प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईकांना आर्थिक मदतीची गरज
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
निवेदन
  • प्रख्यात रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक
  • Fri , 22 September 2017
  • ग्रंथनामा Granthanama वाचणारा लिहितो गुरुनाथ नाईक Gurunath Naik

‘कॅप्टन दीप’, ‘गोलंदाज’, ‘धुरंधर’, ‘शिलेदार’, ‘गरूड’, ‘शब्दवेधी’, ‘रातराणी’ ही व्यक्तिरेखांची नावं उच्चारताच मराठी वाचकांच्या एका पिढीला ज्यांची आठवण होते, ते हजाराहून अधिक रहस्यमय कादंबऱ्या लिहिणारे विक्रमवीर लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ नाईक सध्या गोव्यात विपन्नावस्थेशी आणि आजारांशी झुंज देत आहेत. 

७९ वर्षांचे नाईक गेली बारा वर्षं ब्रेन स्ट्रोकच्या आजारानं ग्रस्त आहेत. आता त्यांच्या छातीत इन्फेक्शन झाल्यानं त्यांच्यावर गोव्यातील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मूळ गोव्याचे असलेल्या नाईक यांना काही पत्रकारांच्या पुढाकारानं गोवा सरकारकडून निवासासाठी भाड्यानं फ्लॅट मिळाला आहे आणि गोवा सरकारची दरमहा तीन हजार रुपयांची पेन्शनही त्यांना मिळते. मात्र, त्यांच्या आणि पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी आणि औषधोपचारांसाठी अन्य कोणतंही उत्पन्नाचं साधन त्यांच्याकडे नाही. त्यांच्या निवडक पुस्तकांचे नव्यानं संच काढून त्यातून त्यांना काही घसघशीत आर्थिक तरतूद करून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हा प्रकल्प वास्तवात यायला काही काळ जाईल. सध्याची निकड त्यातून भागणार नाही. त्यांचा मुलगा लातूरमध्ये एमएस्सीचं शिक्षण घेत आहे आणि तो कॉलेजखर्चही अर्धवेळ नोकरी करून भागवतो. नाईक यांना आर्थिक मदतीची गरज आहे. ती करण्याची क्षमता आणि इच्छा असलेल्यांनी कृपया पुढील बँक खात्यात रक्कम जमा करावी, ही विनंती.

स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा - पणजी

गुरुनाथ नाईक

खाते क्र. : 31180667793

आयएफएससी : SBIN0005554

.............................................................................................................................................

रहस्यकथांच्या या शहेनशहाला किंवा बादशहाला जाणून घ्या. ‘इन गोवा न्यूज’ या वृत्तवाहिनीने २२ डिसेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध रहस्याकथाकार गुरुनाथ नाईक यांची मुलाखत तीन भागांत घेतली. ती पुढील लिंकवर पाहता, ऐकता येईल.

गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग एक

गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग दोन

गुुरुनाथ नाईक यांची मुलाखत - भाग तीन

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......