशील... मग त्याच वेळेस बरोब्बर तुझ्या ‘एस एस लिबर्टी’ नामक जहाजातून हे लहानलहान जुलमी सरदार बाहेर पडतील, तीक्ष्ण दात आणि कधीही न संपणारी भूक असलेले  उंदीर असतील ते.’’ 

पॅट्रिक गेडेस हे स्कॉट गृहस्थ, समाजशास्त्रज्ञ आणि शहरनियोजक त्या काळात भारतात आले होते. त्यांची या साठ वर्षं वयाच्या वयस्कर राष्ट्रवाद्याशी म्हणजेच रामचंद्र गुहांशी जिवलग मैत्री झाली असती. पॅट्रिक आणि अॅना गेडेस भारतात काही काळ वास्तव्यास आले असताना प्राध्यापक गुहा आणि त्यांची इंग्लिश पत्नी युजीन (युजिन या नावाचा अर्थ आहे सुजाता, जे सध्याच्या प्राध्यापक गुहांच्या पत्नीचं नाव आहे.) यांची भेट घडून त्यांच्यात स्नेहबंध निर्माण झाले असते. मग एडिनबर्ग येथील आपल्या घरून गेडेसनी गुहांना पत्र लिहिलं असतं, “प्रिय मित्र राम, तू साठ वर्षांचा झालास म्हणे, तसं हे वय पुष्कळ असलं तरी तुला जे काही करायचं आहे आणि ते तू नक्कीच करशील असा माझा विश्वासही आहे, त्या दृष्टीनं हे वय काही फार नाही.” त्या पत्राला उत्तर देताना गुहांनी लिहिलं असतं, “प्रिय पॅट्रिक, मला लोकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारताना अवघडल्यासारखं होत आहे कारण ते मला एक यशस्वी लेखक किंवा उत्तम वक्ता म्हणून ओळखतात खरे, पण मीही चुका करू शकतो. लोकांबद्दल अंदाज बांधण्यात किंवा स्वतःचे विचार मांडण्यात मीही चुकू शकतो. मला आलेल्या शुभेच्छापत्रांपैकी एक शुभेच्छापत्र अगदीच आगळंवेगळं आहे. ते पत्र आपण दोघंही ज्यांचं कौतुक करतो अशा व्यक्तीकडून म्हणजे नेहरूंकडून आलं आहे. मी हल्लीच धार्मिक संकुचिततेवर लेख लिहिला. त्या लेखातील काही मुद्द्यांबद्दल त्यांनी हरकत घेतली आहे. मी लिहिलं होतं की बुरखा आणि त्रिशूल अशा बाह्य प्रतीकांमुळे धर्मभावनांना खतपाणी घातलं जातं.  त्यावर नेहरूंनी लिहिलंय की, “धार्मिक संकुचिततेवरचे तुमचे विचार मला पटतात. म्हणजे चांगली संकुचितता आणि वाईट संकुचितता असं काही नसतं. पण तरीही लाखो महिला परिधान करतात त्या निरुपद्रवी पोशाखाची तुलना तुम्ही ज्या त्रिशुळाचा वापर बहुदा धमकावण्यासाठीच केला जातो, त्याच्याशी केलीत ती मला विचित्र वाटली. अर्थात् हे लिहीत असलो तरी ती गोष्ट तुम्हाला द्यायच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांआड येणार नाही, बरं का ! असंच परखड, प्रांजळ लिहीत राहाण्याची आणि बोलण्याची बरीच बरीच वर्षं तुम्हाला मिळोत.’’ नेहरूंच्या या पत्राच्या उत्तरादाखल मी त्यांना लिहिलं की, मुद्दा योग्य असला तरी चुकीचं उदाहरण दिल्यामुळे निष्प्रभ होऊ शकतो हे मी मान्य करतो.

