टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सुब्रह्मण्यम स्वामी, पूजा शकुन पांडेय, अरविंद केजरीवाल, शिवसेना, लालकृष्ण अडवाणी आणि राजस्थानचा चहावाला
  • Sat , 15 April 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या सुब्रह्मण्यम स्वामी Subramanian Swamy पूजा शकुन पांडेय Pooja Shakun Pandey अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal शिवसेना Shiv sena लालकृष्ण अडवाणी LalKrishna-Advani

१. फारूख अब्दुल्ला हे फुटकळ प्रसिद्धीसाठी दहशतवाद्यांची बाजू घेत आहेत, अशी टीका भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. फारूख अब्दुल्ला यांनी दगडफेक करणारे काही लोक हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला होता. भूतकाळातील काही गोष्टींमुळे ओमर अब्दुल्ला आणि फारूख अब्दुल्ला यांच्यासाठी सध्या कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी फुटकळ प्रसिद्धीचा मार्ग स्वीकारला आहे, असे स्वामी म्हणाले.

स्वामी म्हणतायत म्हणजे त्यात तथ्य असलं पाहिजे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी विदूषकी विधानं, कोणावरही कसलेही आरोप, कोणाचीही आणि कशाचीही भलामण करण्यापासून ते कसलेही आचरट दावे करण्यापर्यंत वेगवेगळे वापरण्यात स्वामी इतके पटाईत आहेत की, निदान याबाबतीत तरी त्यांचं मत तज्ज्ञाचं मत म्हणून गृहीत धरायला हवं.

.......................................................................................

२. तिहेरी तलाकपीडित मुस्लिम महिलांनी हिंदू धर्म स्वीकारावा. त्यांना न्याय दिला जाईल, असे हिंदू महासभेच्या सरचिटणीस डॉ. पूजा शकुन पांडेय यांनी म्हटले आहे. देशातील सरकार आणि कायदा न्याय देऊ शकले नाहीत, तर आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असे पूजा पांडेय म्हणाल्या. या वेळी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी तिहेरी तलाकविरोधात लढा देण्याची थपथ घेतली. अशा महिलांच्या विवाह सोहळ्यांचे आयोजन महासभेतर्फे करण्यात येईल. त्यांचे कन्यादान आम्ही करू. त्यामुळे सुरक्षित आयुष्य जगता येईल, असेही पांडेय म्हणाल्या.

हे उच्च विचार हिंदू महासभेकडून ऐकायला मिळाल्याने जीवन धन्य झालं आहे. हिंदू कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संबंधच नसलेल्या तिहेरी तलाकविरुद्ध लढण्याची शपथ घेतली, हे तर फारच भारी आहे. हे लोक ग्वाटेमालामधल्या वंशवादाविरुद्धही लढण्याची शपथ घेतील लवकरच. हिंदू स्त्रिया सगळ्या धर्मजात काचांमधून मुक्तच झाल्यात जणू. मुळात, हिंदू धर्मातील हुंडा पद्धती, महिलांना विषम वागणूक आणि त्यांचा शारीरिक छळ थांबवण्यासाठी लढा द्यावा हिंदू महासभेच्या महिलांनी. आधी आपलं घर झाडा, मग शेजारची धुणीभांडी करायला जा.

.......................................................................................

३. परभणी शहरात मुस्लीम मतांची संख्या निर्णायक असल्याने विधानसभा निवडणुकीत ‘खान हवा की बाण’ यावर शिवसेनेच्या प्रचाराचा भर असतो. त्यातून होणाऱ्या मतांच्या ध्रुवीकरणात शिवसेना बाजी मारते. महापालिका निवडणुकीत मात्र अशा प्रचाराची धार बोथट होते आणि शिवसेनेला म्हणावे तसे राजकीय यश मिळत नाही. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत थेट धार्मिक आवाहन करणाऱ्या शिवसेनेने महापालिका निवडणुकीत १४ मुस्लीम उमेदवारांना उमेदवारी बहाल केली आहे. भारतीय जनता पक्षासारख्या, उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिमाला उमेदवारी न देणाऱ्या पक्षाने इथे १५ मुस्लिम उमेदवारांना उभं केलं आहे.

