‘चित्रपट-अभ्यास’ : चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ही (आपल्याकडे तर अजूनही प्रचलित असलेली) समजूत मोडीत काढणारे हे पुस्तक आहे

जी कलाकृती काळाच्या पटलावर निःसंशयपणे सिद्ध होणारी आहे, त्यांना सहसा ‘अभिजात कलाकृती’ असे म्हटले जाते. इथे अशा अभिजात चित्रपटांचीच निवड केलेली दिसते. अशा चित्रपटांचे विश्लेषण करण्याने कलात्मक उत्तमाची एक सखोल जाण आपसूकच निर्माण होते. त्यांतील व्यापक व सूक्ष्म अशा जीवनदर्शनाने प्रगल्भता वाढीस लागते. ‘मुळातला अभ्यास करण्यासाठीचा पहिला गंभीर धडा’ या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध करून दिला आहे.......