‘जय भीम’ या दोन शब्दांत जग बदलण्याची जादू
सदर - चैत्यभू'मी'तला 'मी'!
कीर्तिकुमार शिंदे​
  • शिवाजी पार्क परिसरातल्या व्यासपीठावरील डॉ. आंबेडकरांचा पुतळा
  • Wed , 07 December 2016
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar चैत्यभूमी Chaitya Bhoomi ६ डिसेंबर 6 December

यंदाचा डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६०वा महापरिनिर्वाण दिन होता. त्यानिमित्ताने चैत्यभू'मी'तला 'मी'! हे विशेष सदर डिसेंबरपर्यंत रोज सदर प्रकाशित करण्यात आले. डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमीवर फक्त महाराष्ट्रातील बौद्ध समाज वा दलित समाजच येतो असं नाही, तर भारतभरातून लोक येतात… त्याविषयीचा हा या सदरातला शेवटचा लेख.

.................................................................................................................................................................

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त एका जातीचे नाहीत. ते संपूर्ण देशाचा, सर्व समाजांचा विचार करणारे नेते होते", असं प्रत्येक जण बोलत असतो. प्रत्यक्षात मात्र, किमान महाराष्ट्राच्या संदर्भात तरी, ते केवळ एका जातीचेच नेते असल्यासारखं चित्र बनवलं गेलंय. यामागे कोणत्या शक्ती आहेत, त्यांचे हेतू काय, हा या लेखाचा विषय नाही. तर बाबासाहेब देशातल्या सर्वच्या सर्व दलित-शोषित-मागासलेल्या समूहांचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्याच विचारांनुसार हे समूह त्यांचं राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. 

६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीला भेट देणाऱ्यांमध्ये मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील दलित, त्यातही विशेष करून 'फक्त बौद्ध समाजाचे लोकच असतात', हा गैरसमज आहे. बौद्ध समाजबांधवांची संख्या सर्वाधिक जास्त असते, हे खरंच आहे, पण फार कमीजणांना कल्पना असेल की, ६ डिसेंबरला चैत्यभूमीला बाबासाहेबांसमोर नतमस्तक होण्यासाठी उत्तर प्रदेशातील चमार खूप मोठ्या संख्येनं येतात. फक्त उत्तर प्रदेशातच चमार समाजाची लोकसंख्या तब्बल १४ टक्के आहे. कांशीराम यांच्यामुळे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे राजकीय-सामाजिक विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि नंतर काय झालं, हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. चमार ही सर्वांत खालची जात तिथं सत्ताधारी बनली. त्या सत्ताधारी जातीचा राजकीय आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे आपल्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी तेथील किती प्रचंड संख्येनं चमार चैत्यभूमीला येत असतील, याची कल्पना करता येईल. 

पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्येही ९ ते १२ टक्के चमार आहेत. तेसुद्धा मोठ्या संख्येनं चैत्यभूमीला येत असतात. अधर्म, रविदासीया, रामदासिया किंवा जाटव अशा वेगवेगळ्या नावांनी हा समाज त्या राज्यांमध्ये ओळखला जातो. सर्वांत विशेष गोष्ट म्हणजे, उत्तर प्रदेशातला चमार समाज स्वत:विषयी बोलताना 'हम जय भीम है' किंवा 'हम बौद्ध है' असं सहज बोलून जातो. बाबासाहेबांना त्यांनी इतकं स्वीकारलं आहे की, महाराष्ट्रातील चर्मकार समाजाप्रमाणे ते आंबेडकरी समाजाशी जराही अंतर ठेवून राहत नाहीत. उलट, महाराष्ट्रीय बौद्ध हा त्यांचा एक समाज म्हणून आदर्श आहे. शिवाजी पार्कमध्ये बांधण्यात आलेल्या मंडपांमध्ये त्यांच्याशी गप्पा मारताना अशा गोष्टी उलगडतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गुजरातमधील दलित समाज, विशेषत: ज्यांना भंगी म्हटलं जातं, तेसुद्धा चैत्यभूमीला येतात. इतकंच कशाला, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, आंध्र प्रदेश इथलेही असंख्य दलित-आदिवासी समाजबांधव दरवर्षी चैत्यभूमीला येतात. त्यांची भाषा मला कळत नाही, म्हणून त्यांच्याशी मला संवाद साधता आला नाही, पण 'जय भीम'चा नारा त्यांच्या भावना समजून घ्यायला मला पुरेसा वाटला.