गंमत म्हणजे केवळ मुस्लिम आहेत, म्हणून यातले काही निवडूनही येतील आणि हे पक्ष आपलं धर्मद्वेषाचं राजकारण पोसत राहतील. मुस्लिमांच्याच नव्हे, तर सर्वच अल्पसंख्याकांच्या संदर्भात सुस्पष्ट धोरण नसेल, तर अशा पक्षांच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त व्हायला हवं. त्याशिवाय सापांची संगत सुटणार नाही.

.......................................................................................

४. राजस्थानच्या एका चहावाल्याने आपल्या सहा मुलींच्या लग्नात हुंडा म्हणून एक कोटी ५१ लाख रुपये दिल्याच्या कथित प्रकरणी हा चहावाला आता अडचणीत आला आहे. प्राप्तीकर विभागाचे लक्ष त्याच्याकडे वळले आहे.

गंमत पाहा, चर्चा कशाची होते, तर चहावाल्याने दीड कोटी रुपये हुंडा दिल्याची. मुळात सहा मुलींसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा हुंडा दिल्याशिवाय त्या उजवल्या जाऊ शकत नाहीत, या भीषण वस्तुस्थितीवर खरं तर चर्चेचा फोकस असायला हवा. पण, चहावाला इतका कर्तबगार कसा, त्याने एवढा पैसा कसा जमवला, असा प्रश्न एक कथित चहावाला देशाच्या पंतप्रधानपदी आल्यानंतरही विचारला जातो, हे आश्चर्य आहे.

.......................................................................................

५. निवडणुकीतल्या ईव्हीएम मशिनबाबत गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा उघडणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, मी आयआयटी इंजिनिअर आहे आणि ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करण्याच्या १० पद्धती सांगू शकतो.

केजरीवालांनी हे खरंतर फार वेळा सांगू नये. आधीच भाजपेयींची वक्रदृष्टी त्यांच्याकडे सतत वळलेली असते. त्यांना दिल्लीत मिळालेल्या यशाच्या जवळपासही जाण्यात भाजपला अजून यश मिळालेलं नाही. केजरीवाल ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करण्याच्या १० पद्धती जाणतात आणि दिल्लीत आप पक्षाला महाविक्रमी यश मिळालं, या दोन गोष्टींची सांगड बसून ती तुमच्यावरच उलटेल.

.......................................................................................

६. कार्यक्षमता आणि वयाचा काही संबंध नाही. मन प्रसन्न असले, काम करण्याची इच्छा असली तर वय आडवे येत नाही. माझ्याच पक्षातले लोक जेव्हा अशी चर्चा करतात की माझे वय झाले आहे आणि आता मी विश्रांती घेतली पाहिजे, तेव्हा मात्र मन खट्टू होते. माझ्याबाबत कोणी असे बोललेले मला आवडत नाही. नोव्हेंबर महिन्यात वयाची ९० वर्षे मी पूर्ण करणार आहे, मन आजही पूर्वीइतकेच प्रसन्न आहे, काम करण्याची माझी क्षमता अजूनही अबाधित आहे. - माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी

तसं राष्ट्रपतीला फारसं कामही नसतं. शिवाय आपल्याच पक्षाचं ...सरकार असेल, तर तिकडून आलेल्या कागदांवर शिक्का उमटवण्यापलीकडे काय करायचं असतं? अधूनमधून एखादं विधेयक थोडं लटकवलं आणि सरकारचे कान उपटले की बाणेदारपणाचं बिरुदही लाभतं... हे त्यांनी उच्चारलं नसलं म्हणून काय झालं? ऐकू तर सगळ्यांना आलंच की!!!

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......