मग गेडेस-गुहा पत्रव्यवहारात नेहरूंचे नेते गांधीजी यांच्याबद्दल आणि त्यांच्या ‘हिंद-स्वराज’ बद्दलही लिहिलं गेलं असतं. गुहांनी गेडेसना लिहिलं असतं : ‘‘प्रिय पॅट्रिक, मी हल्लीच गांधींचं ‘हिंद स्वराज’ पुन्हा एकदा वाचलं. ते वाचून मला वाटलं की, भविष्यातले लोक गौतम बुद्धांनतर जन्मलेला महान भारतीय माणूस म्हणून गांधीजींना ओळखतील. आता या भविष्यकथनाबद्दल ‘हा आला बघा, भारतीय ज्योतिषी,’ म्हणून मला कुणी नावं ठेवली तरी हरकत नाही. पण मी त्यांच्याकडे त्याच दृष्टीनं पाहतो. एक मात्र आहे की, गांधीजींचा अभ्यास न करता त्यांना फक्त देव्हाऱ्यात ठेवून पुजलं तर तो त्यांचा अधिक्षेप ठरेल. मला वाटतं की, त्यांची उत्तमोत्तम पुस्तकं अजूनही लिहून व्हायचीच आहेत. मात्र ती आत्मचरित्रात्मक असावीत. उदाहरणादाखल सांगायचं तर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील लढ्याबद्दल सांगावं. त्याचबरोबर ‘हिंद स्वराज’कडेही लोकांनी एखाद्या धर्मग्रंथाकडे बघतो तसं बघू नये तर विचारांची घुसळण चाललेल्या मनातून व्यक्त झालेले विचार या नजरेनं पाहावं. मला वाटतं की, भविष्यातील एखाद्या चरित्रकाराला गांधीजींची व्यक्तिरेखा रेखाटताना ते एक महामानव होते, आपल्याला भयमुक्त करणारे जणू दुसरे बुद्धच होते असं चित्र रंगवणं शक्यही होईल.’’  

..................

रामचंद्र गुहा यांच्यावर लिहिलेले वरील सर्व वर्णन अर्थातच संपूर्णतया काल्पनिक आहे. परंतु आजच्यासारख्या काळात जेव्हा सत्य हे कल्पितापेक्षाही अद्भुत असतं, अमुकच शिकवण, फसवणूक आणि सांस्कृतिक-नैतिक–हासाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्यावर थोपल्या जातात, तेव्हा आपल्याला वास्तवातील रामचंद्र गुहांमध्ये अशी एक व्यक्ती दिसते, जिचं लेखन काल्पनिक असूनही वास्तववादी वाटतं. थोरो या विचारवंतानं सांगितलेल्या ‘आज्ञा झुगारण्याच्या कर्तव्या’च्या जोडीला ‘आवश्यक तिथे निषेध नोंदवण्याची जबाबदारी’ आणि ‘एखादं म्हणणं खोटं असल्याचा पुराव्यानं सिद्ध करण्याचा अधिकार’ या गोष्टीही त्यात मांडलेल्या असतात. केवळ ‘कंपूतला अनुयायी’ न बनता एखाद्या सिद्धान्ताची नीट ओळख करून घ्यायची, मग त्याला पाठिंबा देऊन चारचौघांना त्याबद्दल सांगायचं हे त्यात होत असतं.अशा वेळेस मग अमुकच शिकवणीला बळी न पडता ‘खऱ्या अर्था’ला महत्त्व मिळतं, रीतीरिवाजांपासून ‘खऱ्या तत्त्वाला’ वाचवता येतं, अंधभक्ती न करताही जवळ जाता येतं आणि आदर्शांना बेगडापासून मुक्त करता येतं. मग आपण जशी प्रामाणिक टीका इतरांवर करतो तशीच प्रामाणिक टीका  आपल्यावर केलेलीही खिलाडूपणानं स्वीकारता येते.

.............................................................................................................................................

‘गांधींनंतरचा भारत’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3683

.............................................................................................................................................

‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4372

.............................................................................................................................................

मराठी अनुवाद- सविता दामले

savitadamle@rediffmail.com

.............................................................................................................................................

लेखक गोपालकृष्ण गांधी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते, तसेच पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि दक्षिण आफ्रिकेचे उच्च्युक्त या पदांवरही त्यांनी काम केलं आहे

 .............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 03 May 2018

सविताताई, लेख रोचक आहे. अनुवादही अनुवाद वाटंत नाही इतका झक्क जमलाय. श्री. गुहांची वंगभंग चळवळ व भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस नेण्याबद्दलची मतं वाचायला आवडली असती. तसंच मे १९१८ साली पाहिल्या महायुद्धाचा अखेरचा टप्पा सुरू झाला होता. त्याविषयीची वक्तव्यंही रोचक ठरली असती. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......