ईशान्येकडच्या 'सेव्हन सिस्टर्स' राज्यांतल्या अनेक आदिवासी समूहांमधील लोकही चैत्यभूमीला दिसले. त्यात तिथले बौद्ध जसे असतात, तसे काही चक्क ख्रिश्चनही असतात. अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण देशाच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक राज्यातील दलित-मागास समूह चैत्यभूमीला येतात, आणि शांतपणे निघून जातात. दुर्दैवानं या सर्व गोष्टींचं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही. तसं काही अधिकृत डॉक्युमेंटेशन झाल्याचं माझ्या तरी वाचण्यात किंवा ऐकिवात नाही. 

देशातले विविध समाज जसे चैत्यभूमीला येतात, तसे विविध चळवळींचे-राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही येतात. बाबासाहेबांचे 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' विचार त्यांच्यासाठी टॉनिकचं काम करतात. त्यामुळेच मानवाधिकार चळवळीचे कार्यकर्ते जसे चैत्यभूमीला भेटतात, तसे डाव्या विचारांचे वाहकही भेटतात. मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं असतानाही काळा गॉगल लावून कॉम्रेड सुबोध मोरे शिवाजी पार्कवर तरुण कार्यकर्त्यांना ‘जय भीम’ म्हणत भेटून जातात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राजीव देशपांडे यांना डाव्या कार्यकर्त्यांसोबत इथं रस्त्याच्या एका कोपऱ्यात बसायला लाज वाटत नाही. सत्यशोधक ओबीसी परिषदेचे संदीप हनमुंतराव उपरे शिवाजी पार्कातल्या स्टॉलमध्ये 'आम्ही ओबीसी बौद्ध आहोत किंवा बौद्ध धर्म स्वीकारणार आहोत' हे सांगताना अवघडत नाहीत. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पुरोगामित्वाची व्याख्या करणं कठिण असलं तरी, देशातल्या प्रत्येक पुरोगामी विचारांच्या व्यक्तीला बाबासाहेबांशी जोडून घ्यावंसं वाटतं, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचं उत्तर फक्त चैत्यभूमीत दिसतं. आंबेडकरी विचारांना मानणारा एखादा वृत्तवाहिनीचा पत्रकार असो वा नाटककार, पूर्णवेळ कार्यकर्ता असो वा नोकरी सांभाळून चळवळीचं काम करणारा सांसारिक, भाषणं ठोकणारा पट्टीचा वक्ता असो वा पथनाट्यं सादर करणारा विद्रोही शाहीर… इथं आलेल्या प्रत्येकाच्या हृदयात फक्त बाबासाहेब आंबेडकर असतात. प्रत्येक जण त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत असतो. प्रत्येकाचा मार्ग, अभिव्यक्तीची पद्धत वेगळी असते इतकंच. म्हणूनच इथे अॅट्रॉसिटीला विरोध करणाऱ्या मराठ्यांचा निषेध करण्यासाठी सह्यांची मोहीम घेतली जाते, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमं विकत घेण्याच्या डावावर पथनाट्य सादर केलं जातं आणि 'बाळ ठाकरे भांडवलदारांचा हस्तक' अशा नावाची पुस्तिका शिवसेनाभवनसमोरच विकली जाते! सर्व प्रकारच्या सत्ताधीशांना वैचारिक विरोध करण्याची ताकद त्यांना फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवातून मिळते. 

'जय भीम' या दोन शब्दांत जग बदलण्याची काय जादू आहे, हे समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला चैत्यभूमीवर यावंच लागेल. अन्यथा तुम्ही 'इंडियन'च रहाल, 'भारतीय' नाही!

(समाप्त)

.................................................................................................................................................................

लेखक कीर्तिकुमार शिंदे​ ‘नवता बुक वर्ल्ड’चे संचालक आहेत.

shinde.kirtikumar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Ashok Sadavarte

Sat , 04 November 2017

जय भीम


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......