भारत - चीन संबंध : दोन निरीक्षणं
पडघम - विदेशनामा
कॅ. मिलिंद परांजपे
  • तिबेटी धर्मगुरू दलाई लामा अरुणाचल प्रदेशातील तवांग भेटीदरम्यान
  • Fri , 14 April 2017
  • पडघम विदेशनामा दलाई लामा Dalai Lama चीन China शुआन त्सांग Xuan Zang चायना डेली China Daily तवांग Tawang अरुणाचल प्रदेश Arunachal Pradesh

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तिबेटी धर्मगुरू दलाई लामा अरुणाचल प्रदेशातील तवांगला भेट देणार म्हणून चीनने त्याविरुद्ध बरीच आरडाओरड केली. धमक्याही दिल्या (‘ठोशास ठोसा’ वगैरे). मात्र भारताने खंबीर भूमिका घेऊन आपल्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करू नये म्हणून चीनला ठणकावले. रविवार नऊ एप्रिलच्या पहाटे आम्ही एअर चायनाने मुंबईहून बीजिंगमार्गे अमेरिकेस जाण्यास निघालो. ‘चायना डेली’ हे बीजिंगहून प्रकाशित होणारे वर्तमानपत्र विमानात वाचावयास मिळाले. शनिवार आठ एप्रिल आणि रविवार नऊ एप्रिलचा एकच सामाईक अंक होता. चीनमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य नाही. म्हणजे वर्तमानपत्रातील बातमी हे सरकारचं अधिकृत धोरण असतं असं समजायला काही हरकत नाही. ‘चायना डेली’सारख्या पत्रात चिनी सरकारची दलाई लामांच्या तवांग भेटीवरची प्रतिक्रिया वाचण्याची उत्सुकता होती. बीबीसीने टीव्हीवर दलाई लामा तवांगमध्ये प्रचंड समुदायासमोर बोलताहेत असं चित्र दाखवलेलं मी सात एप्रिलला पाहिलं होतं. म्हणून जागेवर बसल्याबरोबरच संबंध वर्तमानपत्र अधाशीपणे पुन्हा पुन्हा नीट बघितलं. दलाई लामांच्या भेटीबद्दल काहीही बातमी किंवा लेखाचा अभाव पाहून आश्चर्य वाटलं. आधीच्या म्हणजे चार-सहा एप्रिलला ‘चायना डेली’मध्ये छापलेला धमकीवजा अग्रलेख इंटरनेटवर वाचला. भारतीय आणि परदेशी वर्तमानपत्रांनी चिनी आक्षेपाला बरीच प्रसिद्धी दिली होती. मात्र भारत इस्राएलकडून क्षेपणास्त्र विरोधी तंत्रज्ञान विकत घेणार एवढीच फक्त बातमी भारताबद्दल छापलेली वाचायला मिळाली.

फ्लाईटमध्ये ‘शुआन त्सांग’ (Xuan Zang) सिनेमा पाहावयास मिळाला. सातव्या शतकात शुआन त्सांग हा चिनी प्रवासी खुष्कीच्या खडतर मार्गानं नालंदा विद्यापीठात येऊन भारतीय विशेषतः बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात प्रावीण्य मिळवतो आणि सतरा वर्षांनी परत मायदेशी पोचतो. त्यावर हा सिनेमा आधारलेला आहे. त्यात भारतातील अस्पृश्यता आणि सतीच्या चालीबद्दल काही प्रसंग दाखवले आहेत. शुआन त्सांग एका निरपराध स्त्रीला सक्तीच्या विवाह आणि सतीपासून वाचवतो असा तो प्रसंग आहे. अस्पृश्यता आणि सतीची प्रथा या गोष्टी शुआन त्सांगच्या चित्रपटात दाखवण्याचं काही कारण नव्हतं. तार्किक वादविवादात त्सांग इतर भारतीय विद्वानांना हरवतो म्हणून त्याची हत्तीवरून मिरवणूक काढतात असाही प्रसंग आहे. बोलपटाचे हे भाग काल्पनिक असले तरी चिनी विद्वान भारतात येऊन आध्यात्मिक, धार्मिक ज्ञान घेऊन गेले हा सत्य मुद्दा राहतोच. दीड-दोन हजार वर्षांची चीनवरील भारतीय सांस्कृतिक श्रेष्ठता नाकारता येत नाही. त्सांग भारतात पोहचेपर्यंतची सिनेमातली संभाषणं चिनी भाषेत आहेत. त्यामुळे ती आपल्याला समजत नाहीत. भारतातील संभाषणे हिंदीत पण खाली चिनी भाषेत दिलेली (सब टायटल्स) आहेत. चिनी सरकारी निर्मात्यांनी भारतीयांच्या सहकार्यानं बनवलेला हा सिनेमा हल्लीच्या भारत-चीन स्पर्धात्मक वातावरणापासून वेगळ्या वळणाचा आहे आणि बघण्यासारखा आहे.

वाजपेयी चीनला गेले तेव्हा त्यांनी त्सांगच्या समाधी स्थळास भेट दिली होती, ही गोष्ट अनेकांना आठवत असेलच. चिनी पंतप्रधान भारतात आले तेव्हा त्यांनी डॉ. कोटणीसांच्या बहिणीला भेटले होते हेही अनेकांना आठवत असेल. एअर चायनाची सेवा उत्तम होती. बिजिंग विमानतळावर लोक फ्रेंडली वाटले.

प्रवासात वरील दोन निरीक्षणं लक्षात आली म्हणून लिहिली.

 

लेखक निवृत्त नौदल अधिकारी आहेत.

captparanjpe@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......