दिवे लागले रे दिवे लागले…
दिवाळी २०१७ - प्रास्ताविक
संपादक अक्षरनामा
  • दिवाळी अंकात ज्यांच्याविषयी लेख आहेत त्यांची छायाचित्रे
  • Wed , 02 November 2016
  • दिवाळी २०१६ संपादक अक्षरनामा Aksharnama Divali 2016

‘अक्षरनामा’चा हा पहिला दिवाळी अंक. दिवाळी हा खास भारतीयांचा, भारतीय माणसांचा सण! सांस्कृतिक परंपरेचं अधिष्ठान असलेली आणि तिच्या निष्ठावान पाईकांना हर्षभरानं उल्हसित करणारी दिवाळी देशभर साजरी होते. भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तो आपल्या मगदुराप्रमाणे आणि उपलब्ध परिस्थितीत दिवाळी साजरी करतोच करतो. कारण प्रकाशाचं दान मागायची आणि द्यायची त्याची संस्कृती आहे.

दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. ‘दिव्याने दिवा पेटवावा, प्रकाश भेटवावा, तुम्हा-आम्हा’ असं पसायदान मागणाऱ्या भारतीय संस्कृतीत दिव्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीनं दिव्याला भक्ती, प्रार्थना आणि आशीर्वादाचं प्रतीक मानलं आहे. दिव्याला एवढं महत्त्वाचं स्थान असल्यानं आणि त्याच्याबद्दल मनुष्यप्राणी सुरुवातीपासूनच कृतज्ञता व्यक्त करत आल्यानं त्याला नटवायला, सजवायला सुरुवात झाली. त्याची वेगवेगळी रूपं तयार करण्यात आली. आणि त्यातूनच या दिव्यांचा उत्सवाला सुरुवात झाली असावी.

आपण दिव्याकडे प्रकाश मागतो, अंधाराचा सामना करण्यासाठी. अंधार आपल्या सभोवतालचा आणि आतला. सभोवतालचा अंधार दिवे लावून दूर करता येतो. पण आतल्या अंधाराचं तसं नाही. त्यासाठी आपलं मन शुचिर्भूत असावं लागतं. हल्ली मात्र आत-बाहेर सर्वत्र अंधारच साचत चालला आहे. अंधाराच्या भिंती चहूबाजूंनी बुलंद होत चालल्या आहेत आणि पर्यायानं प्रकाशाचे कवडसे तुम्हा-आम्हापासून काहीसे दुरावत चालले आहेत.

त्या दुरावलेल्या कवडशांपर्यंत जाण्यासाठी किंवा त्यांना आपल्यापर्यंत आणण्यासाठी उमेद, साहस, आत्मविश्वास यांच्या भरणपोषणाची गरज असते. ते करण्यासाठीचा हा ‘अक्षरनामा’चा एक छोटासा प्रयत्न. या वर्षांत अनेक व्यक्ती या ना त्या कारणानं चर्चेत आल्या. त्यामुळे या अंकाची मुख्य कल्पना ‘माणूस, त्याचा विचार आणि त्याचं काम’ ही आहे. तीन प्रमुख विभाग असलेल्या या अंकातून प्रकाशाचे काही उत्साहवर्धक कवडसे पकडण्याचा आत्मविश्वास वाचकांमध्ये येवो. त्यांचा आसंमत मांगल्यमय विचारानं उजळून जावो.  

हा दिवाळी अंक वाचकांना आवडेल अशी आशा आहे.

वाचकांनी त्यांच्या चोखंदळ प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कळवाव्यात.

- संपादक, अक्षरनामा

--------------------------------------------------------------------------------------------------------

अनुक्रम

व्यक्तिचित्रं

१. लिओनेल मेस्सी : फुटबॉल जगताचा सुलतान – नचिकेत पंढरपुरे

२. बॉब डिलन : वाहत्या काळाचा तटस्थ साक्षीदार (पूर्वार्ध) - चैताली भोगले

३. बॉब डिलन : वाहत्या काळाचा तटस्थ साक्षीदार (उत्तरार्ध) - चैताली भोगले

४. प्रियंका गांधी : ‘ना नफा ना तोटा’वाल्या नेत्या - टेकचंद सोनवणे

५. विशाल भारद्वाज : सिनेमाचा पूर्णपुरुष (भाग १) - चंचला पिसाळ

६. विशाल भारद्वाज : सिनेमाचा पूर्णपुरुष (भाग २) - चंचला पिसाळ

७. निखिल वागळे : सबकुछ वागळे! - निळू दामले

८. सायरस मिस्त्री : औटघटकेचा ‘टाटा’! – महेश सरलष्कर

९. कविता महाजन : ‘हॅपनिंग’ लेखिका – संजीवनी शिंत्रे

१०. रघुराम राजन : व्यवस्थेला न परवडणारा विचारवंत – अभय टिळक

११. रामचंद्र गुहा : एक जहाल पुरोगामी - माधव गाडगीळ

१२. रवीश कुमार : झीरो टीआरपीवाला पत्रकार! - सिद्धार्थ खांडेकर

१३. एल्मोर लेनर्ड : द डिकन्स ऑफ डेट्रोइट - निलेश पाष्टे

मुलाखती

१. संजय पवार : ‘भारतीय समाज टोकाच्या उजव्या विचारसरणीकडे जाऊ शकत नाही’ – मुलाखत – राम जगताप

२. राजन खान : ‘गू ते गुलाब लेखकाला काही परकं असू नये’ - मुलाखत - राम जगताप, सुशील धसकटे

३. बिन्नी बन्सल : ‘आम्ही फ्लिपकार्ट विकणार नाही’ - अर्चना शुक्ला, अनुवाद – अजित वायकर

४. आशीष नंदी : ‘आपण संकटात आहोत’ - मुलाखत – पंकज श्रीवास्तव, मराठी अनुवाद – अजित वायकर

५. भाऊराव कऱ्हाडे : ‘त्या हॉटेलमधला एकही पदार्थ आम्ही कधी पाहिला नव्हता’ - मुलाखत – प्राजक्ता शेट्टीगर

लेख

.‘उदाहरणार्थ नेमाडे’ आणि मी - अक्षय इंडीकर

२. पाकिस्तान ते इस्लाम व्हाया पुस्तकं - नीतीन वैद्य

३. इनसायडर-आउटसायडर - इरावती कर्णिक, अनुवाद – शशिकांत सावंत

४. गुलज़ार बोलतात त्याचं गाणं होतं… - रजनीकांत सोनार

५. बा वाचका, तूही यत्ता कंची? - अवधूत परळकर

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख